मागास्वर्गीयांबद्दल नेहमी वाचण्यात येणाऱ्या अफवा मागास्वर्गीयांबद्दल नेहमी वाचण्यात येणाऱ्या अफवा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, August 12, 2017

मागास्वर्गीयांबद्दल नेहमी वाचण्यात येणाऱ्या अफवा

<img src="viral-sach.jpeg"=bahujan samaj growth viral-sach">
 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दबलेल्या आणि खचलेल्या समाजाला भारताच्या संविधानात विशेष अधिकार

दिलेले आहेत .बाबासाहेबानी त्यांना एस.सी.,एस.टी.,एन.टी.ओ.बी.सी. (SC,ST,NT,OBC) अश्या वेगवेगळ्या

विभागात स्थान दिले आणि संविधानात भारतातल्या या सहा हजार जातींचा समावेश केला .ह्या एकूण समाजाला

बहुजन समाज असही संबोधलं जात .बाबासाहेबानी जे अधिकार या बहुजन समाजाला दिले त्यापैकी एक म्हणजे

आरक्षण.याचा फायदा सर्व जातीतल्या मुला बाळांना व बर्याच कुटुंबाना झाला .त्यातले किती लोकांनी

बाबासाहेबांचे आभार मानले हा शोध-कार्याचा विषय आहे. परंतु आताच्या काळात यांना बाबासाहेब


कोण आणि काय होते हे कळून चुकले आहे .

तर दुसरीकडे उच्चं जातीवाल्याना याचा फार तिरस्कार येतो आणि ते नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा

तिरस्कार करतातच पण या मागासवर्गीयांचा( बहुजन समाजाचा ) हि तिरस्कार करतात . यासाठी त्यांनी स्वता:चा

मीडिया वापरात आणलाच आहे त्याबरोबर सोशल मीडिया देखील ते चांगल्या प्रकारे वापरात आहेत .

या उच्चं जातीत ब्राह्मणा व्यतिरिक्त ब्राह्मणवादात फसलेल्या किंवा त्यांच्या इतर धर्म कांडात अडकलेल्या राजपूत

ठाकूर आणि अजाण असलेले एस.सी.,एस.टी.,एन.टी.ओ.बी.सी.हि आहेत .यांच्या डोळ्यावर ब्राह्मणवादाची

पट्टीच आहे.जो समाज आज आरक्षण आणि आपले इतर संविधानिक अधिकार घेऊन चांगल्या हुद्द्यावर आहे

आणि त्याचे जीवन सुखी समृद्ध आहे हे त्यांच्या नियमावलीत बसत नाही.अश्या लोकांविरुद्ध / समाजाविरुद्ध

आपल्याला काही न्युज पोस्ट विडिओ ऐकायला व पाहायला मिळतो जो ब्राह्मणवाद्यानी तयार केलेला एक खोटा

प्रचार असतो .




त्यातील काही उदाहरणे अशी :

1.आरक्षण हे फक्त १० वर्ष होत .

2.जर बहुजन समाजाने (दलित म्हणून कु-प्रचलित असलेल्या )  स्वता:चा काही मुद्दा समाजापुढे मांडायचा प्रयत्न 

केला तर त्यांना रामदास ,उदित,रामविलास इत्यादींची उदाहरणे देऊन गप्प करतात .

या पृथ्वीवर सर्वात ताकतवर आणि शक्तिशाली कोणता वर्ग असेल तर तो फक्त आणि फक्त ब्राह्मण समाजाचं 

आहे .

3.श्रीमंत झालेला दलित माणूस हाच तुमचे गरिबांच्या नोकरी आणि शिक्षण चोरी करीत आहे .

4.शहरी विभागात जातीवाद बिलकुल नाही आहे .

5.तुमचं आडनाव बदलून किंवा न वापरता देखील जातीवाद नष्ट करू शकतो .

6.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी " संविधान " इतर देशाचं चोरून फक्त कॉपी पेस्ट केलं आहे .

7.सयाजीराव गायकवाड नसते तर बाबासाहेब कधीच शिकले नसते .

8.छ शिवाजी महाराजांचे आद्यगुरू हे संत रामदास होते.

9.सार्वजनिक ठिकाणी दलित हा शब्द वापराने हेच अनिवार्य आहे .

10.नेहमी चाम्भार महार मराठा भंगी इत्यादी नावाचा जयघोष करून त्यांच्या भावनेशी खेळावं .

113गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे .

12.जर कोणत्याही मागासवर्गीय-दलित व्यक्तीवर अत्याचार बलात्कार इत्यादी घटना घडतात त्याला फक्त त्यांचा 

आप आपसातले झगडे आणि यात कोणताही जातीवाद नाही हे कारण देऊन मामला राफा दफन करणे .

13.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त त्यांच्या समाजासाठीच काम केलय कारण त्यांच्याकडे विशेष असं 

काहीही (काम ) नव्हतं .

14.ह्या मागासवर्गीय-दलित समाजातील व्यक्ती फक्त आरक्षणामुळेच देशाला बरबाद केलं आहे .

15.छ संभाजी महाराज हे स्त्री लंपट होते .

16.उंचच पदावर (आय पी एस/तलाठी/मॅनेजर) लायकी नसताना देखील फक्त आरक्षणामुळे इथे पोहचला आहे

17.इकडे ९०% पेक्षा जास्त असूनही ऍडमिशन मिळत नाही तर या लोकांना साधे ५०% मार्क्स देखील नाही तर 

त्यांना आरक्षांद्वारे ऍडमिशन मिळते .

18.जर मागासवर्गीय-दलित घरातील मुलगी शाळा कॉलेज मध्ये शिकत असेल आणि ती चांगले आणि व्यवस्थित 

कपडे घालत असेल तर ती इतर लोकांच्या मनात वासना उत्पन्न करते .

19.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती म्हणा किंवा त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणा हे लोक दारू ढोसून 

धिंगाणा करतात .

20.जे लोक डॉ आंबेडकर यांना आदर्श मानतात त्यांना नेहमीच अपयश येत.

21.पेशवे यांनीच या महाराष्ट्राच्या उद्धारासाठी योग्य ती पावले उचलली आहेत आणि या पेशव्यानीच महाराष्ट्राची 

परंपरा जपून ठेवली.   

22.ब्राह्मणवाद हिंदूवाद आणि हिंदू हे वेगवेगळे आहेत आणि यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही .

23डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण जातीचे होते .

24.या आरक्षणामुळेच आज भारत देशाला जगापुढे मान खाली घ्यावी लागत आहे .

25.मागासवर्गीय-दलित लोक सर्वात खतरनाक आणि रागीट असतात,कारण ते मटणाचे सेवन अधिक प्रमाणात 

करतात.

26. भारतातील जाती व्यवस्था हि फक्त ब्रिटीशानी हिंदू धर्म तोडण्यासाठी निर्माण केल्या आहेत .

27.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त एका जाती पुरते मर्यादित करू नका . 
तुमच्या वाचण्यात ऐकण्यात यातलं काही आलं आहे का ?जर तुमच्या वाचण्यात या व्यतिरिक्त अजून काही 

असेल तर ते जरूर सांगा . याच प्रकारच्या अश्या अनेक मोठ्या मोठ्या काही खोट्या पुराव्यासकट वाचायला 

किंवा पाहायला मिळतील .

मग अश्यावेळी काय खर आणि काय खोट याची पडताळणी कशी करायची?. जर तुमच्याकडे वाचण्यासाठी

पुस्तके उपलब्ध नसतील तरीही आजच्या इंटरनेटच्या युगात सर्व शक्य आहे .जी माहिती आपण वाचतो पाहतो

त्याची गुगल वर जाऊन पडताळणी करा .जर तिथे नाहीच मिळाली तर योग्य त्या व्यक्तीला याबद्दल विचारपूस

करा .पण भ्रमात राहू नका आणि समाजात असाल विष पेरू देऊ नका .

No comments:

Post a Comment