वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता मेळावा , अकोला
शेवटच्या घटका पर्यंत सत्ता पोहचविचा उद्देश आहे, पाणी जसे वळणा प्रमाणे बदलते.परिस्थिती आपल्या
आवाक्यात येणार आहे.अनेकांनी घडू दिले नाही.जाणीवपुर्वक असेल, काही प्रलोभनापायी असेल येऊ दिले
नाही.आपण घडवायला आलो आहोत.मला मिळणार नसेल तर माती कालविण्याची तयारी अनेकांची
आहे.आपण स्वबळावर हे मिळवु शकतो हे लक्षात घ्या.आपली सत्ता आणायची असेल तर ज्याला तिकीट
मिळणार नाही त्याने ज्याला मिळाले त्याला निवडून आणावे ही माझी विनंती राहील.
कालचा नागरिकत्व सुधार कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नाही.काही प्रश्नांकडे गांभीर्याने पहावे
लागेल.नागरिकत्व गेले म्हणजे मताचा अधिकार गेला हे समजून घ्या.आपल्याला अधिक जागरूकपणे लढावे
लागेल.जिल्हा परिषद हे एक साधन आहे, अनेक गोष्टी घडवायच्या आहेत.नियोजन नसेल तर ऊध्वस्त व्हायला
वेळ लागणार नाही.
अनेक अभिनव योजना करता येतील.खारपानपट्टा, जंगल या बाबत जिल्बा परिषद काही करू शकते का हे
ठरवावे लागेल.
खारपानपट्टा वर प्रायोगिक अभ्यास झाला पुढील काही दिवसात हा गोड पाणी मिळविण्याचा प्रयोग करता
येईल.हा खारपानपट्टा प्रयोग हा सहा मतदार संघा पुरता मर्यादित असेल.
जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून गेलेले काही काही पदाधिकारी वेगळे वागतात.त्यांना किती महत्व देऊ
नये.पक्षाला मारक असे होवु देऊ नका.
अपेक्षा आहे की, इतर पक्ष ईव्हीएम मध्ये घोळ करू पाहतायत , ईव्हीएम चा हा खेळ काँग्रसच्या काळा पासून
सुरू आहे.त्यांनी ह्या मशीम वापरून अनेकांना पाडायला वापरल्या.भाजपने ह्या मशीन निवडून यायला वापरल्या.
ईव्हीएम आहे ते पर्यंत आपण लोकसभा जिंकु शकत नाही.विधानसभेतही मशीन मेनेज होत्या.अनेक ठिकाणी
अनपेक्षीत निकाल आले.
लुटारूंची टोळी असते तशी सत्ताधारांची टोळी आहे.मोदी आणि इतरांचा ठरवून चाललेला खेळ आहे.मनमोहन
सिंगच्या काळात पण लुट होती.पण ती सिस्टमेटीकली होत असे.भाजप वाले भुरटे चोर आहे.
संघटीत टोळी सोबत आपल्याला लढायचे आहे.ईव्हीएम संदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांचे पत्र
आहे.मतदानात व मोजणीत फरक आहे परंतु आम्ही जाणीवपुर्वक केले नाही असे पत्र दिले होते.
आपण चोरांच्या विरोधात लढत आहोत.त्या मुळे भाजप सोबत जायचे ठरविले तरी ते घेणार नाहीत.कारण त्यांना
माहीत आहे की ह्यांचा अजेंडा काय त्यामुळे आपल्याला स्विकारले जाणार नाही.
हैद्राबादचे जळीत प्रकरण वेगळे आहे, अनेक गैरप्रकारांची तक्रार तिने केली होती.त्यामुळे ह्या देशात आमच्या
विरोधात जाल तर जिवंत राहू शकत नाही हा प्रकार देशात सुरू झाला आहे.
विधानसभा लोकसभा मध्ये ईव्हीएम ने आपला पराभव केला.३१ पिटीशन प्रलंबीत आहेत, एकाही जजने आमचे
ऐकून घेतले तर हे सिध्द होईल की जो जनादेश दिला होता तो फिरविण्यात आला आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीने ईव्हीएम विरोधात आंदोलन केले हे खरे आहे, परंतु आता ते ईव्हीएम ला विरोध करणार
नाही.कारण आता ही मशीन सत्ताधा-यांच्या ताब्यात आहेत.
अकोला वाशीम धुळे नंदूरबार व नागपू़ुर ह्या निवडणुकी स्वबळावर जिंकु हा चंग बांधा।कार्यकर्त्याने सुचविलेला
ऊमेद्वारच दिला जाईल.परंतु जो पक्षाने दिला तो विजयी करा.
आपली कला निवडणुकीत ऊमेदवार विजयी करा हे आवाहन करतो.
बाळासाहेब आंबेडकर
अकोला कार्यकर्ता जिल्हा बैठक.
शब्दांकन
राजेंद्र पातोडे :- (प्रदेश प्रवक्ते) :- वंचित बहुजन आघाडी
दिनांक :- ११ डिसेंबर २०१९.