भारत स्वतंत्र झाल्यापासून इथे दोन प्रकारच्या विचारांचं राज्य चालत, एक आहे गांधीवाद आणि दुसरा आहे
आंबेडकरवाद . वाद म्हणजे विचार आणि त्यापुढील नाव म्हणजे संबंधित व्यक्तीच नाव .
जसे गांधीवाद जो जोडला गेलाय महात्मा (?) गांधी यांच्याशी .गांधीवाद आणि ब्राह्मणवाद हे एकमेकास समानार्थी
शब्द आहेत .फरक फक्त बाजू दिसण्यावर आहे .गांधीवादाची नाळ जुळली ती फक्त ब्राह्मणी विचारधारा
असणारे ब्राह्मण बनिया किंवा सवर्ण जातींशी .ज्यांना स्वताचे वर्चस्व प्रस्थापित हवे,स्वताच एक विशिष्ट स्थान हवं
किंवा एक सरळ भाषेत म्हटलं तर मी फक्त वर आणि बाकी सगळे माझ्याखाली आणि ते खालीच कसे ठेवता
येईल याची केलेली एक व्यवस्था म्हणजेच गांधीवाद .
तर दुसरीकडे आंबेडकरवाद जो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी जोडलेला भाग .आंबेडकरवाद
१००% गांधीवादाच्या विरुद्ध आहे .जेव्हा आपण मासिकात ,न्यूज पेपर किंवा टि.व्ही. वाचतो ऐकतो पाहतो
त्यात एक शब्द येतो "आंबेडकरवाद " किंवा कोणी प्रश्न केला आंबेडकरवाद म्हणजे काय आहे ?मग त्यावेळी
मात्र आपल्याला काहीच सुचत नाही कि काय बोलायचं आहे . आंबेडकरवाद हा असा शब्द आहे जो जुळला
आहे इथल्या खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत पोहचलेल्या प्रत्येक व्यक्तीशी.
कारण आंबेडकरवाद समतेची विचारधारा निर्माण करणारा आहे .आंबेडकरवाद कोणतीही जात धर्म रंग लिंग-
भेद मानत नाहीत . आंबेडकर वाद मानवाला मानवाशी जोडण्याचं काम करतो .याचाच अर्थ आंबेडकरवाद
माणुसकी निर्माण करतो आंबेडकरवाद वैज्ञानिक दृष्टिकोन यावर आधारित आहे जो मानव कल्याणकारी आहे.
"भारतीय संविधान" आणि "बुद्ध आणि त्यांचा धम्म " हे देखील आंबेडकरवाद आहे . जी व्यक्ती वैज्ञानिक
दृष्टिकोन ठेवून जुन्या रूढी परंपरा किंवा कर्मकांड यांना मूठमाती देऊन समाज घडवितात तर तो आहे
आंबेडकरवाद .
आज समाजात बरेच जण स्वताला आंबेडकरवादी म्हणवून घेतात त्यांच्यासाठी एकाच ओळीत सांगता येईल कि
जो कोणीही जुन्या रूढी चालीरीती ज्या ब्राह्मणी कर्मकांडामुळे लाभल्या आहेत त्या झुगारून एक नवीन वैज्ञानिक
दृष्टिकोन ठेवेल तोच खरा आंबेडकरवादी नाहीतर तो गांधीवादी
जगातील सगळ्यात प्रभावशाली आणि विकासनशील विचारधारा म्हणजे आंबेडकवाद . जगात असा कोणताही
प्रश्न नाही कि ज्याचं उत्तर आंबेडकरवादात सापडणार नाही .
थोडक्यात आंबेडकरवाद सांगायचं म्हटलं तर ;
जिथे विषमता नष्ट करून एक समता प्रस्थापित करणे म्हणजे आंबेडकरवाद ...
एक वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे मानव मुक्तीचा मार्ग म्हणजेच आंबेडकरवाद ...
मानवी प्रतिष्ठेसाठी चालवलेली आंदोलन किंवा चळवळ म्हणजे आंबेडकरवाद ...
मानवाचं कल्याण मागच्या आणि पुढच्या जन्मात नाही तर याच जन्मात करण्यात येईल म्हणजेच आंबेडकवाद ...
मानवाला माणुसकीच जीवन देणारी आणि योग्य मार्गाचा अवलंब करणे म्हणजेच आंबेडकरवाद ...
मानसिक आणि सामाजिक प्रगती आणि त्याचबरोबर आर्थिक ,राजनीतिक आणि सांस्कृतिक बदल म्हणजेच
आंबेडकरवाद ...
आंबेडकवाद हा एक असा विचार किंवा आंदोलन आहे कि जो अन्याय अत्याचार आणि शोषण यांच्या विरुद्ध
सतत कार्यरत असतो आणि या व्यवस्थेतुन मानवतावादी व्यवस्था प्रस्थापित करणे हेच अंतिम उद्दिष्ट असत ...
गुलामांची व्यवस्था मोडून मानवतावादी व्यवस्था प्रस्थापित करणे म्हणजे आंबेडकरवाद ...
वर्चस्ववाद याचा मुळासकट उपटून काढणे म्हणजेच आंबेडकरवाद ...
आंबेडकरवाद हे फक्त विचारांचं दर्शन किंवा देवाण घेवाणच कार्य नसून ते सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक
,धार्मिक आणि त्याचबरोबर सांस्कृतिक जीवनात संपूर्ण बदल घडवून आणण्याचं आंदोलन आहे ...
आंबेडकरवाद हि एक अशी विचारधारा आहे कि जी मानवतावादी व्यवस्था प्रस्थापित करते
संपूर्ण मानवजात मग ती कोणत्याही जाती धर्माची असो त्यांना " समता न्याय स्वतंत्र आणि बंधुत्व" या चार
तत्वांनी बनलेली एक सामाजिक व्यवस्था म्हणजेच आंबेडकरवाद .