टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी अर्थात संभाजी भिडे यांनी
नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं समर्थन केलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणजे देशद्रोह असं
म्हटलं आहे.
कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेसवर टीका
करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. "नागरिकत्त्व सुधारणा कायद्यामुळे काश्मीरपासून
कन्याकुमारीपर्यंतच्या कोट्यवधी भारतीयांना आनंद झाला पाहिजे. दुर्दैवाने आपला देश हा माणसांनाच आहे पण
देशभक्तांनाचा नाही. त्यामुळे त्यांना याचा अर्थ कळत नाही. स्वार्थ हाच ज्यांचा धर्म आहे त्यांनी. कायद्याला विरोध
करत गालबोट लावण्याचा प्रयत्न करून नंगानाच सुरू केलाय तो देशद्रोह आहे", अशी टीका भिडेंनी केली.
'देशभक्त असलेल्या कुठल्याही नागरिकाला या कायद्याचं कौतुक वाटेल, हे मागेच व्हायला हवं होतं. यापूर्वी हा
कायदा लोकसभेत सादर केला गेला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू
करा, अशी मागणी केली होती. त्याचा हा व्हिडिओ ही आता व्हायरल होत आहे', असंही भिडेंनी सांगितलं.
तसंच, 'हा कायदा कोणत्याही परिस्थितीत लागू झाला पाहिजे. जसं माणसाला अन्न, पाणी आणि निवारा लागतो
तसाच हा कायदा देशासाठी गरजेचा आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जे काम करताय त्यांचं कौतुककेलं
पाहिजे', असं आवाहनही भिडेंनी केलं.