मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा सरकारचा डाव मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा सरकारचा डाव - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, November 22, 2019

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा सरकारचा डाव

मुंबई केंद्रशासित प्रदेश, विदर्भ वेगळे राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राचे एक राज्य असे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यासाठी केंद्रातील सरकारला राज्यात राष्ट्रपती राजवट हवी आहे. ज्याप्रमाणे जम्मु काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवटीत जम्मु काश्मिरचे तीन तुकडे केले.





त्याप्रमाणे इथही महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घातला जात आहे. कॉंग्रेस पक्षाला आम्ही विचारतोय की, तुम्ही या कटात सहभागी आहात की नाही ? याचा खुलासा करावा.
आमचा दुसरा प्रश्न असा आहे की, काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे का ? कारण, कॉंग्रेस पक्षाने अद्यापही आम्ही शिवसेनेसोबतं युती करतोय अशी जाहिर घोषणा केली नाही. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही अधिकृत प्रवक्त्याने ही घोषणा केली नाही. कॉग्रेस पक्षाने याचाही खुलासा करावा.
जर महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले तर मुंबई केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागेल म्हणून मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी इथले राजकीय पक्ष जनतेला वेड्यात काढताय.

पहा प्रकाश आंबेडकर काय म्हणाले या प्रेस कॉन्फेरेंस मध्ये...येथे क्लिक करा 


गेली २६ दिवस केवळ बैठकांचा धुराळा उडविला जातोय परंतु ठोस काहीच घडतं नाही. मुंबई महाराष्ट्रातच रहावी म्हणून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत लढा देईल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा इथली जनता अजून विसरली नाहीये!

- ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर / अध्यक्ष - वंचित बहुजन आघाडी