
गेल्या वर्षी १७ जानेवारी याच तारखेला मी नांदेडच्या नवा मोंढा मैदानावरील सभेत मा. बाळासाहेब आंबेडकर व
लाखोंच्या जनसमुदायाच्या समोर माझ्या समुहाच्या कथा आणि व्यथा मांडल्या. साहेबांनी मला व्यक्त होण्याची
संधी दिली. आंबेडकरी समुहाने प्रचंड प्रेम आणि बळ दिले. आणि माझी राजकीय अस्पृश्यता संपविली.
कोण कोणाचं बोट धरून राजकारणात येतं हे मला माहीत नाही पण मी माझ्या समुहाच्या राजकीय वेदना घेऊन
डॉ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या जवळ आलोय.
साहेबांनी खांद्यावर हात ठेवला नाही बरं ! माझा हात घट्ट पकडला आणि प्रचंड गर्दीतुन ओढत नेऊन अण्णाराव
गोविंदला गाडीत घ्या म्हणुन फर्माण सोडला.'(घटणा स्थळ लातुर दयानंद कॉलेज परिसर फारुक अहमद,
डॉ बळीराम भुरके आणि अॅड अण्णाराव पाटील यांच्यासह अनेकांनी हा प्रसंग जवळुन बघीतला ) साहेबांची
दुरदृष्टी कि भयान गर्दीतून याला (म्हणजे मी) लोक माझ्या पर्यंत येऊ देणार नाहीत
माझ्या जन्मदात्या बापाने माझा हात धरून मला साधं याञेला नेलेलं मला आठवत नाही.
कारणं माझ्या लहानपणीच माझ्या वडिलांचं निधन झालं साहेबांनी माझा हात धरून अर्ध्यावर सोडून दिले नाही
तर थेट गाडीत बसून पुढे घेऊन जात आहेत.मी आजपर्यंत कधीच याञेतील साध्या आकाश पाळण्यात बसलो
नाही. आमच्या घरात अद्याप स्वत:ची सायकल सुध्दा नाही परंतु साहेबांनी मला एक वर्षात तिन वेळा थेट
हेलिकॉप्टर मधे बसविले.संपुर्ण महाराष्ट्र ४ चाकी VIP गाडीत दोन दौरे करण्याची संधी दिली. १३ सप्टेंबर २०१९
रोजी जालना इथं स्वतंञ कार्यक्रम दिला. एवढेच नाही तर त्या कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत स्वत:च्या
जवळ घेऊन बसले.मुक्तपने व्यक्त होण्याची संधी दिली. विधानसभा निवडणुकीत माझ्या समाजाला उमेदवारी
दिल्या गेली नाही मी मागीतली सुध्दा नाही. म्हणुन माझ्या प्रेम करणार्या समाज बांधवांनी समाज माध्यमातून
चौफेर आणि सडकून टीका केली. तो त्यांचा अधिकार होता. परंतु साहेब दुरदृष्टीचे ! साहेबांनी नुकत्याच पार
पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वत्र:च्या अकोला लोकसभा मतदारसंघ खुल्या जागेसाठी आरक्षित
असलेल्या आसेगाव बाजार आणि रिसोड तालुक्यातील गोवर्धन या ठिकाणी समाजातील एक महिला एक पुरुष
याप्रमाणे आणि नागपूर ग्रामीण आणि रामटेक येथे थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली.हि साधारण बाब नाही.
साहेबांनी मला एकटं पडु दिलं नाही. साहेबांच माझ्या वरिल प्रेम अनेकांच्या डोळ्यात सललं पण यामुळे
साहेबांनी मला कधी दुर नाही केलं.
![]() |
photo by : prabuddha bharat |
या एक वर्षाच्या प्रवासात साहेबांनी मला श्रोता-वक्ता-प्रवक्ता-स्टार प्रचारक-
महासचिव ते विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ मतदारसंघातील उमेदवारांना पक्षाचा AB फाॅर्म
देण्या सारखं गंभीर आणि अतिशय जबाबदारीच काम करण्याची संधी दिली. आजपर्यंत कधीच नजरेआड केले
नाही, अपमानित केले नाही, कधीच कोणत्याही प्रक्रीयेतुन डावललं नाही. वंचित बहुजन आघाडीत काम
करताना अंजलीताई, सुजातभाई, रेखाताई, अशोक भाऊ सोनोने , अमितभाऊ,कुशलभाऊ, वंजारी सर, भास्कर
भोजने सर, फारुक अहमद सर यांनी वेळोवेळी दखल घेतली खुप प्रेम दिलं आणि विशेष म्हणजे जितुभाई,
सुमितभाई आणि स्वेलभाई यांच्यासह अनेकांनी मला सांभाळलं! मी वंचित बहुजन आघाडीत ताठ मानेने
कार्यरत राहीलो पाहिजे म्हणून विना विलंब विना अट माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे अखिल भारतीय
जिवा सेना संघटना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, भारतीय पिछडा शोषित संघटना,बारा बलुतेदार संघटना,
ओबीसी संघटना, या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना माननार्या संपूर्ण चाहत्यांनी मला भरभरुन प्रतिसाद
व प्रेम दिलं.विषेश हे सगळं करण्यासाठी वेळ द्यावा लागतो तर माझ्या आईनं मला मोकळीक दिली म्हणुनच मी
इथपर्यंत पोहोचलो.
टीप- मी काहीतरी वेगळा आहे हे दाखवण्यासाठी लिहिले नाही. तर आपण अनेक वेळा सोशल मीडियात वाचलं
किंवा बघीतले असेल कि प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांनी प्रस्थापित जात समुहाच्या एखाद्या कार्यकर्त्याला
जर प्रोहत्साह किंवा बळ दिले असेल तर भले मोठे काॅलमच्या काॅलम लिहिले जातात. परंतु बाळासाहेब
आंबेडकर माझ्या सारख्या कित्येकांना घडवतात हे कुणी दाखवत नाहीत. आता आपण सुद्धा आपल्या नेत्याचा
अनुभव बोललं , लिहिलं आणि सांगितला पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न !
दिनांक १७ जानेवारी २०२०
विशेष साभार:
गोविंद दळवी - राज्य प्रवक्ता - वंचित बहुजन आघाडी - मो ९८८१२८३८०२
No comments:
Post a Comment