ब्रिटीशानी भारतावर कबजा केल्यानंतर लढाया युद्धकरण्याचे युग संपले होते .ब्रिटीशानी त्यांच्या गरजेनुसार
भारता जे हवं ते प्रस्थापित करायला सुरुवात केली होती .त्यात त्यांचं मोलाचं शिक्षणासाठी केलेले खुले दरवाजे
ज्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती.आता काळ आला होता शिक्षणाचा. विसावं
शतकातील एक आगळा वेगळा सामान्य राजा ज्याचं नाव येत ते म्हणजे राजश्री शाहू महाराज .शाहू महाराजानी
सध्याच्या युगाला शोभेल असं कार्य केलेलं आहे.त्यांच्या स्वप्नपूर्तीचा चोख काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
भारतीय संविधान मार्फत केलं आहे .
राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जुने १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल याठिकाणी गरीब कुटुंबातील
घाटगे परिवारात झाला .त्यांचे संपूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे त्यांना बडोद्याच्या राजमाता
आनंदीबाई ( छ .शिवाजी महाराज ,चौथे,यांची पत्नी ) यांनी मार्च १८७४ मध्ये दत्तक म्हणून घेतले व राजगादीवर
बसविले .महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व
मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी
सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार
चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये
शिकवणार्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा
असेही उपक्रम त्यांनी राबवले.
राखीव जागांची म्हणजे आरक्षण तरतूद करून सरकारी नोकर्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे,
सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा
आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला
कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
त्यांनी शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला लागणारी आर्थिक मदतही करत होते आणि त्यापैके एक म्हणजे डॉ बाबासाहेब
आंबेडकर .वेळोवेळी शाहू महाराजांनी आपल्या मनातील इथल्या जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम आणि
त्याचबरोबर इथल्या ब्राह्मणी कर्मकांडात झोपी गेलेल्या समाजाला जागृत करून संघर्ष करावयाची जबाबदारी
त्यांनी बाबासाहेबांवर सोपविली होती.
शाहू महाराजानी समतेवर राज्य उभं केलं होत.आणि जनताही त्यांना आपला राजा म्हणत असे. महाराजांविषयी
सार्या जनतेत आदर सन्मान आणि एक सामान्य राजा म्हणून ख्याती होती ,
त्यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्राखेरीज देशभरात विविध कार्यक्रम त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित
केलेजातात .
अश्या या महान राजास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !