बसपा सुप्रीमो मायावती यांचा ६४ वा जन्म दिनी भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझादला जामिन मंजूर बसपा सुप्रीमो मायावती यांचा ६४ वा जन्म दिनी भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझादला जामिन मंजूर - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, January 15, 2020

बसपा सुप्रीमो मायावती यांचा ६४ वा जन्म दिनी भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझादला जामिन मंजूर

<img src="bsp-suprimo-mayawati-birthday.jpg" alt="bhim army chief chandrashekhar azad bail granted on mayawati's 65th birthday"/>


आजच्या दिवसभराच्या बहुजन समाजासाठी दोन महत्वाच्या आनंदाच्या घटना घटना

पहिली बातमी अशी कि आज देशभरात बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा ६४ वा वाढदिवस

"जन कल्याणकारी दिवस" म्हणून मोठ्या हर्षेउल्हासात साजरा करण्यात आला

आणि दुसरी बातमी म्हणजे युवा नेतृत्व भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांना काही अटींवर 

जामीन मंजूर झाला

बसपा सुप्रीमो मायावती यांनी नियोजित वेळी प्रेस कॉन्फरेन्स घेतली. त्यांनी भाजप केंद्र आणि राज्य सरकार वर 

टीका करत म्हणाल्या कि देश सध्या काँग्रेसच्या काळापेक्षा फार बिकट परिस्तिथी आहे . 

<img src="bsp-suprimo-mayawati-birthday.jpg" alt="bsp suprimo mayqwqti 64th birthday celebrated"/>
photo by vimal varun


मायावतींनी " ‘ब्लू बुक’ मेरे संघर्षमय जीवन व बीएसपी मूवमेंट का सफरनामा " या पुस्तकाची १५ वी 

आवृत्ती इंग्रजी भाषेतही प्रसिद्ध केली 

मायावतींनी देशाचे प्रश्न घेऊन काँग्रेस आणि भाजपवर टीका करत म्हणाल्या कि काँग्रेस आणि भाजप एकाच 

नाण्याच्या दोन बाजू आहेत

तर दुसरीकडे युवांचा लाडका भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर या तीस हजारी कोर्ट दिल्ली न्यायालयाने जमीन 

मंजूर केला पण त्यांच्यावर काही निर्बंध घातले ते असे

१. दिल्लीच्या निवडणुका होईपर्यंत दिल्लीच्या बाहेर राहायचे..

२. १६ फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही आंदोलनात सहभागी व्हायचे नाही

३. शाहिन बाग आंदोलनात सहभाग नोंदवायचा नाही..

बसपा सुप्रीमो मायावती यांना ६४ व्या वाढदिवसाच्या आणि त्याचबरोबर चंद्रशेखर आजाद यांना पुढील 

वाटचालीस मंगलम शुभेच्छा !