11 जुलै 1997 आंबेडकरी जनतेसाठी काळा दिवस म्हणून नोंद झाली.आज या घटनेला घटनेला २० वर्ष पूर्ण होत
आहेत .परंतु आंबेडकरी समाजावर झालेला हत्याकांड आज हि लोकांच्या मनात काट्यासारखा रुतलेला आहे
.याबद्दल सविस्तर माहिती अशी कि वीस वर्षांपूर्वी विश्वरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याची विटंबना. मुंबई
घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याची कुणी जातीयवाद्याने विकृत
मानसिकतेतून विटंबना केली. हा हा म्हणता ही बातमी पुर्ण रमाबाई मध्ये पसरली. लागलीच सर्व भिमसैनिक
जमा झाले, जातीयवादाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले पण जमाव
पोलिसांना ऐकत नव्हता. अशातच जातीय मानसिकता असलेला पोलिस निरिक्षक मनोहर कदम ने
गोळीबाराचे आदेश दिले. गोळीबारात कित्येक भिमसैनिक धारातिर्थ पडले. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जावू
लागली. रस्ते, गल्ली चक्का जाम करण्यात आला. जमाव गोळीबारानंतर अधिकच चेतावला गेला. पोलिसांची
नाकीनऊ झाली. 11:30 च्या दरम्यान पोलिसांनी अश्रूधूर व लाठीचार्ज सुरु केला. कित्येक भिमसैनिक गंभीर
जखमी झाले, तरीही मागे हटण्याचे नाव घेत नव्हते. त्या मनोहर कदम ला कदाचित माहित नव्हते की वाघाची
पैदास आहे, कदाचित त्याने 1 जाने 1818 चा इतिहासच वाचला नव्हता. नाहीतर कधीच पळून गेला असता.
जमावाचा उद्रेक होतच होता. खूप वेळा नंतर परिस्थिती कवेत येवू लागली.
शहिद भीम सैनिकांच्या बलिदानाल अख्ख्या देशभरातून मानवंदना देण्यात आली.
तब्बल दोन वर्षानंतर मनोहर कदमच्या विरोधात सेशन कोर्टात केस उभी राहिली.
2006 मध्ये, केस CID कडे सुपुर्द करण्यात आली.
2009 मध्ये, सेशन कोर्टाने जातीयवादी मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली पण लगेचच उच्च
न्यायालयाने जामीन मंजूर केला.
बाबासाहेबांच्या नावासाठी, अस्मितेसाठी मरणारे कित्येक भीमसैनिक अशा कित्येक घटनांतून आजही धारातिर्थ
पडत आहेत.
या घटनेत शाहिद भीम सैनिकांची नावे अशी आहेत :
१)शहिद-सुखदेव कापडणे
२)शहिद-कौसल्याबाई पाठारे
३)शहिद-अमर धनावडे
४)शहिद-नंदू कटारे
५)शहिद-संजय निकम
६)शहिद-संजय कांबळे
७)शहिद-अनिल गरुड
८)शहिद-विलास दोडके
९)शहिद-मंगेश शिवशरण
१०)शहिद-हितेश भालेराव
११)शहिद-बबलू वर्मा
यांच्या बलिदानाला मानाचा जय भिम व निळा सलाम...
जातीय मानसिकता खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत जशी होती, तीच आताही आहे. जातीयवादी बांडगूळे
कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. बाबासाहेबांनी या देशात संविधानामार्फत समता प्रस्थापित करण्याचा, जाती
नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण जात नाही ती जात असं म्हटलं जातं, ते ही फक्त स्वताच्या स्वार्थासाठी जातीला
धरून राजकारण करणारे नेते दरदिवशी डोके वर काढत आहेत. त्यांचाच पाठीराखा या जातीयवाद्यांना आधार
असतो.
या घटनेनंतर आज पर्यंत भोतमांगे हत्याकांड,जवखेडा हत्याकांड अष्या प्रकारच्या अनेक घटना आहेत .पण
आंबेडकरी समाज फक्त निषेध ,धरणा आणि आंदोलने करण्यात वेळ वाया घालवितो .जर तुम्हाला माहीत आहे
कि न्याय मिळण्याच्या अपेक्षा फार कमी असतात किंवा न्याय पालिका हे काम फार सुस्तीत करत तेव्हा तुम्ही
निवडून दिलेल्या नेत्यांना का नाही पकडत तुमचे नेते का गप्प असतात अश्यावेळी आणि जर वेळ आली तर का
नाही तुम्ही अवलंबत "दलित पॅन्थर"ची तर्हा का नाही तुम्हीही घडवू शकत भीमा कोरेगाव .