बी.एम.सी म्हणजेच ब्रह्न्मुंबई महानगर पालिका .देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठी महानगपालिका
म्हणजेच बी.एम.सी होय . १८८८ साली स्थापन झालेल्या या संस्थेनं बराच लांबचा पल्ला गाठला आहे. .मुंबई मध्ये
होणार्या कचऱ्याचं निवारण करणे ,मुंबई मध्ये सणासुदीला योग्य ती सुविधा देणं.तसेच मुंबईला घरोघरी स्वच्छ
पाण्याचा पुरवठा करणें .या आणि बर्याच कार्यात बी.एम.सी काम करते .
सुरुवातीला बी.एम.सी मध्ये अस्पृश्य समाज हा प्रामुख्याने त्यात होता आणि दिवसेंदिवस या बी.एम.सी च्या
विस्तारा सोबत या समाजाचीही त्यात वाढ झाली .एक तर कोणी आपल्याला जवळ घेत नाही ,खायायाला अन्न
नाही ,कोणी साधं भीक हि देत नाही ,मग अश्यातच ( ब्रिटिश मिलिटरी व्यतिरिक्त ) बी.एम.सी हि एकच
सेवा होती जी या अस्पृश्य समाजाला मिळत होती . त्यामुळेच बी.एम.सी. आणि अस्पृश्य( पुढे
आंबेडकरी) समाजाचं अतुट असं नातं तयार झालं आहे. अस्पृश्य समाज यात प्रामुख्याने महार ,मांग ,भंगी
येत .पुढे देशात क्रान्तीचे वारे वाहू लागले आणि हा समाज त्याचा एक हिंसा होऊ लागला .
याच अस्पृश्य महार समाजात एक क्रान्तिसूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला .
बाबासाहेबानी स्वता:च्या संसाराची व जीवाची पर्वा न करता एक एक आंदोलन करत ,एक एक संघर्ष करत या
कचर्याच्या ढिगारात पडलेल्या समाजाला बाहेर काढून १४ ओक्टोम्बर १९५६ ला एक तर्क शुद्ध असा बौद्ध धम्म
दिला आणि या जगाचा ६ डिसेंबर १९५६ ला निरोप घेतला.परंतु बाबासाहेबांचे बोल आजही आपल्या कानात
हृदयात दुमदुमताहेत .
पुढे हाच बी.एम.सी मधील अस्पृश्य समाज बौद्ध धम्म दीक्षेमुळे बौद्ध-नवबौध्द झाला आणि स्वताची प्रगती हळू
हळू करू लागला. सर्वप्रथम शिक्षणाला मग राहणीमानाला आणि मग नोकरी ला प्राधान्य देऊन संसाराची
वाटचाल धरू लागला .
बी.एम.सी. मधील नोकरी मात्र पक्की करत हा समाज आघाडीवर आला .आजच्या घडीला देखील ८०-९०%
लोक हि आंबेडकरी समाजाची आहेत .त्यात नव्याने वाल्मिकी समाज ,भंगी ,काही मागासलेले कन्नड आणि उत्तर
भारतीय शामिल झालेले आहेत पण ते एवढ्या मोठ्या विस्तारलेल्या आंबेडकरी समाजासोबत बरोबरी नाही करू
शकत .तर दुसरीकडे अधिकारी पदावर पहिल्यापासूनच सवर्ण - ब्राह्मण जातीचा माणूस फिक्स्च होता .बाकी
काही आंबेडकरी समाजाची लोक शिकून सवरून ऑफिस मध्ये कारकून आणि इतर पदे मिळवली पण मुख्य
अधिकारी पदाजवळ त्यांना पोहचता नाही आलं .
याच बी.एम.सी. मध्ये सफाई कामगारांसाठी राबविण्यात आलेली पि.टी. केस हि एक कीड आहे असं म्हटलं तर
वावगं ठरणार नाही . या पि.टी. केस मुळे कित्येक कुटुंब वसली तर अशी अनेक विखुरली गेली . बी.एम.सी.चा
मूळ उद्देश्य होता साफ सफाई करणे व परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्यासाठी लागणारी कामगारांची भरती करणे
.आणि पी टी केस चा उद्देश्य होता कि अश्या घाणीत काम करण्यानं कामगारांचं आरोग्य धोक्यात येई आणि
त्याच्या जीवाला धोका निर्माण होई.अचानक घरातील मुख्य व्यक्ती मरण पावला तर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह
कसा चालणार.अशातच उपाय म्हणून त्या कुटुंबातील मुलाला नोकरी देणे. अस्पृश्य समाजाने तर हेच आपलं
कर्म आहे असं समजून यावरच आपली पकड चांगली घट्ट ठेवली .हि पि.टी. केस आई वडील काका काकी भाऊ
नवरा इ मार्फत मिळवु लागले.या पि.टी. केसमुळे कित्येकांना प्राणही गमवावा लागल आहे. पि.टी. केसच्या
घरातील काही प्रसंग.....
- मुलगा म्हणतो आपल्याला बापाची नोकरी तर मिळणारच आहे,मग कशाला शिका .तरीही तो कसा बसा सातवी पर्यंत म्युनिसिपल शाळेत शिक्षण घेतो .मग जमले तर दहावी पर्यंत शिक्षण घेतो.( यातील काही अपवाद सोडून .आता बरेच जण पंधरावी / स्नातक होऊन चांगल्या ठिकाणी काम करीत आहेत )
- बर्याच घरात आई बापाची नोकरी मिळावी या साठी त्यांना ठार किंवा त्यांना वेड ठरविलं जात
- आणि एकदा पि.टी. केस मधून कामावर रुजू झाला कि आई बापा कडे पाठ फिरवणार . बरेच जण आपल्या आई बापांना बाहेर काढून टाकतात व स्वता: ऐशो आरामात जीवन जगतात .
- ज्या व्यक्तीच्या नावाने पि.टी. केस मिळालेली(नोकरी) असते त्याच व्यक्तीला घरातून हाकलण्यात येत .( याला फार कमी अपवाद आहेत .)
- बरेच जण पि.टी. केसचा इतका फायदा घेतात कि कामावर न जाता हि पूर्ण पगार घेतात.काय करतात हे लोक; घरात बसून अथवा अन्य ठिकाणी काम करुण अथवा छोटी मोठी पान टपरी टाकून जीवनाचा आनंद घेतात. तर नोकरीत आपल्या मुकादमाला ५-१० हजार रुपये देतात आणि एक अन्य बदली कामगार ठेवून त्यालाही ५-१० हजार रुपये देऊन आपली नोकरी आणि घर उरलेल्या १०-२० हजारात चालवतात .
- हे तीच लोक आहेत कि ज्यांनी बाबासाहेबानी दिलेल्या २२ प्रतिद्न्यांचे २२ तुकडे करून कचर्यात फेकले, तोच कचरा नेहमी उचलतात .आणि हमखास अश्या लोकांच्या वस्तीतच आजही बाबासाहेबांच्या नावाने हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या उत्सवाची भरभराट दिसून येते ,उदाहरणाखातर गणपती बसविणे,नवरात्र उत्सव साजरा करणे ,होळी दहीहंडी आणि इतर हिंदू धर्माचे सण साजरे करणे . नाहीच काही जमाल तर कमीत कमी शुभेच्छा फलक तरी लावणे .
- हि बी.एम.सी म्हणजे आपली जहागीरदारी आहे असं वाटू लागलय यांना.हि आपली फिक्स नोकरी असताना कश्याला जीवाचा आटापिटा करत इकडं तिकडं भटकायचं .जेम तें काम,काम झाल्यावर खिशाच्या पैशावरून अजून किती तास बाहेर काढायचे हे ठरविणार ,मग घरी येणार ,बायका पोरांसोबत व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करणार .
- यांची पुढील पिढी देखील सम-विचारी निघते आणि ती देखील त्याच प्रकारची स्वप्ने पाहण्यात रंगलेली असतात जी कधी या नोकरीला लागण्याआधी यांनी पाहिली होती ती .अगदी तशीच .
आहारी जातात .नशेमध्ये बीअर आलीच किंवा इतर दारूचे प्रकार ,नाहीतर कमीत कमी बजेट मध्ये तंबाखू न
गुटखा आहेच .बस्स हीच यांची लाईफ .
यातील फारच कमी लोक असतील जे पि.टी. केस घेत नाहीत आणि स्वता : इतरत्र काम करून आपला उदार
निर्वाह चालवितात .पि.टी. केस लागण्यासाठी पाच ते दहा पैसे म्हणून वशिला द्यावा लागतो . जर नाही काही
दिल तर पि.टी. केसला उशीर होणार किंवा पि.टी. केस कोणावर कि नाही यातच शंका निर्माण होणार. जर
तुमच्याकडे पैसा नाही तर नक्की ऐकायला मिळणारं वाक्य "सरकारं पि.टी. केस बंद केलीय आता,तुमचं काम
नाही होणार "आणि जर पैसे असतील तर सांगायलाच नको हजार जण येतील तुमचं काम करायला.
पि.टी. केस मध्ये सांगितल्या प्रमाणे ८०-९०% हे ना बौद्ध आहेत जे स्वता :ला जयभीम वाले म्हणवून घेतात.हे
सर्वजण डॉ बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपल्या जीवाचं रान देखील तयार आहेत .बाबासाहेबांच्या बद्दल
कोणताही अपशब्द हे सहन करूच शकत नाही .एवढा मोठा मान ठेवलाय बाबासाहेबांचा या लोकांनी .
तर दुसरीकडे मुळात या लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकरवाद काय हेच कळलं नाही .
बाबासाहेब एकदा नाही हजारदा सांगत तुम्ही नीट नेटके राहा पोरा बाळांना शिकवा आणि सोडून द्या हे
घाण उचलण्याचं काम .पोरांना चांगलं शिकवून त्यांना या देशाच्या घडणीला योग्य बनवा त्यांना
ऑफिसर बनवा कलेक्टर बनवा साहेब बनवा पण हे काम जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर
सोडून द्या .कारण हे काम तुम्हीच करावं असं कोणीही बजावलेले नाही आणि ज्यांना हे करायचं असेल
तो करेल पण तुम्ही यातून बाहेर पडा !
बाबासाहेबांचे हे शब्द आजही कानावर अजूनही सारखे येतच आहेत . काही मुलांनी यातून आपली सुटका
करून बाबासाहेबांचं नाव सार्थकही केलं .त्यातील काहींनी बाबासाहेबांचं मिशन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला व
करत आहेत .मुनिसिपाल्टी मध्ये नोकरी करणे गुन्हा नाही पण तुम्ही बाबासाहेबानी सांगितलेल्या मार्गावर चालून
त्याच मुनिसिपाल्टी मध्ये अधिकारी हुद्द्यावर काम करा अथवा तिकडे पोहचण्याचा प्रयत्न करा .मोक्याच्या जागा
मिळावा
आज आपल्याला बौद्ध धम्म घेऊन ६० वर्षांचा काळ लोटला आहे .आपली कमीत कमी तिसरी पिढी या सफाई
कामगारांत वावरत आहे जे आज चांगल्या हुद्द्यावर आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या बांधवांचे प्रबोधन
करून त्यांना या कचऱ्यातून बाहेर येण्यासाठी योग्य तो मार्ग त्यांना दाखवा आणि बाबासाहेबांचे बोल सार्थक ठरावा .