आपला अनोखा अंदाज असणारा आमदार जर का कोणी असेल तर तो आहे बच्चू कडू .कारण एकदम साधी
राहणी आणि आणि थक्क करणार काम . महाराष्ट्रातल्याच नाहीतर देशभरातल्या कोणत्याही नेत्याकडे तुम्ही
पहा नागरसेवक असेल ,आमदार किंवा खासदार असेल पण बच्चू कडू सारखी डेरिंग नाही किंवा काम
करण्याचं कर्तब नाही .जेव्हा सरकारी लोक काम करत नाही तेव्हा जसा एक सामान्य माणूस फक्त त्याला
डाफरात असतो तेव्हा त्याठिकाणी बच्चू सारखा माणूस त्या सरकारी कामगारांना धारेवर धरून जाब विचारतो
आणि याचाच परिणाम म्हणून बच्चू कडू एकदा नाही सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आलेत .आणि अश्या
वातावरणात जेव्हा मोदींची हवा भारतात पसरली होती ( आता भले ती हवा निघून गेलीय ... )
बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात
झाला. त्यांचं संपूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू पण त्यांना बच्चू कडू याच नावाने लोक ओळखतात.त्यांनी
आपली आंदोलन करण्याची तर्हा लोकांना दाखवून दिली होती शाळेत नववीत शिकत असताना .गावातील आणि
आसपासच्या खेड्यातील तरुण पिढी वाचविण्यासाठी त्यांनी गावच्या यात्रेत होणारे तमाशे बंद पाडून दाखविले.
मित्राचे प्राण वाचविण्याकरिता त्यांनी वजन वाढावं म्हणून खिशात दगड ठेवून रक्तदान केलं होत .
बच्चू कडूंचा काळ म्हणजे राजकारणात एकमेकांवर किंवा पक्षावर सभेतून जोरदार वक्तव्य करण्याचा काळ
होता .आणि त्यामुळेच त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या भाषणाचा प्रभाव पडला होता सर्वप्रथम ते
१९९७ मध्ये चांदुर बाजार पंचायत समितेचे सभापती आणि पुढे मग ते त्याची निवड लवकरच समितीवर झाली
आणि इथून त्यांचा राजकीय प्रवासाला झाली असं म्हणायला हरकत नाही .
आणि याच काळात त्यांनी बाथरूम घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे
शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.
आणि मग १९९९ मध्ये ते पहिली निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि फक्त काहीच मतांच्या फरकाने
ते अपयशी ठरले .परंतु आपलं कामाचं स्वरूप त्यांनी सतत चालूच ठेवलं . त्यांनी सरकारी अधिकार्याना (जे काम
करत नव्हते) एका नव्या आणि विशिष्ठ पद्धतीनं आंदोलन करण्याची पद्वतच अवलंबली .जसे अधिकाऱयांच्या
केबिन मध्ये साप सोडणे ,कार्यालयात सुटळी बॉम्ब फोडणे किंवा वीज दरवाढिमुळे विजेच्या खांबावर चढणे ...
अश्या अनेक शक्कल लढवून त्यांनी काम करवुन घेतली आणि जनतेच्या हृदयावर त्यांनी आपला ठसा उमटविला .
आणि मग २००४ साली अपक्ष म्हणून आमदार निवडणूक लढविली आणि निवडून आले .आणि आता
सरळ तीनदा . त्यांनी "प्रहार" पक्षाची स्थापना करून आपली एक वेगळी छाप लोकांवर ठेवली आहे .
त्यांच्याबद्दल आणखीन खास सांगायचं म्हटलं तर त्यांनी आतापर्यंत १८ लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली
आहे.
जिथं नगरसेवक आमदार झाल्यावर रंगरूप बदलणारे नेते आणि काही दिवसातच आलिशान घर मिळविणारे
नेते याना पाहिलं आहे .पण बच्चू कडू बहुदा याला अपवाद आहे .कारण आमदार असूनही बच्चू कडूच स्वता:च
घरहि नाही आहे ,ते भाडयाच्या घरात राहतात.
बच्चू कडू हे सर्पमित्र पण आहेत ,तसेच त्यांना मैदानी खेळाची विशेष आवड आहे .आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
त्यांना सामान्य माणसा प्रमाणे मिसळून राहणं पसंद आहे .
लोकमतने त्यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केल आहे .