गुरु पोर्णिमा गुरु पोर्णिमा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, July 9, 2017

गुरु पोर्णिमा

<img src="ashadh-purnima.jpeg"=buddha dhamm ashadh-purnima-2017">


ह्या जगात फक्त एकच गुरु होऊन गेले ते म्हणजे जगदवंदनीय जगद्गुरू "तथागत भगवान बुद्ध" होय.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ...

तथागत जे बोलले,त्यांनी तसे केले म्हणून ते तथागत आहेत,भगवान बुद्ध आहेत

( भग+वान = भगवान ) ( भग म्हणजे त्याग ) आणि ( वान म्हणजे तृष्णा ) ज्याने सर्व तृष्णांचा त्याग केला तो

म्हणजे भगवान बुद्ध होय .

वर्षावासाचे महत्व भगवान बुद्धांच्या काळापासून आहे ई.स.पूर्व ५२८ ला सिद्धार्थ गौतमाला बौद्धगया येथे पिंपळ

वृक्षाखाली सम्यक संबोधि प्राप्त झाली .सात आठवडे वेगवेगळ्या ठिकाणी आपणास मिळालेल्या ज्ञानाचा विचार

करत असतांना हे ज्ञान कोणाला द्यावे हे ज्ञान मानवाला देऊ कि नको असे त्यांचे मन त्यांना विचारत होते. त्यांचे

एक मन म्हणत होते . द्यावे आणि दुसरे मन म्हणत होते कि हा मार्ग माणवाला झेपणारा नाही . तेव्हा त्यांनी

मनाशी निश्चय केला आणि एक विचार करून ठरविले कि हे ज्ञान आपण मानवाला दिलेच पाहिजे कारण जग हे

अंधारात आहे ,जगाला ज्ञानाचा प्रकाश दिलाच पाहिजे . आणि तथागतांच्या मनात विचार आला कि हे ज्ञान सर्वात

आधी कोणाला द्यावे .त्यावेळेस त्यांना पूर्वाश्रमीचे गुरु भारद्वाज , आलारकालाम ,उद्द्क रामपुत्त हे ह्यात नव्हते

सुजाताची खीर खाल्यावर पाच ब्राम्हण परिव्राजक सिद्धार्थास सोडून गेलेले होते. त्यांनाच हे ज्ञान प्रथम दिले

पाहिजे असे तथागतांना वाटले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पहिले आणि ते मृगदाय वनाकडे निघाले , ॠषिपत्तन

येथे गेले. त्या पाच परीव्राजकांना आपला प्रथम धम्म उपदेश केला .त्यांची नावे अशी आहेत .

१)कौंडीन्य

२) वप्प

३ ) भद्दीय

४) महानाम

५ ) अश्वजीत

आणि पहिले धम्म चक्र फिरविले . आणि ते पाच ब्राम्हण भगवान बुद्धांचे प्रथम शिष्य झाले. आणि पुढे साठ

भूक्षुंचा संघ निर्माण करून संघांची स्थापना केली.


<img src="ashadh-purnima.jpeg"=buddha dhamm ashadh-purnima-2017">


निसर्गाचे निरीक्षण करून पाऊस,उन वारा यापासून भिक्षुंना त्रास होऊ नये यासाठी वर्षावासाची सुरुवात केली.

"वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास ". या वर्षावास काळात भिक्षूंनी एका ठिकाणी विहारात राहून

बौद्ध उपासक -उपसिकांना धम्म उपदेश करावा असा आदेश तथागतांनी भिक्षुंना दिला .


" चरथं भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय |


लोकानु कंम्पाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुस्स्सानं || "


तथागत म्हणतात जा भिक्षुंनो , चारिका करा ,माझा धम्म लोकांना शिकवा ,हा बहुजन हिताचा ,सुखाचा ,

कल्याणाचा धम्म आहे." तो तथागतांचा आदेश मानून भिक्खू धम्म प्रचार करतात .आणि आपण हि सर्व बौद्ध

उपासक / उपसिकांनी ह्या वर्षावास काळात उपोसथ धारण करावे . व अष्टशीलाचे पालन करावे उपोसथ म्हणजे

काय तर बौद्ध धम्मात आपण उपवास नाही करत आपण त्याला उपोसथ असे म्हणतो .उपोसथ म्हणजे स्वतः

जवळ राहणे . व जवळच्या विहारात जाऊन वंदन सूत्रपठन घ्यावे धम्म प्रवचने ऐकावीत आणि बुद्ध आणि त्यांचा

धम्म ह्या ग्रंथाचे पठण करावे .

! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!