पहिलांदाच मातोश्रीवर आले प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पहिलांदाच मातोश्रीवर आले प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 24, 2019

पहिलांदाच मातोश्रीवर आले प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

<img src="prakash-ambedkar-meets-uddhav-thackeray.jpg" alt="CAA and NRC VBA role prakash ambedkar meetsuddhav thackeray at matoshree "/>


२६ डिसेंबर २०१९ रोजी आणि कायद्याविरोधात मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी आणि विविध सामाजिक

संघटना यांचं ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आहे त्यासंबंधी आज २५ डिसेंबर २०१९ 

रोजी प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर दाखल झाले

प्रकाश आंबेडकर यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय 

नागरिकत्व नोंदणी कायदा विरुद्ध वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ठ केली 

याबाबत प्रक्ष मबेडकर यांनी ट्विट करून माहिती दिली 


<img src="prakash-ambedkar-meets-uddhav-thackeray.jpg" alt="CAA and NRC VBA role prakash ambedkar meetsuddhav thackeray at matoshree "/>


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली कि “मुख्यमंत्र्यांचा निरोप 

आल्याने भेटायला आलो. 26 तारखेला धरणे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं. 

आमची आंदोलने शांततेतच होतात असं सांगितलं”

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. पुढच्या 

बैठकीत मी त्यांना माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 

टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळेच हे धरणे 

आंदोलन करण्यात येत आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

<img src="prakash-ambedkar-meets-uddhav-thackeray.jpg" alt="CAA and NRC VBA role prakash ambedkar meetsuddhav thackeray at matoshree "/>



“या कायद्यामुळे मुस्लिम भरडला जाणार आहेच, शिवाय हिंदूमधील 40 टक्के जनता भरडणार आहे. भटके 

विमुक्त 9-12 टक्के, आलुतेदार-बलुतेदार त्या सगळ्यांकडे कागदपत्रं नाहीत. एनआरसी लागू होईल तेव्हा जन्म 

कधी झाला याची नोंद नाही. त्यामुळे अशा लोकांना फटका बसेल” असं आंबेडकर म्हणाले.

आमचा मोर्चा नाही, तर धरणं आंदोलन आहे. दादरम्ध्ये 26 तारखेला हे धरणं आंदोलन होईल. डिटेन्शन कॅम्प 

आहेत, त्याबाबत एक समिती बनवून सविस्तर माहिती द्या, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आंबेडकर म्हणाले.