होय सध्याच वातावरण असच काही बनतय .तुम्ही त्वरित बनू शकता या देशाचे सच्चे देशभक्त जर तुम्ही
चायनीज वस्तूवर बहिष्कार केलात तर .या "सवर्ण संधी"चा त्वरित लाभ घ्या .परंतु काय भारतीयांमध्ये एवढा
दम आहे कि चायनीज मालावर ते पूर्ण बहिष्कार करू शकतात ,उत्तर आहे नाही .
२०१४ मध्ये रुजू झालेलं (अ)भारतीय जनता(जुमला )पार्टीन लोकांच्या नजारा जी.एस.टि. कडून वळविण्यासाठी
पुन्हा एकदा नेहमी प्रमाणे आपली एक नवीन चाल खेळली आहे.यावेळी चक्क चीन मधून आयात होणाऱ्या
सामानावरच बहिष्कार टाकण्याचा भर दिला जात आहे आणि याचा प्रचार त्यांच आय.टी.सेक्टर आणि देशात
त्यांची सोडलेली पिल्लावळ एकदम जोरात करत आहेत .
२०१४ मध्ये मध्ये मोदी सरकार इ.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळा करून सत्तेवर आलं आणि लोकांच्या
मानसिकतेला तुडविण्याचं काम ते नित्यनियमाने करत आहेत .एकीकडे मेक इन इंडियाच नाव घ्यायचं तर
दुसरीकडे ...
ज्या लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एस या भाजपाच्या मातृसंस्थेवर बंदी घातली,त्याच
लोकांनी सत्तेत आल्यावर सर्वात प्रथम सरदार पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्ये उभारू असं जाहीर
केलं व त्यासाठी ३५०० कोटी एवढं बजेट हि ठेवलं .आता हा पुतळा मके इन इंडियाच्या नार्याप्रमाणे भारतामध्ये
मध्ये १००% तयार व्हायला पाहिजे,हो कि नाही? पण इथेच भारतीयांच्या डोळ्यात नेहमीच धूळ फेकण्यात
यशस्वी झालेल्या या जुमला पार्टीने सरदार पटेल यांचा हा पुतळा भारतामध्ये एल अँड टि बनविणार आणि त्यावर
ब्रॉंझ प्लेट्स चायनामधून आयात होतील आणि त्यावर "मेड इन चायना" लेबल असनार .म्हणजेच खायाचे दात
वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे .त्यामुळे असल्या जुमलापासून पुन्हा एकदा सावध राहण्याची गरज आहे .
भारत आणि चीन यांच्यात कधीही युद्ध होऊ शकत आणि हे टाळण्यासाठी म्हणा किंवा चीनला धडा
शिकविण्यासाठी म्हणा जर आपण त्यांच्या चिनी वस्तूवर / मालावर बहिष्कार केला तर त्यामुळे चीनची आर्थिक
परिस्तिथी डगमळीत होऊन तो रसाळताला जाईल आणि मग काही दिवसातच भारत आशिया खंडाचा
महासत्ताधारी बनेल .आजकाल व्हाट्सअप फेसबुक आणि त्याच बरोबर सध्याच्या सरकारला खुश करण्यासाठी
प्रसिद्ध असलेली टि व्ही आणि प्रिंट मेडिया " चायनीज मालावर बहिष्कार घाला "असं आव्हान करत आहेत
आणि त्यांना साथ मिळत आहे इथल्या भरकटलेली भारतीयांची मने.काय खरोखर आपण चायनीज वस्तूवर
बहिष्कार टाकू शकतो.जर असं केलं तर आपलं संपूर्ण घरचं खाली करण्याची वेळ येईल.
जो मोबाइल आपण वापरतो ज्याने नुकतेच मेसेज शेअर केलेत कि "बॉयकॉट चायना" इ भले तो सोनी सॅमसंग
नोकिया मायक्रोमॅक्स कार्बन ओप्पो इ. असतील पण ह्या फोनचे ८०-९०% पार्ट्स चायानामध्ये तयार होतात जर
आपण बॅटरी चेक केली तर त्यावर नक्कीच लिहिलं असेल "Made In China".आता काय करायचं? हा
प्रश्न,अगदी सोपं आहे जर तुम्ही कट्टर भारतीय असाल तर द्या तो फोन लगेच फेकून आणि जर नाही फेकलात
तर मात्र तुम्ही १००% " देशद्रोही " आहात.मग पहा तुमच्यापर्यंत कधीही जुमला पार्टीची पिल्लावळ पोहचू शकते
आणि मग जे होईल ते नाही सांगता येणार .
आताच्या घडीला कॉम्पुटर ९०% लोकांच्या घरात आढळतो .त्यातील ८०-८५% पार्ट्स देखील "Made In
China"चे आहेत ,मग द्या फेकून नाहीतर तुम्हीही ...
लॅपटॉप देखील आताच्या प्रत्येक युवा वर्गाकडे आहेत .भारतात याच वापरण्याचं प्रमाण ५०% च्याही वर
आहे.आणि यातील पार्ट्स देखील "Made In China"चेच आहेत .मग द्या फेकून लॅपटॉप नाहीतर तुम्ही आहात ...
९५% लोकांच्या घरात फ्रिज आहेत परंतु त्यातील पार्ट्स देखील "Made In China"चे असतात,मग द्या फेकून
नाहीतर त्तुम्हीहि ...
आणखीन काय काय आपण फेकू शकतो ते पाहू
घरातील सोलार वर चालणारी वॉटर गिझर,बल्ब्स/ट्यूब आदी उपकरणे ,लगेच फेकून द्या नाहीतर तुम्हीही
आहात
देशद्रोही ...
घरात सरासपणे वापरली जाणारी क्रीम पावडर साबण(अर्थात FMCG products),यात वापरली जाणारी
केमिकल किंवा उपकरणे "Made In China"ची असतात .लगेच बहिष्कार घालून द्या फेकून नाहीतर तुम्हीही ...
जर एखादी भारतीय मेक वस्तू विकत घ्यायची म्हटल्यावर त्याची किंमत आपल्याला परवडणारी नसते . उदा
एखादा प्लास्टिकचा डब्बा भारतीय बनावटीचा १०-२०रुपयास पडतो पण तसाच आणि आकर्षक चायनीज डब्बा
मला त्यापेक्षा कमी किमतीत मिळतो तर मला तोच घेणे परवडणारे आहे .कारण सर्व लोक आपोआपच
कोणतीही वस्तू कमी किमतीत कशी मिळेल यावर भर देतात
म्हणून कोणताही मेसेंग फॉरवर्ड करताना त्याची पाहणी / तपासणी करा .नक्की काय दडलंय या मागे ते पहा
.जस वर सांगिरीतल्याप्रमाणे आपलं लक्ष विचलित किंवा दुसरीकडे करण्यामागे सरकारी प्रयत्न जोमाने काम
करत असतं .यात कोणतीही देशभक्ती किंवा देशप्रेम नाही हे आहेत फक्त तुमच्या भावनेचा केलेला उपयोग .
आता पाहू कस काय जमत या चिनी लोकांना एवढ्या स्वस्त वस्तू बनविणे .जगातील सर्वच मोठ्या ब्रॅण्डचं काम हे
चीन मध्येच पूर्ण केलं जात .चीनचा व्यापार जगभरात पसरलेला आहे आणि तो सर्व देशाना थक्क करणाराही
आहे .
चिनी सरकारच एक धोरण आहे ते म्हणजे " तुम्हाला जे काही पाहिजे ते आम्ही बनवून देऊ " ते कोणत्याच
कामाला नकार देत नाहीत ."तुम्हाला क्वालीटी हवी तशी मिळेल ,जर तुम्हाला स्वस्त हवी तरीही मिळेल
".यावरून लगेच लक्षात येईल कि कश्याप्रकारे चायनीज लोकांची मानसिकता आहे .तर इकडे आपण गोबर
आणि मूत्रात लोळण घेत आहोत .
चायनीज वस्तू कश्याप्रकारे स्वस्त बनविता येतील यावर सरकार मार्फत नवीन संशोधन ,नवीन तांत्रिक बाबी
सतत कार्यरत असतात .तसेच कामगारांना देखील काही त्रास होणार नाही याची दखल घेतली जाते .त्यामुळे
आपल्या देशासाठी आपण कस योगदान करू शकतो याचाच विचार तेथील प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो
जरा आपण चायना आणि भारतिय कामगारांकडे त्यांची काम करण्याची पद्धत पाहू . चिनी कामगार सतत काम
करण्याची क्षमता ठेवतो .कामावर हजर झाल्यापासून आपल्या कामाच्या वेळेत तो टाईमपास करीत नाही टि
ब्रेक ,लंच ब्रेक वेळेनुसार होतात आणि कामात असताना गप्पा थापा नसतात .तर इकडे भारतात आपल्याला
माहीतच आहे आपण कसे वागतो ते .भारतात जर नॉर्मल टाइम ड्युटी हि सकाळी आठ ते दहा वाजता सुरु होये
आणि ८ तास ड्युटी हवर असते जर गृहीत धरूया ड्युटी टाइम सकाळी ९.०० वा ते सायंकाळी ५.०० वा पर्यंत
आहे .सकाळी कसाबसा करत कामावर हजर झाल्यावर सर्वात पहिल फ्रेश होणार ,मग चहा नाश्टा गप्पा वगैरे
होणार त्यात ३०-४५ मिनिटे वाया गेली .पुढे ३ तासांनी होणाऱ्या लंच ब्रेक मध्ये ३०-६० मिनिटे जेवणात
गप्पागोष्टींतच वाया घालविणार,आणि पुढल्या ३ तासांनी सुटण्याचा अगोदर ३०-४५ मिनिटे चहा पाणी आंघोळ
आणि इतर वेळ काढावी पानांची कामे होणार . याचाच अर्थ ८ तासांमधले २.५ ते ३.५ तास असेच वाया
घालवलेली असतात .आणि मग निघताना शेवटी बोलणार आज तर खूप काम झाले थकलो आता .तुमच्या या
वाया गेलेल्या वेळेतच चायनीज लिकांनी बाजी मारली .त्यांनी जगाला दाखवून दिलय कि कामात असताना
वायफळ गोष्टींना महत्व न देणं . परंतु आपण तर भारतीय आहोत ना आपला काय दोष ?
कामगारांवर होणारा खर्च या चायनीज कंपनी मध्ये कमी असतो.
चायनीज सरकारकडून तिथल्या छोट्या मोठ्या कंपन्यांना/ उद्योजकांना काय मिळत
सर्वात कमी वीज दर
सर्वात कमी पाणी कर आणि बिल
निर्यात होणाऱ्या मालावर सवलत आणि इतर सुविधा
एकाच कंपनीकडून एकाच मालाची जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढविणे
तसेच वायफळ होणाऱ्या खर्चावर कश्याप्रकारे नियंत्रण आणावे यासाठी प्रयत्न
तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी आधुनिक उपकरणे आणि साधने
नवनवीन संशोधन शोधासाठी सरकारी मदत
कश्याप्रकारे उत्पादन क्षमता वाढविता येईल यावर होणाऱ्या संशोधन आणि कार्याला नेहमीच प्रोत्साहन
मोढ्या उद्योजकांसाठी काम करणारी किंवा कच्चा माल पुरविणारी लघु उद्योगालाही प्रोत्साहन
मोठ्या उद्योगा लगतच छोट्या उद्योगांना प्राधान्य त्यामुळे आपोआपच ट्रान्सपोर्ट खर्च आटोक्यात येतो .
तर भारातात यांच्या विपरीत परिस्तिथी आहे
आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण चायनीज कंपन्यांना टक्कर देऊ शकत नाही असं नाही पण त्यासाठी
आपल्याला बरेच त्याग करावे लागतील.सर्वात महत्वाचं जे कामगार वर्ग आहेत भले ते सरकारी असो वा प्रायव्हेट
यांनी वेळेचा सदुपयोग करा. आपनही एक प्रॉडक्टला लागणारे सर्व मटेरियल इथेच तयार करून त्याच्या किमती
चायनीज कंपनीच्या किमतीपेक्षा किंवा त्याच्या इतकीच असायला हवी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा
दर्जाही उत्तम राखला पाहिजे. यासाठी सरकारकडून योग्य ती मदत मिळणे आवश्यक आहे .जेव्हा सरकारला
कळेल कि त्यांना देश कसा पुढे आणि त्यासाठी लागणारी आवश्यक गरजा कोणत्या तेव्हा आपण एक समृद्ध
आणि ताकतवर देश बनवू शकतो .