"चमचा युग" नाव वाचाल तर पटकन आठवण येते ती मान्यवर कांशीरामजी यांची .होय कांशीरामजी यांचं
"चमचा युग" ("An Era of the Stooges") पुस्तक (ग्रंथ) १९८२ मध्ये प्रकाशित झालं आणि रातोरात हे पुस्तक
प्रसिद्ध झोकात आलं आणि बहुजन समाजाचे तारक आणि मारक कोण आणि कसे होतात त्यात हे मांडलं आहे
.या पुस्तकात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं अभूतपूर्व कार्य आणि इथल्या शोषित समाजाला जागृत
करून त्यांच्या मुख्य उद्दिष्टआकडे कशाप्रकारे आणले ते ह्या पुस्तकात वाचावयास मिळते .मुळातच इंग्रजी
भाषेतील हे पुस्तक रामगोपाल आझाद यांनी हिंदी भाषेत अनुवादित केलं होत .हे पुस्तक महात्मा ज्योतिराव हुले
यांना समर्पित केलेलं आहे .
कांशीरामजी या पुस्तकाबद्दल आपलं मत मांडतात कि हे पुस्तक नुसतं पुस्तक नसून एक प्रकारे माणसाला
विचार करायला भाग पाडणारे आहे कारण इथला जो बहुजन समाज जो शोषित पीडित आहे याच मुख्य नेतृत्व
कोणी केल पण त्याचे फायदे कशे राजकारणी आणि त्यांचे चमचे घेतात.या पुस्तकाद्वारे खरा आणि खोटा तुमचा
नेता कोण हे तुम्हाला पटकन दिसून येईल .
खर तर वरील परिचय देण्याचं मूळ उद्दिष्ट हे आहे कि हे चमचा युग आंबेडकरी समाजातच खूप जास्त प्रमाणात
आहे . तेच आपण पाहणार आहोत कसे ते ...
आपला आंबेडकरी समाज हा आंबेडकरी अनुयायी आहे असं म्हटलं तर थोडी गफलत होईल .इथे आपण
राजकारण विषय बाजूला सारून हे चमचा युग कश्याप्रकारे आपल्यामध्ये सक्रिय आहे ते पाहू .
आपल्या समाज बांधवांकडून नेहमी सांगण्यात येत कि बाबासाहेबानी असं केलं आणि तस केलं पण प्रत्यक्षात
त्याने किती बाबासाहेबाना जाणलं हे एक शोधकार्यात आहे .असो त्यावर त्यांचं असहि सांगतील कि
बाबासाहेबानी चळवळीला योग्य आकार दिशा देण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी मूकनायक बहिष्कृत /
प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्र काढली .बरोबर आहे यात काही शंका नाही कारण त्यावेळी आपल्या समाजाचं एकही
वृत्तपत्र नव्हतं कि जेणेकरून आपल्या समाजात घडणार्या अन्याय अत्याचार याला वाचा फोडेल .
आता हे झालं त्यावेळची गोष्ट .आता पाहू या काळातील आंबेडकरी समाज कसा वावरतो . मित्रानो मागील ४-५
वर्षांपासून सोशाल मीडिया जसे फेसबुक ,व्हाट्सअप ,यु ट्यूब, ट्विटर,वेबसाइट्स,अँड्रॉइड अँप इ. यात प्रचंड
वाढ आणि लोकांची सक्रियता यात वाढ झाली आहे .आणि यात आंबेडकरी समाज एकदम आघाडीवर आहे
असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही .आता गम्मत इथेच आहे ,जस वर सांगितल्याप्रमाणे चमचायुग आपल्या
समाजात कस काम कारतो ते पाहू .
जेव्हा एखादा व्यक्ती कोणतीही पोस्ट म्हणा ,कोणताही विडिओ म्हणा ,किंवा कोणतीही शेअर लिंक म्हणा जी
तुम्हाला कुठल्यातरी वेब्साईटवर किंवा फेसबुक वर घेऊन जाईल .आता आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो
कि हि आलेली पोस्ट कोणी टाकली आहे ? जर का तो आपल्या परिचयाचा असला तर मग पाहणार नाहीतर
त्याच्याकडे काना डोळा करणार . त्याचवेळी मनात एकामागून एक प्रश्न येणार जसे हि व्यक्ती आंबेडकरी
चळवळीतली आहे का ? हि व्यक्ती आपण घेतलेल्या कुठल्याही कार्यात सहभागी होते का ? ह्या व्यक्तीने
टाकलेल्या पोस्ट अथवा लिंक वर जर कोणी काहीच केलेलं नसेल तर मी तरी का करू? अश्या एक नाही अनेक
प्रश्न निर्माण होतात आणि हे स्वाभाविकच आहे.
बाबासाहेबानी आपल्या चळवळीत वृत्तपत्र सामील का करून घेतली याच मुख्य कारण होत कि सध्याच्या
परिस्तिथीची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे .ज्यावेळी त्यांनी हि वृत्तपत्रे चालू केली त्यावेळी आपल्या समाजाची
काय अवस्था होती ,मग हि वृत्तपत्रे वाचत कोण होती ? तर बाबासाबांची वृत्तपते कार्यकर्ते आपल्या समाजात
जाऊन वाचून दाखवीत होते आणि म्हणूनच त्यांना काय म्हणायचं आहे आणि पुढे ते काय करणार आहेत हे ते
वृत्तपत्राद्वारे लोकांपर्यंत पोहचत असे .पुढे मग हीच वृत्तपत्रे इथल्या ब्राह्मणी वृत्तपत्राना आव्हान निर्माण करणारी
झाली कारण आता हि वृत्तपत्रे आता सर्वत्र उपलब्ध होऊ लागली आणि त्यांना वाचकही मिळू लागला. म्हणून
अस्पृश्य समाजावर होणारे अत्याचार हे संपूर्ण देशभरात कळू लागले .
आजच्या युगात पाहू जेव्हा एखादी व्यक्ती फेसबुक वर असेल आणि त्याला एक पोस्ट मिळाली जरी ती पोस्ट
चांगली असली,सामाजिक विचारसरणी असली किंवा आपल्या बहुजन महापुरुषांच्या बद्दल फोटो किंवा माहिती
असली , तरी त्याला साधे लाईक किंवा कॉमेंट हि मिळणार नाही ,पण जर एखादी पोस्ट अशी समोर आली कि
जी काही उपयोगीही नाही आणि फालतू आहे किंवा एखादा चांगल -या वाईट फोटो असेल तर त्याला भरपूर
प्रतिसाद म्हणून लाईक आणि कॉमेंट्स मिळतात .कारण ती पोस्ट टाकणारा आपला मित्र आहे आपला जवळचा
आहे ,आपण त्याच्यासोबत काम करतो ,आपण त्याला घेऊन सामाजिक कार्यही केलं आहे ,आपण त्याच्यासोबत
काही विरंगुळाही केला आहे , मग लाईक आणि कॉमेंट केलेच पाहिजे आणि एकामागून एक लाईक आणि
कॉमेंट मिळत जातात आणि ती व्यक्ती खुश होऊन जेव्हा तुमची कोणतीही पोस्ट असेल तिला सेम ट्रीट करतात
तर यालाच मान्यवर कांशीरामजी यांनी चमचा युग नाव दिल आहे असं म्हणायला हरकत नाही . .
आता हे झालं फेसबुकचं तशीच अवस्था युट्युब आणि वेबसाईटची हि आहे .जेव्हा आपल्याला लिंक मिळते तेव्हा
हि असच असत मग ज्याने ह्या पोस्ट वेब विडिओ तयार केलं आहे त्याला काय खाक प्रोत्साहन मिळणार .तिकडे
ब्राह्मणी फेसबुक वर युट्युब वर आणि इतर साईटवर लाखो लोके कॉमेंट असतात का करतात त्यांना आवडत
म्हणून .नाही जेणेंकरू समोरच्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून .अश्याने मग तो नक्कीच काहीतरी नवीन घेऊन
येईल पुढच्या वेळेस .
एक तर आपल्या समाजाकडे एकमेव साधन उपलब्ध आहे ते म्हणजे सोशल मीडिया .जरी आपली काही वृत्तपत्रे
असली जसे सम्राट ,लोकनायक इ पण याला वाचकवर्ग किती आहे .किती युवक कॉलेज मध्ये किंवा कामावर
जाताना हि वृत्तपत्रे हातात घेऊन जातात .तर एखादाच सापडू शकतो .कारण त्यांना टाइम्स ऑफ इंडिया
,लोकमत ,लोकसता अशी वृत्तपत्रे हातात घ्यायला आवडतात
हि वृत्तपत्रे म्हणा किंवा वेबसाईट म्हणा किंवा युट्युब चॅनेल म्हणा काय आपोआप हिट झाले,नाही ना...
व्हाट्सअप वरील मेसेज इतर ग्रुप मध्ये फिरत असतात पण बाकी ठिकाणी ...
मग का आपल्या लोकांना वर येण्यासाठी मदत करावीशी वाटत नाही .कुठेही लाईक शेअर किंवा कंमेंट
केल्यानां तुमचं काही नुकसान नाही कारण आपण नेट पॅक मारलेलाच असतो .एखाद्याने एवढी मेहनत केलेली
असते एखादा विडिओ तयार करायला किंवा एक पोस्ट तयार करायला पण आपण त्याकडे दुर्लक्ष करून त्याची
मेहनत वाया तर नाही ना घालवत .
बाबासाहेबांचं म्हणणं मुळात कोणी समजून घेतलं असं वाटत नाही कारण बाबासाहेबानी म्हटलं होत जर तुमची
प्रगती तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा तुम्ही तुमच्या समाजातील मागे राहिल्याना वर येण्यासाठी मदत कराल
आणि मग आपोआप तुमचा समाजही प्रगतीपथावर येईल .
आजच्या इंटरनेटच्या युगात आपलेही बांधव इतरांच्या खांद्याला खांदे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे .करोडो
चॅनेल्स आहेत ,लाखो वेबसाईट्स आहेत ,लाखो पोस्ट्स आहेत ज्यात अजूनही सवर्ण यांचा वर्चस्व आहे आणि
त्यात आपले लोकही बर्याच प्रमाणात प्रविष्ट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
विचारकरा .
लेख थोडा झोम्बणारा आहे पण गरज आहे .एका प्रतिष्टीत समजल्या जाणार्या आंबेडकरी व्यक्तीला राग येण
स्वाभाविकच आहे ,पण एका प्रगतिवान आणि बदलावं विचार आणणार्याला हा लेख गमतीदार हि वाटेल .
आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी आपण थोडातरी हातभार लावला पाहिजे .