महा विकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडी अडचणीत महा विकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडी अडचणीत - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, November 29, 2019

महा विकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडी अडचणीत

काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर सहा नेत्यांचा शपथविधी पार पडला . काही दिवसात स्थापन झालेली "महा विकास आघाडी" यात प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना , राष्टरेवाडी काँग्रेस आणि काँग्रेस आहेत तर यांच्यासहित इतर छोट्यामोठ्या राजनीतिक पार्ट्या हि त्यात सामील आहेत .

<img src="maha-vikas-aghadi-vs-vanchit-bahujan-aghadi.jpeg"= maha vikas aghadi-vba">


"महा विकास आघाडी" स्थापन झाल्यानं राज्यात खुशीचा वातावरण आहे याच प्रमुख कारण फक्त एकच ते म्हणजे भाजपाला सत्तेपासून दूर करणे . "महा विकास आघाडी पार्टी"चे प्रमुख सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आहेत .त्यांनी उद्धव ठाकरे याना सोबत घेऊन अंधाराचा फायदा घेऊन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस याना तीन दिवसात पायउतार करून दाखविले
या "महा विकास आघाडी"ने राज्यात जास्त आमदार निवडून आलेले असतानाही भाजपाला सत्तेतून खाली खेचलं त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप याचा सूड घेईलच...पण या "महा विकास आघाडी"मुळे सर्वात जास्त फटका हा "वंचित बहुजन आघाडी"ला बसणार आहे.
"वंचित बहुजन आघाडी" लोकसभे पाठोपाठ विधानसभा निवडणूक लढविली आणि जनतेचा विश्वास संपादन केला .जरी वंचित बहुजन आघाडीने कोणताही उमेदवार निवडून आणला नाही पण इथल्या प्रस्थापित पक्षांना सळो कि पळो करून सोडलं होत आणि येणाऱ्या काळात ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वात महाराष्ट्रात बहुजनांचे राज्य स्थापन झालं असत आणि राज्यात खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ सफल झाली असं म्हणता आलं असत . त्याचबरोबर प्रस्थापित घराणेशाहीच्या वारसांवर कायमचा प्रश्न मिटला असता . बहुतेक याचीच जाण शरद पवार याना झाली असावी , आणि त्यांनी "महा विकास आघाडी"चा पाया रचून आंबेडकरी नेतृत्वला ब्रेक लावला
त्यामुळे येणाऱ्या काळात जर "महा विकास आघाडी" पाच वर्ष सत्तेवर राहिली तर भाजपासहित "वंचित बहुजन आघाडी"ला आपला उमेदवार निवडून आणणे फार कठीण जाणार आहे . पण जर का हि युती फार कमी काळ टिकली तर याचा फायदा नक्कीच "वंचित बहुजन आघाडी"ला मिळेल यात वाद नाही .