"कोपर्डी हत्याकांड"चा निकाल लावण्यात कोर्टाने आणि सरकारने दाखवलेली जबाबदारी विश्वसनीय आहे का ?
सरकारी वकिल उज्ज्वल निकम सध्या फुल फॉर्मात आहेत .कोपर्डी हत्याकांडामध्ये बौद्ध -आंबेडकरी समाजाची
व्यक्ती सहभागी होती असा भ्रम बाळगून राजकीय शक्कल देनारा व रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा
मराठा समाज पहिल्यांदाच दिसला .आणि झटपट मोर्चे निघाले.पण पण हा भ्रम तुटण्यास फार वेळ लागला नाही
कारण त्या घटनेशी बौद्ध तरुणांचा किंवा आंबेडकरी समाजाचा संबंध नव्हता .मग हेच मोर्चे "मूक मोर्चा"त
बदलण्यात आले.राज्यकर्त्यानाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असूनही या मोर्चाणे तसं काहीच साध्य झाले नाही
उलट ज्या ऍट्रॉसिटी कायद्याची बंदीसाठी मागणी होती उलट ती अजून कडक झाली .
पण कोपर्डीच्या निकालात उज्ज्वल निकम यांनी बाजी मारली.कदाचित उज्ज्वल निकम यांनी आपली कारकीर्द
पणाला लावली असं म्हणणं ठीक वाटत नाही .उज्ज्वल निकम यांनी फार शिताफीने आणि बहादूर पणे केस
हाताळली होती असं त्यांचं म्हणणं आहे तर ते पुढे छाती फुगवून असही म्हणतात कि ठोस पुराव्या अभावी
देखील आम्ही हि केस जिंकली .आता प्रश्न असा कि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खरंच आपल्या
कर्तृत्वाने केस जिंकली कि आणखीन काही आहे यामागे याचं त्यांनाच ठाऊक .
उज्ज्वल निकम "कसाब प्रकरणा"ने संपूर्ण देशाचे परिचयाचे झाले .या प्रकरणात विडिओ फुटेज रक्तपात आणि
जनतेची मत घेऊनही उज्ज्वल निकम यांना किती वर्ष लागली हे सिद्ध करायला कि कसाब हाच मुंबई हल्ल्यात
शामिल आहे .तर अजून एक प्रकार आहे ज्यात उज्ज्वल निकम यांनी १० वर्षांपेक्षा अधिक काळ घेऊनही निकाल
शून्य होता . दहा वर्ष फक्त सरकारी बाबू म्हणून काढले असं म्हटलं तर यात वावगं ठरणार नाही .
होय सर्वांच्या लक्षात आलं असेलच भंडारा जिल्यातील "भोतमांगे हत्याकांड" अर्थात "खैरलांजी हत्याकांड" .याची
होय सर्वांच्या लक्षात आलं असेलच भंडारा जिल्यातील "भोतमांगे हत्याकांड" अर्थात "खैरलांजी हत्याकांड" .याची
सर्व सूत्रे निकमांकडे पहिल्यापासून होती .आपल्या परिवारावर झालेल्या अत्याचार याला न्याय मिळावा म्हणून
बळी गेलेल्या मुला मुलीचे वडील भैयालाल गेली दहा वर्षांपासून या केसाच्या मागे होते शेवटी त्यांनीही
आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय न देताच अखेरचा श्वास घेतला . या प्रकरणात सगळी लागणारी यंत्रणा
निकामांकडे होती लागणारे सर्व पुरावे उपलब्ध होते इतकेच काय गावातील अन्य साक्षीदारही होते .एवढं सर्व
असताना देखील पण उज्ज्वल निकम मात्र यात सपशेल अपयशी ठरतात .का ??????
फरक इतकाच भोतमांगे कुटुंब बौद्ध समाजातील आणि अत्याचारी मराठा समाजातील. भले ते असतील छोट्या
मोठ्या राजकारणी घराण्यातले,पण नि:पक्षपातपणा तुम्ही नाही दाखवू शकलात आणि तेही सर्व पुरावे हाताशी
असताना .तर कोपर्डी प्रकरणात पीडित मुलगी मराठा समाजाची तर अत्याचार मागासलेल्या वर्गाची .बिना पुरावा
तुम्ही दोषींना सजा देण्यात यशस्वी झालात . यात उज्ज्वल निकम यांनी दाखवून दिल कि ज्यांची सत्ता असते
त्यांना न्याय मिळणे कठीण नाह,याबद्दल तुमचे आभार .