अभिनेता अक्षय कुमार याच्या निरमा ऍड विरोधात 'संभाजी ब्रिगेड' केली तक्रार दाखल अभिनेता अक्षय कुमार याच्या निरमा ऍड विरोधात 'संभाजी ब्रिगेड' केली तक्रार दाखल - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, January 9, 2020

अभिनेता अक्षय कुमार याच्या निरमा ऍड विरोधात 'संभाजी ब्रिगेड' केली तक्रार दाखल

<img src="akshay-kumar-nirma-ads.jpg" alt="sambhaji brigade filed case against akshay kumar nirma ads"/>



सिने अभिनेता अक्षय कुमार मावळ्यांचे कपडे घालून, शिंदे शाही पगडीसह 'निरमा वॉशिंग पावडर' ची जाहिरात

करत आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी रक्त सांडून इतिहास घडवला कर्तृत्व सिद्ध 

केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या मावळ्यांचा जाहिराती मध्ये असा अपमान करणे हा राष्ट्र पुरुषांचा 

अपमान आहे. 'शिंदेशाही पगडी' घालून अटकेपार झेंडे फडकावले. शिंदे-होळकरांचा इतिहास महाराष्ट्रासह 

देशभर, जगभर अभिमानाने सांगितला जातो. हेच मावळे लढाई करून आल्यानंतर त्यांच्या घरातील महिला 

(राणी) त्यांना हिनवून बोलतात... असे या जाहिराती मध्ये दाखवले आहे. "मावळे लढाई करून आल्यानंतर फक्त 

कपडे स्वच्छ करत बसायचे" असा त्यांचा त्यामागील संदेश आहे. कपडे धुण्यापुरते वा निरमा विकण्यापुरते 

'मावळे' व त्यांचे कर्तुत्व उरले का...! हा प्रश्न आहे. 

<img src="akshay-kumar-nirma-ads.jpg" alt="sambhaji brigade filed case against akshay kumar nirma ads"/>


चित्रपट, कथा, कादंबऱ्या, पुस्तक व जाहिरात माध्यम यांना छत्रपती शिवाजी महाराज हे सॉफ्ट टार्गेट वाटतात. 

सतत बदनामी, अवहेलना किंवा चुकीची माहिती देणे... हाच सर्रास धंदा सुरू आहे. सर्व प्रथम चुकीचा इतिहास 

मांडून प्रचंड बदनामी केली, परवा महाराजांना फेकून मारले, आज मावळ्यांनी कपडे धुतले...! ह्या जाणिवपुर्वक 

वादग्रस्त चुकीच्या ठिणग्या टाकतय कोण...? अन्यथा 'एक दिवस गव्हा सोबत एक दिवस किडे'ही रगडले 

जातील...' सर्वप्रथम टीव्हीवर प्रसारित होणारी ही जाहिरात तात्काळ थांबवली गेली पाहिजे.

अरे त्या 'छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी' रक्त सांडून स्वराज्याचा इतिहास लिहिलाय...! त्याची जाण 

ठेवा. महाराष्ट्रात तात्काळ #जाहिरात बंद झाली पाहिजे. सिने अभिनेता अक्षय कुमार, 'निरमा' वॉशिंग पावडर चे 

मालक व कंपनी आणि आयुष लिमिटेड ही जाहिरात कंपनी यांच्यावर 'राष्ट्रपुरुष' यांची बदनामी केल्याप्रकरणी, 

मावळ्यांची बदनामी केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा... याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये 

तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बाळासाहेब 

कोपनर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जर वरील सर्वांवर तात्काळ गुन्हा दाखल केला नाही तर 

महाराष्ट्रभर या विरोधात आंदोलन करण्यात येईल.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट, संभाजी ब्रिगेड 

चित्रपट आघाडीचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, विनायक घुले, सूर्यकांत विष्णोई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते 

उपस्थित होते.


संभाजी ब्रिगेड, पुणे.