26 नोव्हेंबर...संविधान दिन - काळा दिवस नाही तर सुवर्ण दिन 26 नोव्हेंबर...संविधान दिन - काळा दिवस नाही तर सुवर्ण दिन - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, November 26, 2019

26 नोव्हेंबर...संविधान दिन - काळा दिवस नाही तर सुवर्ण दिन

26 नोव्हेंबर ला आतंकी हल्ला झाला ज्यामध्ये आपले पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले म्हणून हा दिवस

काळा दिवस घोषीत करण्यात आला...

देशासाठी शहीद होणे अभिमानाची बाब असून 26 नोव्हेंबर ला जे पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले

त्यांच्याविषयी या देशातील प्रत्येक नागरीकांच्या मनात गर्व आहे...

<img src="26-november-samvidhan-divas.jpeg"= samvidhan-divas">


परंतु...शहीद झाल्याचा दिवस काळा दिवस असेल तर ज्या ज्या दिवशी देशाच्या सिमेवर सैनिक शहीद होतात

तो प्रत्येक दिवस काळा दिवस म्हणून घोषीत करण्यात येतो का...?

या अगोदर सुध्दा या देशात आतंकी हल्ले झाले पण ते ते दिवस काळा दिवस म्हणून घोषीत करण्यात आले नाही

मग 26 नोव्हेंबर ला च काळा दिवस का घोषीत करण्यात आला तर त्याचं मुख्य कारण आहे...

26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान या देशाला देण्यात आलं होतं...

दिल्लीमध्ये भारतीय संविधानाची प्रत जाळणारे जातीयवादी व देशद्रोही लोकं आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही

नं करणा-या नालायक सरकार मधील नेते तसेच विकाऊ मीडीया यांच्यासारख्या मानसिकता असणा-या

लोकांना संविधानाचा विरोध आहे...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महीने 17 दिवसात एकट्यांनी भारतीय संविधान लिहुन पुर्ण केलं व या

भारत देशाला अर्पण केल...तसेच संविधानाने हुकुमशाही नष्ट होऊन लोकशाही आली व ब्राम्हणी

विचारसरणीच्या लोकांचं वर्चस्व नष्ट झालं...म्हणूनच संविधान विरोधी वातावरण निर्माण केल्या जात आहे..आणि

हे या गोष्टीवरूनच लक्षात येईल की,प्रज्ञासिंह ठाकूर ला आतंगवादी म्हणून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आता

जमानत वर बाहेर असतांना संरक्षणविषयी अतिमहत्वाच्या ठीकाणी निवड करण्यात आली आहे...

हेमंत करकरे नी प्रज्ञासिंह ठाकूरला जेलमध्ये टाकलं होतं ते हेमंत करकरे 26 नोव्हेंबर ला शहीद झाले होते

आणि आता 26 नोव्हेंबर समोरच प्रज्ञासिंह ठाकूरला संरक्षणविषयी महत्वाच्या ठीकाणी नियुक्त करणे म्हणजे

संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे...

संविधानामुळे सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची जगात ओळख निर्माण झाली आहे...

संविधानातील प्रत्येक कायदा या देशाच्या हिताचा असून सर्वांना न्याय देणारा आहे...

परंतु या संविधानाची अमलबजावणी करणारे लोकं जातीयवादी असल्यामुळे संविधानची योग्य प्रकारे व

प्रामाणिकपणे अमलबजावणी होत नाही...

भारतीय संविधानामुळे भारतातील प्रत्येक नागरीक सुरक्षीत असुन कोणिही कोणावर अन्याय करू शकत नाही

जर कोणावर अन्याय झाला तर न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला देण्यात आला आहे....

भारतीय संविधानाची निष्पक्षपणे व प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली तर भारतातील विषमता नष्ट होऊन सर्व

भारतीय जनता सुखी व समृध्द होईल आणि विकासाच्या बाबतीत भारत देश या जगात नंबर 1 वर येईल...म्हणून

असं हे सोन्यापेक्षाही मुल्यवान भारतीय संविधान ज्या दिवशी भारत देशाला अर्पण करण्यात आलं तो दिवस....

26 नोव्हेबर...संविधान दिन - काळा दिवस नाही तर सुवर्ण दिन आहे...हे आपण लक्षात घेऊन हा दिवस

सणासारखा साजरा केला पाहीजे....

सर्वना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा !

साभार - सुशील चरण कासारे