बाळासाहेबांनी मरमर केली तुमच्या साठी, आणि तुम्ही मरमर केली यांच्या साठी... बाळासाहेबांनी मरमर केली तुमच्या साठी, आणि तुम्ही मरमर केली यांच्या साठी... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, December 2, 2019

बाळासाहेबांनी मरमर केली तुमच्या साठी, आणि तुम्ही मरमर केली यांच्या साठी...

<img src="prakash-ambedkar.jpeg"= vanchit bahujan aghadi-prakash ambedkar">


वंचितांनो, विचार करा थोडासा..., जनते मधून हाक येत असताना सुद्धा बाळासाहेंबानी भाऊ भीमराज दुसरे

भाऊ आनंदराज किंवा मुलगा सुजात यांना उमेदवारी दिली नाही, केवळ तुमच्या-आमच्या साठी.

बाळासाहेंब- धनगर, बोद्ध, मुस्लिम वंचित मराठा समाजा बरोबर इथल्या छोट-छोट्या जात समूहांना

विधानसभेत पाठविण्यासाठी मरमर करत होते. आणि आपण ही खालील प्रस्थापित पाहुणे-राहूने विधानसभेत

जाण्यासाठी मरमर केली.
^
माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्रे अमित आणि धीरज हे दोघे सख्खे बंधू आमदार झाले

आहेत. अमित यांनी लातूर शहरातून आणि धीरज यांनी लातूर ग्रामीणमधून विजय मिळवला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातव्यांदा विधानसभेत आले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चुलत पुतणे रोहित

हे सु्द्धा आता सभागृहात दिसतील. अजित पवार यांचे दुसरे नातेवाईक राणा जगजितसिंह हे पण सभागृहात

असतील. पण ते या वेळी सत्ताधारी तर पवार हे विरोधी बाकांवर असतील.

काॅंग्रेसचे विश्वजित कदम यांच्यासोबत त्यांचे मावसबंधू विक्रम सावंत आणि त्यांच्या बहिणीचे दीर संजय जगताप

हे पण आता आमदार झाले आहेत.

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे जावई संग्राम थोपटे ही जोडी पुन्हा सभागृहात दिसेल.

बबनदादांचे बंधू संजय शिंदे हे पण आता करमाळ्याचे आमदार म्हणून सभागृहात असतील. संग्राम जगताप हे

दुसऱ्यनंदा निवडून आले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर येथून तर त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरीमधून निवडणूक

जिंकले. तनपुरे यांनीच कर्डिले यांचा पराभव केला. त्यामुळे मामा-भाचे अशी नवीन जोडी विधानसभेत असेल.

विधानसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य (सलग आठ वेळा निवडून आलेले) बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून मोनिका

राजळे आणि भाचेजावई शंकरराव गडाख हे तिघेही आता आमदार झाले आहेत. भाजपचे आमदार व माजी मंत्री

बबनराव पाचपुते व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक हे दोघे व्याही नव्या सभागृहात आहेत. नाईक

यांच्या कन्येचा पाचपुते यांचा मुलगा विक्रम यांच्याशी विवाह झाला आहे.

वसईमधून हितेंद्र ठाकूर तर त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर विधानसभेवर निवडून गेल्याने सासरे

एका सभागृहात आणि जावई दुसऱ्या सभागृहात असे चित्र राहील. आधी दोघेही एकाच सभागृहात म्हणजे विधान

परिषदेत होते. तसेच मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य रामदास कदम यांचे पुत्र योगेश हे नव्या विधानसभेचे

सदस्य झाले आहेत. काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील हे विधान परिषदेत आहेत. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे

विधानसभेत नव्याने आमदार झाले आहेत. विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांचे वडिल अरुणकाका हे

विधान परिषदेचे सदस्य आहेतच.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे विधानसभेत आणि त्यांचे मेव्हणे सुधीर तांबे हे विधान परिषदेत आहेत.

साभार :

संदीप साळवे,

वंचित बहुजन आघाडी समर्थक,जालना.