१९९० चा तो काळ,देशातील सर्वात भयंकर काळ.कारण यानंतरच देशात स्वातंत्रानंतर पुन्हा एकदा जातीवादाने
उच्चाग गाठला होता . होय तो काळ होता "मंडल आयोगाचा ." "मंडल आयोग" या महत्वपूर्ण मुद्द्यावर केंद्रात
व्ही पी सिंग सत्तेवर आलं होत .या आयोगाला लागू करण्यासाठी सर्व आंबेडकरी समाजातील नेत्यांनी प्रमुख
भूमिका निभावली होती आणि प्रामुख्याने प्रकाश आंबेडकरांनी यांनी आजतागायत प्रथमच व्ही पी सिंग
सरकारला पाठिंबा दिला होता .
पण जर का हा आयोग देशभर लागू झाला तर मात्र तिळमात्र ब्राह्मणांचा अस्तित्व नष्ट होऊ शकते याच भान
पण जर का हा आयोग देशभर लागू झाला तर मात्र तिळमात्र ब्राह्मणांचा अस्तित्व नष्ट होऊ शकते याच भान
ब्राह्मण नेत्यांना लागलं होत. तर मंडल आयोगासाठी देशात बर्याच राजकीय पार्टी सक्रिय होत्या .देशातील तीन
मोठ्या राज्यांकडे सर्वांची नजर होती .एक महाराष्ट्र आणि दुसरा उत्तर प्रदेश आणि तिसरा बिहार .मंडल
आयोगासाठी फक्त महाराष्ट्रातून आंबेडकरी समाजाने पुढाकार घेतला तर तिकडे उत्तर प्रदेशात आंबेडकरी
समाज जे मान्यवर कांशीरामजी यांच्या सोबत होते ते बहुजन समाज आणि बामसेफ समर्थक .पण अश्याच
परिस्तिथीत बिहारमधील जेव्हा जनता दलाचे लालू यादवही यात शामिल होतात याबद्दल फार कमी माहिती
आपल्याला माहिती आहे,ती जाणण्याचा प्रयत्न करू .
लालू प्रसाद यादव आणि मंडल आयोग
१९९० ला मंडल आयोग लागू होण्यासाठी लालू प्रसाद यांनी "करो या मरो"ची भूमिका घेतली होती .यात त्यांची
पूर्ण कारकीर्दच त्यांनी आपली पणाला लावली होती .मग ती लाठीचार्ज असो कि जेल भरो आंदोलन असो .
लालू प्रसाद यादव हे १९८९ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री झाले आणी त्यानंतर खर्या अर्थाने बिहारमध्ये
लालू प्रसाद यादव हे १९८९ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री झाले आणी त्यानंतर खर्या अर्थाने बिहारमध्ये
परिस्तिथी बदलण्यास सुरुवात झाली .बराच मागासलेल्या वर्गाला(दलित) पुढे आणण्यासाठी हालचाली होऊ
लागल्या .लालू यादव यांनी या मागासलेल्या जातींचं नेतृत्व केलं .आणि त्याचवेळी व्ही पी सिंग प्रधानमंत्री तर
देवीलाल उपप्रधानमंत्री झाले .चंद्रशेखर सिंग यांना या पदा पासून लांब ठेवण्यात आलं . पण याची सल म्हणून
सरकार अडचणींत आणणं हाच पर्याय आहे असं त्यांना वाटू लागणे आणि त्यासाठी लागणारा युक्तिवाद करू
लागले.
व्ही पी सिंग सरकार झाले अस्थिर
महत्वाचं म्हणजे देशातील उभरते उदयॊगपती धीरूभाई अंबानी हे चंद्रशेखर यांचे जवळचे मित्र होते आणि ते
आपल्या मित्राला सर्वोच्च पद मिळाव यासाठी काहीहि करण्यास तयार होते .आणि मग देवीलाल यांनी व्ही पी
सिंग सरकारविरुद्ध बंड पुकारले आणि सरकार पडणार हे आता अटळ होत .पण तेवढ्यात लालू यादव
रामविलास पासवान आणि शरद यादव या त्रिकुटांनी सरकारला आपल्या पार्टीचा पाठिंबा दिला आणि सरकार
स्थिरावले .
काही दिवसातच या तिघांनी सरकारला मंडल आयोग लागू करण्याची आठवण करून दिली .आधीच सर्व
काही दिवसातच या तिघांनी सरकारला मंडल आयोग लागू करण्याची आठवण करून दिली .आधीच सर्व
बाजूनी अडचणीत असलेल्या व्ही पी सिंग सरकारने शेवटी ९ ऑगस्ट १९९० ला देश भर मंडल आयोग लागू
केल्याची घोषणा केली. देशातील बहुजन समाजाने सुखाचा श्वास घेतला.
मंडळ आयोग आणि ब्राह्मणी षडयंत्र
पण तिकडे याच बहुजनांविरुद्ध मात्र ब्राह्मण समाज पेटून उठला आणि त्यासाठीच राजकीय स्थान असलेल्या
भारतीय जनता पार्टी आर एस एस सारख्या संघटनेन्यांनी तो विरोध उचलून धरला आणि टिकवून ठेवला आणि
मग याला विरोध म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली "राम मंदिर रथ यात्रे"चं आयोजन केलं. त्याला
पाठिंबा म्हणून देशातील ब्राह्मणी धर्माचा पुढाकार आणि रक्षण करणाऱ्या अनेक नेत्यांनी-राजकर्त्यांनी केला
.महाराष्ट्रातून शिवसेनेचे बाळ ठाकरे तर इतर ब्राह्मणी संघटना यात शामिल झाल्या .सर्वाना हिंदू या नावाखाली
एक करून बरेच बहुजन त्यात असंख्य संख्येने सामील झाले .एकीकडे सामाजिक न्यायासाठी मंडल तर
दुसरीकडे सामाजिक तफावतेसाठी कमंडल करून देशात विभाजन केली . पुढे त्याच काय झालं हे सर्व ज्ञात
आहेच .
चंद्रशेखर विजयी पथावर
शेवटी व्ही पी सिंग सरकार पडले आणि चंद्रशेखर प्रधानमंत्री झाले .मुख्यमंत्री म्हणून काम करणारे लालू प्रसाद
शेवटी व्ही पी सिंग सरकार पडले आणि चंद्रशेखर प्रधानमंत्री झाले .मुख्यमंत्री म्हणून काम करणारे लालू प्रसाद
यादव उत्तर भारतातील मंडल आयोगच्या लढाईचे नायक म्हणून पुढे आले होते.मंडल आयोगासाठी लालूंनी
शरद यादवांना मधेपुरामधून उत्तर प्रदेशात पाठविले.मंडल आयोगासाठी लालूंनी मोठ-मोठ्या रॅली केल्या त्यांनी
आपला आवाज रस्त्यावर संसदेत आणि कोर्टात पोहचविला त्यांच्या रॅली देशभरात दिल्ली लखनऊ पाटणा आदी
ठिकाणी चालूच होत्या.
याच काळात जेल भरो आंदोलने झाली लालू यादव यांनी वकील राम जेठमलानी सोबत मंडल आयोगाची केस
जिंकली आणि सुप्रीम कोर्टाने १६ नोव्हेंबर १९९२ ला मंडल आयोग लागू करण्याची मागणीला पाठिंबा
दिला.आणि पुढे एम एच कानिया यांच्या नेतृत्वाखाली बहु-सदसीय समिती नेमली आणि त्या समितीनेही काही
थोडाफार फेरफार करत मंडल आयोग लागू करण्याचा अंतिम निर्णय दिला .परंतु लालू यादव हे मंडल अयोग
लागू होई पर्यंत थंड बसले नाहीत .
लालूंची बेईजत्ती
याचा फटका लवकरच ब्राह्मणी मीडियाकडून लालूंना मिळाला .सर्व माडीयांना लालूंची टिंगल टवाळी करू
लागली जी आजतागायत चालूच आहे . लालू यवाद मुख्यमंत्री असून देखील टीकेच्या विविध प्रकारे जोरदार
हल्ला केला त्यांना वेगळ्या रूपात मीडियाने पेश केले .त्यातच "चारा घोटाळा" या नावात फक्त लालू यादव
दिसतात पण ज्यां हा घोटाळा केला तो जगन्नाथ मिश्रा चारा चोर नाही पण चारा घोटाळा उघड करणारे लालू
यादव मात्र चारा -चोर .याचा परिणाम आताही आपल्याला दिसतो सरकारतर्फे चालू असलेली चौकशी .लालू
यादव यांच्याबद्दल गैरसमज अजूनही समाजात फैलावलेला दिसतो .
लालू यादव यांचा मुख्य दोन अपराध
पहिला अपराध मंडल अयोग्य लागू करण्यासाठी सतत मागणी करणे
दुसरा ब्राह्मणी धर्माने हिंदू धर्माच्या नावाने चालविलेला राम रथ रोखून येणाऱ्या पुढील भयंकर घटनांना आला
घालणे . पण ते असफल ठरले आणि बाबरी मस्जिद विध्वंस कारण्यार ब्राह्मणी षडयंत्र यशस्वी झाले .
ऐतिहासिक क्षण
इतिहासात अशी बरीच उदाहरणे आहेत कि जेव्हा जेव्हा एखादा गैर सवर्ण जातीचा व्यक्ती समाजाच्या न्याय-
ऐतिहासिक क्षण
इतिहासात अशी बरीच उदाहरणे आहेत कि जेव्हा जेव्हा एखादा गैर सवर्ण जातीचा व्यक्ती समाजाच्या न्याय-
हक्कासाठी साठी आवाज उठवितो तेव्हा तेव्हा काय झालं आहे त्यांचं मग ते बली महिषासुर,हिरण्यकश्यपू आदी
असो त्यांचा मृत्यू-हत्या दिन हाच जल्लोष दिन आपल्याला साजरा करायला भाग पडलेलं आहे. याला चाराचोर
म्हणून प्रचलित असणारे लालू यादव एक. जर का देशात भारतीय संविधान योग्य रीतीने काम करत नसत तर
एव्हाना लालूंचा वध झालाच असता आणि जर का लालू १०० वर्षा अगोदर जरी जन्मले असते तर त्यांचा वध होणे
कोणी टाळू शकले नसते .लालूंनी सामाजिक धर्म निरपेक्षच पालन मंडल आयोगासाठी केलं यात वाद मुळीच
नाही .
References : "Yadav times" - Writer-Chandra Bhushan Singh Yadav
References : "Yadav times" - Writer-Chandra Bhushan Singh Yadav