विद्यार्थी दिवस : भूतकाळ-वर्तमान काळ-भविष्यकाळ विद्यार्थी दिवस : भूतकाळ-वर्तमान काळ-भविष्यकाळ - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, November 12, 2017

विद्यार्थी दिवस : भूतकाळ-वर्तमान काळ-भविष्यकाळ

<img src="विद्यार्थी-दिवस.jpeg"=dr ambedka school fist day-विद्यार्थी दिवस ">



नुकताच ७ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला. सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिवस म्हणून "विद्यार्थी दिवस " साजरा करावा असं परिपत्रक 

काढून त्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला .राज्यभर काही शाळेत विद्यार्थी दिवस म्हणून साजरा 

करण्यात आला .मुख्य कार्यक्रम बाबासाहेबानी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या सातार्यातील प्रतापसिंग हायस्कुल 

मध्ये अप्रतिम साजरा करण्यात आला .या प्रसंगी इतर मान्यवरांमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले 

यांचा हि सहभाग होता .या प्रसंगी विविध कार्यक्रमाचं उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत . 

मुख्य प्रश्न

"विद्यार्थी दिवस "साजरा करण्यासाठी शासनाने आणि आंबेडकरी विचारधारेन किती प्रयत्न केला हा वादाचा मुद्दा 

आहे .मुख्यता: भाजपा सरकार हे मार्केटिंग वर टिकून आहे .कोणासाठी कधी आणि काय करावं हे त्यांना 

चांगलच ठाऊक आहे .त्यामुळेच बहुदा काही मोजक्या नाशनल न्युज मध्ये बातमी आली होती. पण काय 

आंबेडकरी समाजानं हा दिवस शाळेत साजरा करण्यासाठी किती प्रयत्न केले असावे हे सांगणं कठीण 

आहे.ज्यांनी खरोखरच प्रयत्न केला त्यांना निळा सलाम!

बाबासाहेबांचा शिक्षणाचा प्रवासाची सुरुवात

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ १८९४ मध्ये ब्रिटिश सेनेतून रिटायर्ड झाले आणि ते महू 

वरून आपल्या मुख्य गावी म्हणजे दापोली-कॅम्प मध्ये आले. १८९६ साली त्यांनी दापोली सोडून कुटुंबासोबत 

सातार्यात गेले.१९०७ साली ७ नोव्हेंबरला त्यांनी भीमाला सातार्यातील जुना राजवाडा येथील सातारा हायस्कुल (जे 

आता प्रतापसिंग हायस्कुल म्हणून प्रचलित आहे) शाळेत पहिल्या इयत्तेत घातले . आजच्या घडीला या घटनेला 

११७ वर्ष लोटली आहेत .भीमाने (अर्थात) बाबासाहेबानी चार वर्ष या शाळेत शिक्षण घेतलं .

शाळेचा इतिहास

छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे नातू छत्रपती प्रतापसिंग भोसले महाराज यांनी सातारा भागात १८०८ ते 

१८३९ पर्यंत राजे म्हणून काम पाहिले. साताऱ्यात शिक्षण, वाचन संस्कृती चळवळ सुरु करण्याचं काम छत्रपती 

प्रतापसिंह महाराजांनी केलं होतं. त्या काळात त्यांनी पुणे-सातारा मार्ग, सातारा महाबळेश्वर मार्ग बांधले, तसेच 

नगर वाचनालय व ही शाळा सुरु केली होती. ही शाळा सुरुवातीला रंगमहाल येथे होती. १८७१ मध्ये या शाळेचे 

रुपांतर माध्यमिक शाळेत झाले.

या शाळेतून अनेक मोठ-मोठी व्यक्तिमत्वे आकाराला आलीत. त्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. 

बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणतज्ञ कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर, सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध न्यायमूर्ती 

प्रल्हाद गजेंद्रगडकर, इंग्लंड मधील भारताचे राजदूत आप्पासाहेब पंत, कुलगुरू शिवाजीराव भोसले, रंग्लर 

परांजपे अशी काही नावे सांगता येतील.
किती महत्वाचा दिवस

त्याकाळात ब्राह्मणी धर्मग्रंथानी कळस गाठून एक नवीन वर्ग तयार केला होता तो म्हणजे अस्पृश्यता आणि याच 

जातीत बाबासाहेब आंबेडकर जन्मले आणि म्हणूनच त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीला अधिक महत्व प्राप्त होत .

ब्राह्मणी धर्म ग्रंथानि या जातीवर इतर जातिपेक्षा सर्वात जास्त अमानुष अमानवीय अन्याय अत्याचार केलेत आणि 

त्यांच्यावर अनेक बंधन लादून जवळ जवळ सगळ्याच समाजातून बहिष्कृत केले होते .

७ नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या आयुष्यात अत्यंत मोलाचा दिवस आहेच पण अस्पृश्यता आणि संपूर्ण 

बहुजन समाजाचा महत्वाचा दिवस आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. 

त्यांनी ज्ञान, कौशल्य व कृती यांच्या जोरावर भारतीय समाजात क्रांती घडविली. जगातील अत्युत्तम संविधान 

भारताला देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकाराची पायाभरणी या शाळेत झाली होती. वंचित, श्रमिक, महिला, 

शेतकरी इत्यादींसाठी अनेकाविध क्षेत्रात झटणारा भीमराव या शाळेत घडला. या शाळेने कायदेपंडित, 

धर्मसुधारक, धम्मप्रवर्तक, पत्रकार,युगप्रवर्तक,स्वाभिमानी,युगांधार इत्यादी चौफेर व्यक्तिमत्वाच्या भिमारावांच्या 

शिक्षणाची सुरुवात या शाळेत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी व 

इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारक घटना होती. बाबासाहेबांचे शिक्षण या शाळेत सुरू झाले 

नसते तर...

हा खरोखरच विचार आणि चिंता करायला लावणारा गूढ प्रश्न आहे.

बाबासाहेबाना मिळालेलं आंबेडकर हे आडनाव देखील याच शाळेत मिळालं .पूर्वापासून तर आजही काही लोक 

आपल्या नावापुढे आडनाव म्हणून गावाचे नाव लावतात .आणि त्यानुसार बाबासाहेबांचं गाव आंबडवे होत आणि 

म्हणून बाबासाहेबांचं नाव भीमा रामजी आंबडवेकर असं पूर्ण नाव होत होत. जे उच्चारायला थोडं कठीण 

असल्यानं तेथील कृष्णाजी केशव आंबेडकर ज्यांचा भीमाच्या बुद्धिमतेवर विश्वास होता त्यांनी भीमाच आडनाव 

बदलून आंबेडकर केलं आणि भीमा रामजी आंबेडकर असं पूर्ण नावाची नोंद आणि याचा दस्तावेज आजही 

शाळेत उपलब्ध आहे .
केव्हापासून साजरा केला जातोय

याच मुख्य श्रेय जात ज्येष्ठ पत्रकार विश्वम्भर जावळे यांना .सन २००० साली याच ७ नोव्हेम्बर = विध्यार्थी दिवसाला 

१०० वर्ष पूर्ण झाली होती आणि हा दिवस साजरा करण्यासाठी जावळे यांनी पुढाकार घेतला होता .हा दिवस 

प्रताप सिंग हायस्कुल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात त्यांना यश आलं होत. आणि मग गेली १५-१६ वर्ष 

सातत्याने हा दिवस शाळेत करण्यात येत होता . जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती महाराष्ट्र 

सरकारने (भाजप ) ने जाहीर करून ती शासकीय पातळीवरही उत्तमरीत्या साजरी करण्यात आली .आणि 

याचच औचित्य साधून जावळे आणि इतर काही संघटनेनं महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरवठा करून महाराष्ट्रभर - 

देशभर ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी विनंती आणि मागणी केली 

.तेव्हा राजकुमार बडोले यांनी यात लक्ष घालून यावर्षी प्रथमच राज्यभर विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला . 

वर्तमान परिस्तिथी

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच वावरत आले .कारण कोणत्याही गोष्टीत पूर्णता: लक्ष 

घालून त्यावर त्यांची पुढील कार्य ठरायचं .मग बाबासाहेबानी केलेला सत्याग्रह -महाड चवदार तळे ,काळाराम 

मंदिर इ. किंवा धर्म परिवर्तनासाठी हिंदू धर्मासकट इतर धर्माचा अभ्यास करून बौद्ध धम्मात प्रवेश किंवा 

भारतीय संविधान तयार करण्यासाठी इतर देशातील संविधानाचे वाचन आणि प्रत्यक्ष देशातील जातपात 

विभागणी कार्यपद्धती . पण आजच्या घडीला काय "विद्यार्थी दिवस " साजरा करायला अर्थ उरतो का ?

कारण :

काय शाळांच्या 4 9% मुलांपैकी अनुसूचित जाती / जमाती आहेत आणि २५% मुस्लिम आहेत? हे खरोखर 

लज्जास्पद आहे की कायद्यांनंतरसुद्धा मागासवर्गीय-दलित लोकांसाठी काहीही बदललेले नाही

शालेय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षकांकडून मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी)-दलित विद्यार्थ्यांना 

अमानुष वागणूक आणि भेदभाव यामुळे प्रामुख्याने वंचित केले जाते.

अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शाळेच्या बाहेर बसवलं जात
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शाळेचं आवर परिसर साफ सफाई करायला सांगण्यात येत .
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शैलीचा बाथरूम साफ करायला सांगण्यात येत
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शाळेत पाणी पिण्यासाठी योग्य ती सोय नाही

अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) वर्गाच्या शेवटच्या बाकावर बसवलं जात
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) वर्गच नाही त्यांची शाळा कुठल्यातरी झाडाच्या खाली बसते
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शाळेत / विद्यापीठात मारलं जात आहे
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) ठराविक ठिकाणी गेल्यावर त्याठिकाणी गोमूत्र शिंपडून 

जागा पवित्र करण्यात येते . 

अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शिष्यवृत्ती मिळत नाही किंवा झगडावे लागते
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) शाळेच्या मधल्या सुट्टीत वेगळ्या जागेत जाऊन आपला 

डब्बा संपवावा लागतो
अजूनही मागासवर्गीय-विद्यार्थ्याला(मलागा /मुलगी ) यांना वेगळ्या मैदानात सराव करावा लागतो

अश्याच आणखीही घटना नक्की वाचण्यात किंवा पाहण्यात आल्या असतील ...

वरील बरेच प्रसंग हे संपूर्ण देशभरातील आहेत.त्यामुळे एका बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा "विद्यार्थी 

दिवस " साजरा करण्यात कोणताच अर्थ नाही उरला असं म्हटलं तर अयोग्य ठरेल . पण यात बदल अपेक्षित 

आहे .त्यासाठी सर्वाना प्रयत्नशील असणे गरजेचं आहे .जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला समतेची वागणूक मिळेल तेव्हाच 

"विद्यार्थी दिवस"अधिक प्रभावी ठरेल . 

देशभरात विद्यार्थी दिवस काही ब्राह्मणी संघटने कडून आधीच साजरा केला जातो त्यात प्रामुख्याने स्वामी 

विवेकानंद आहेत तर काही दिवसांपूर्वी डॉ अब्दुल कलाम यांचा नावाचा देखील विद्यार्थी दिवसाची मागणी होत 

आहे .यात महाराष्ट्र भाजप सरकारने विद्यार्थी दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने काही धोरण 

ठेवल्याशिवाय ते शक्य नाही .कारण येणाऱ्या पुढील वर्षात याला फार मोठं तोंड आंबेडकरी अनुयायांना द्यावे 

लागणार आहे .
केव्हा यशस्वी होऊ शकतो विद्यार्थी दिवस 

जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला मग तो शाळेतला असो किंवा उंचच शिक्षण घेत असलेला समतेचं वातावरण मिळेल 

तेव्हा... 

जेव्हा कोणतीही जात मान्यता आड येणार नाही तेव्हा...

जेव्हा शिक्षक वर्ग एका विशिष्ट समाजाचा बदलून मागासवर्गीय -दलित यांची संख्या मोठ्याने वाढेल तेव्हा...

जेव्हा विद्यार्थ्याना पाणी पाण्यासाठी एकाच माठ किंवा नळ असेल तेव्हा...

जेव्हा शाळेच्या पुस्तकात बहुजन विचारसरणीचा वापर जास्त होईल तेव्हा...

जेव्हा शाळेचा मुख्याध्यापक मागासवर्गीय -दलित बनेल तेव्हा...

हे सर्व शक्य होईल जेव्हा देशात समतेचं युग येईल तेव्हा...

समतेचं युग येण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ मंत्र "शिका संघटित व्हा संघर्ष करा " हा जितका 

महत्वाचा आहे तितकाच "या देशाचे शासनकर्ते व्हा" हे देखील अत्यंत महत्वाचं आहे .नुसत्या संघटना बांधून 

आणि सामाजिक कार्य करून तुम्ही बाबासाहेबांचं मूळ स्वप्न पूर्ण करू शकणार नाही .
जाता जाता 

एका आंबेडकरी अनुयायि बौद्ध बांधव "पी एस इंगोले" यांनी विद्यार्थी दिवसावर एक छान कविता लिहिली आहे.

सात नोव्हेंबरची ती,पवित्र सकाळ
बाल भिवा हाती, रामजी सकपाळ
भिवास केले शाळेत, तयांनी दाखल

अठरा -अठरा तास, भिवाचा अभ्यास
भिवाने घेतला, विद्येचा मोठा ध्यास
प्रखर बुद्धिमत्तेचा सूर्य, तोचि खास
उजळविल्या तयाने, दाही हो दिशांस

विसाव्या शतकातला, एकमेव विद्यार्थी
आजीवन जगला, म्हणोनि तो विद्यार्थी
शिक्षणाची दारे, बंद होती तवा सर्वार्थी
वर्गाबाहेर घडलेला, 

तो एकमेव विद्यार्थी भिवाचा प्रवेश, 

तो लोकशाहीचा प्रवेश

स्वातंत्र्य समता बंधुतेचा होता तो प्रवेश

संविधान निर्मात्याचा, होता तोचि प्रवेश

विसाव्या शतकातल्या, सूर्याचा तो प्रवेश

दीन दलितांच्या ह्यदयातील, तो प्रवेश
सर्वधर्मसमभावनेचा होता तोचि प्रवेश

माता भगिनींच्या, ह्यदयातील तो प्रवेश
हिंदु कोड बिलाचा, तो एकमेव प्रवेश

स्वदेसे सर्वेच, हो राजांसी पुज्यते
विद्वानांस मात्र, सर्व जगच पुज्यते बाल भिवास, आज सर्वजग पुज्यते
बाल भिवाचा, बाणा सत्यमेव जयते 

एकशे सतरा वरसे, झाली त्या घटनेला
भिवाचा प्रवेश, होता भारतीय घटनेला
भारतमातेस ठेवणे, होते एकसंघटनेला
भिवाची लेखनी,

संविधानात एकवटनेला विद्यार्थी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

प्रत्येक विद्यार्थ्याचे ऊर्जास्त्रोत, प्रेरणास्थान, विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा सातारा येथे 

शाळा प्रवेश दिन आणि एका नवीन क्रांतीस सुरुवात...