समाज सुधारक कोण ? देवीदेवता कि बहुजन महापुरुष समाज सुधारक कोण ? देवीदेवता कि बहुजन महापुरुष - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, July 1, 2017

समाज सुधारक कोण ? देवीदेवता कि बहुजन महापुरुष

<img src="समाज-सुधारक-कोण.jpeg"= समाज सुधारक कोण-bahujan leaders">


जर का आपण इतिहासात डोकावलं आणि आपला सभोवतालचा परिसर घटना पाहिल्या तर एक गोष्ट पटकन

लक्षात येते ती म्हणजे बहुजनांचे कैवारी उद्धारकर्ते असे जे महापुरुष आहेत त्यांना एका मर्यादित जागेत

कोंबण्याचा प्रयत्न गेला जातोय आणि त्याच बरोबर त्यांच्या विरुद्ध अगणित अश्या देवी देवतांची फौज उभी केली

जाते . मग प्रश्न निर्माण होतो कि ,"महापुरूष ज्या त्या जातीपुरते आणि काल्पनिक देव सर्वांचेच ? असे का ??? ..."

जर काहीही न करनारे देव सर्वांचे तर मानवाचे हित साधनारे सर्व महापुरूष मात्र ज्या त्या जातीचे कसे ?

महापुरूषांनी जातीभेद न करता सर्व बहुजनांना जागृत करन्याचे काम केले तर मग त्यांना जातीच्या बंधनात

अडकवून ठेवनारे आपण कोण ?

जर देव सर्वांचेच आहेत तर एखाद्या घरात बलात्कार चालू असतो तेव्हा त्याच देवघरातील एवढ्या सार्या देवांच्या

फौजेपैकी एखादातरी देव त्या स्रीच्या मदतीस का येत नाही ?



जर देव सर्वांचेच आहेत आणि देव पापींना सजा देतो व चांगल्या लोकांना फळ देतो असे दैववादी , ब्राम्हणवादी

बहुजन लोकांना सांगतात तर मग दिवसा ढवळ्या घरात चोरी करनार्या चोरांना तोच देव मोकाट का सोडतो ?

मंदिरात भ्रष्टाचार होताना सर्वांचा समजनारा देव डोळे झाकून थंड असतो कि काय ?? मंदिरात हजारो नारळ

लोक पुजार्याकडे देतात तेच नारळ पुन्हा फिरून स्टाॅलवर जातात आणि तेच नारळ लोक विकत घेऊन पुन्हा

पुजार्याला देतात. हि एवढी मोठी फसवनूक होत असताना देव काहिच कसा करत नाही ?

महापुरूषांना जातीत विभागण्याचे काम खरेतर ब्राम्हणवाद्यांनी चोख केले आणि भोळे लोकही त्यास बळी पडू

लागले.

जेव्हा बाबासाहेबांनी दलित समजल्या जाणार्या समाजासोबत समस्त मागास तसेच उच्चजातींना एकाच रांगेत

आणून बसवले तेव्हा लेखणी हातात असणार्या व इतरांपेक्षा अधिक सुशिक्षित असणार्या ब्राम्हणांनी बाबासाहेबांना

"दलितांचा नेता , दलित उद्धारक" असे चिथवून त्यांना एकाच जातिपुरते बांधून टाकले.

छत्रपती शिवराय बारा बलुतेदारांना स्वराज्यात मानाचे स्थान देत होते परंतू इतिहास रचणार्या ब्राम्हणवाद्यांनी

शिवरायांना हिंदूंचे राजे , मराठ्याचे राजे असे चिथवून इतर लोकांना बाजूला सारले. संभाजीराजे फक्त हिंदूचेच

राजे आहेत इतरांचे नाही हे कुण्याही माईच्या लालनी सिद्ध करून दाखवावे.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी फक्त महाराष्टातीलच नव्हे तर सार्या भारतातील स्रियांना तिची जात धर्म पंथ

न पाहता शिक्षण दिले त्यांना आजच्या स्रिया तर दूरच परंतू माळी समाजच आठवनीत ठेवत नाही. कारण

इतिहासाची हेळसांड व हलवाहलव त्यापद्धतीने ब्राम्हणवाद्यांनी केली आहे.

संत तुकाराम महाराज , संत गाडगे महाराज , संत बसवेश्वर , संत रोहिदास आणि इतर उत्तम जीवन जगायला

शिकवनार्या संतांना ब्राम्हणांनी त्यांच्या ब्युटीपार्लरमधे नेऊन ( विविध कथा रचून , खोटे ग्रंथ लिहून , टिव्ही

माध्यमांद्वारे संतांचा खोटा इतिहास दाखवून) असे काही रंगरूप दिले आहे कि संत म्हणजे देवदूतच. त्यांचे

विचार राहिले बाजूला आणि लोक संतांच्या मूर्त्या, फोटो डोक्यावर घेऊन फुग्गडी खेळण्यातच मग्न झाले आहेत.

लोकराजा शाहू महाराजांना फक्त जयंतीदिनीच लोकांच्या मनात अभिवादन देण्याइतपत जिवंत ठेवले आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे कि ज्यावेळी बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना होते तेव्हा टि व्ही चॅनल आणि प्रिंट

मिडीयामध्ये असे छापन्यात येते कि " दलित समाजाने मोर्चा काढून निषेध दर्शविला " आता त्या मोर्चेत

समतावादी विचार जोपासनारे विविध जातीधर्मातील लोकही सामिल होत असतात . तसेच शिवाजी महाराजांच्या

स्मारकाची बदनामी होते तेव्हाही सर्व जातीतील समतावादी लोक निषेध दर्शवत असतात परंतू ब्राम्हणांच्या

देखरेखीखाली चालनार्या टिव्ही आणि प्रिंट मिडीयावर त्याच जातीतील लोक जमा झाले असे दाखवून इतर

लोकांना घृणा वाटेल असे वातावरन तयार करत असतात.

सांगायचा मुद्दा एवढाच आहे कि लोकांनी स्वताःहून आता जागृत झाले पाहिजे. ब्राम्हणांच्या सडलेल्या विचारांचा

लाड न पुरवता महापुरूषांच्या विचारांनुसार वागले पाहिजे. आणि जे देव कोणाचेच होऊ शकले नाहित तसेच

कोणाचेही भले करू शकले नाहीत त्यांच्या खोट्या काल्पनिक गोष्टींना आपल्या मनातून फेकून देऊन

महापुरूषांना स्थान दिले पाहिजे.तरच जातीभेद , भ्रष्टाचार , बलात्कार , भांडवलशाही , प्रांतवाद , भाषावाद हे

सर्व नष्ट होऊन एक उत्तम जीवन माणूस जगू शकेल.


लेखक : धम्ममित्र - अक्षय साळवे

साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा