होय,जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारला असता तर आपण ( पूर्वी जे अस्पृश्य होते आणि
आता नव-बौद्ध आहेत ते ) ही कदाचित शीख धर्मात समाविष्ट झालो असतो . जेव्हा बाबासाहेबानी हिंदू धर्मात
सुधारणा आणण्यासाठी आणि त्याच बरोबर अस्पृश्य समाजाला हिंदू धर्मात काय स्थान आहे,हे पडताळण्यासाठी
आंदोलने आणि सत्याग्रह केले. त्यात प्रामुख्याने " महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह ","काळाराम मंदिर
सत्याग्रह " मुख्य आहेत .जेव्हा त्यांच्या लक्षात आले कि अस्पृश्य समाजाची गिणतीच होता नाही आणि त्यांची
किंमत नगण्य आहे .ते फक्त हिंदू धर्मात संख्या दाखविण्यासाठीच आहेत .त्यांना बाकी लोकांसारखे कोणतेही
अधिकार नाहीत म्हणून बाबासाहेबानी १९३२ साली नाशिक मधील येवला या ठिकाणी शपथ घेतली कि मी या
हिंदू धर्माचा त्याग करीन, " जरी माझा जन्म हिंदू धर्मात झाला आहे पण मी हिंदू म्हणून मरणार नाही कारण जन्म
घेणं माझ्या हातात नव्हते परंतु मरण (कोणत्या धर्मात व्हावे हे) माझ्या हातात आहे ".
पुढे मग त्यांनी धर्म परिवर्तनासाठी कोणता धर्म आपल्या या समाजाला उन्नतीचा मार्ग देईल याचा त्यांनी अभ्यास
करायला सुरुवात केली .आणि मग याच दरम्यान ते शीख धर्माकडे आकर्षित झाले .
एप्रिल १९३६ मध्ये अमृतसर येथे शीख बांधवांनी आयोजित केलेल्या " मिशन शीख " या कार्यक्रमात डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित केलं होत.यावेळी लोकांना संबोधित करताना म्हणाले कि मी नक्की केलय
कि हिंदू धर्माचा त्याग करेन परंतु अजून मी ठरवलं नाही कि कोणता धर्म स्वीकारू,यावर माझा अभ्यास सुरु
आहे .याचवेळी त्यांना "जात पात तोडो मडल " यांनी लोहाराच्या एका सभेसाठी आमंत्रित केलं पण एक अट
घातली कि तुम्ही वेदांवर निंदा करू नये .पुढे बाबासाहेबानी यावर एक ग्रंथाचं लिहिला
" जातीचा विनाश "(an anhilation of caste),या ग्रंथाने तर ब्राह्मण / हिंदू धर्मावर त्यांनी जोरदार कांन उघडणी
केली परंतु संपूर्ण सवर्ण समाज बाबासाहेबांच्या विरोधात गेला .याठिकाणी त्यांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले
कि महाराष्ट्रात संत परंपरा आहे पण ती सामाजिक क्रान्ति घडवू शकली नाही पण शीख धर्माने याअगोदरच गुरु
नानकाच्या नेतृत्वाने एक धार्मिक आणि सामाजिक क्रान्ति केली आहे .बाबासाहेबांच्या मते सामाजिक आणि
राजकीय क्रांती करण्याअगोदर डोक्यातील मेंदूमधील ज्या खोट्या परंपरा आणि अमानवीय विचार आहेत याचा
नाश करणे गरजेचं आहे ,म्हणूनच जर राजनीतिक क्रान्ति आणायची असेल तर सामाजिक व धार्मिक क्रांती
यशस्वी झाल्यावरच येऊ शकते .ते पुढे म्हणतात जर मी हिंदूच्या दृष्टीने पहिले तर देशात हिंदू धर्मा व्यतिरिक्त
मुस्लिम ,शीख आणि ख्रिस्ती धर्मही आहेत .तर मग यातील श्रेष्ठ धर्म कोणता ? अर्थात शीख .कारण जर मी आणि
अस्पृश्य समाजाने जर ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्म स्वीकारतील तर ते लगेच हिंदू धर्माच्या वेगळे होतील कारण हे
दोन्ही धर्म परकीय आहेत पण जर का शीख धर्म घेतला तर अस्पृश्य समाज कमीत कमी हिंदूंच्या संस्कृतीशी
जवळीक साधेल .त्यामुळे आपोआप हिंदू धर्मियांना त्याचा फायदा हि होईल .त्याचबरोबर मुस्लिम धर्म घेतला तर
त्यांची संख्या जास्त होऊन पुढे मोठं संकट उभं राहू शकत आणि ख्रिस्ती धर्म घेतला तर ब्रिटिश सत्ता
भारतावरची पकड अजून घट्ट करील .
बाबासाहेबानी आपल्या मनात चाललेली खळखळ आपल्या साथीदारांना(अनुयायांना ) सांगितली कि शीख धर्म
स्वीकारायचा कि अन्य कोणता धर्म स्वीकारायचा . मुंजे यांनी सांगितलं कि जर शीख धर्म घेतला तर आपल्याला
अनुसूचित जाती अंतर्गत पूना पॅक्ट च्या समझोत्यानुसार सगळ्या सवलती हि मिळतील .
यासाठी८ सप्टेंबर १९३६ मध्ये बाबासाहेबानी आपल्या काही अनुयायांना शीख धर्माची अधिक माहिती
मिळविण्यासाठी अमृतसरला पाठविले .परंतु ते शीख धर्माकडे आकर्षित होऊन त्यांनी शीख धर्म स्वीकारला
.पुढे त्या लोकांचं काय झालं याबद्दल काही माहिती नाही .
१९३९ मध्ये "आखिल भारतीय शीख मिशन" तर्फे "वैशाखी महोत्सव" मध्ये बाबासाहेबाना निमंत्रित करण्यात
आले .आणि त्याचवेळी बाबासाहेब आणि शीख नेता तारा सिंग यांच्याशी मतभेद झाले.कारण तारा सिंगला
कळून चुकले होते कि बाबासाहेबांचा प्रभाव देशभर आहे आणि जर इतकी मोठा अस्पृश्य जमात आमच्या
धर्मात प्रविष्ठ झाली तर आपल्या धर्माच्या लोकांचं वर्चस्व कमी होईल आणि या अस्पृश्य समाजाचं वर्चस्व
प्रस्थापित होईल आणि आपली नामुष्की होईल व नक्कीच डॉ आंबेडकर हेच मोठे नेते म्हणून ठरतील .
बाबासाहेबांचं शीख धर्माबद्दल अभ्यास चालूच होता आणि मग त्यांना जाणवलं कि शीख धर्म हा समानतेवर
आधारित आहे .पण त्यात अजून एक जमात अशी आहे त्यांना ते मजहबी शीख म्हणून ओळखतात .मजहबी
शीख म्हणजे जे संत रविदास यांचे अनुयायी.यांच्यावर देखील शीख धर्माने अस्पृश्य समाजासारखा बहिष्कार
केलेला आहे.त्यांना वेगळ्या ठिकाणी बसवलं जायाचं.त्यांच्यावर एकप्रकारे सामाजिक बहिष्कारच होता .ते
भूमिहीन होते आणि ते शीख मधील जाट जातीच्या लोकांचे एकप्रकारे गुलामच होते. एकूण काय तर तिथे हि
भेदभाव केला जात होता .मग बाबासाहेबाणाच्या मनात दुःखद भाव निर्माण होऊन त्यांना जाणवलं कि असं
आपल्या समाजासोबतही होऊ शकत .फरक फक्त इतकाच झाला असता कि
" हे बघा पगडी घातलेले अस्पृश्य "
म्हणून लोकांनी डिवचले असते .
आणि मग हळू हळू शीख धर्माविषयी त्यांच आकर्षण कमी होऊ लागली आणि मग त्यांनी पुन्हा एकदा
धर्मपरिवर्तनासाठी नक्की कोणता धर्म आपल्या अस्पृश्य समाजासाठी योग्य ठरेल याचा अभ्यास सुरु केला
.त्यांना अश्या धर्माची गरज होती जो मुळता: भारतीय असेल ,तो तर्क वितर्क नसेल ,ज्या धर्मची नवीन युग निर्माण
करण्याची क्षमता असेल ,जो धर्म अंधविश्वासाला थारा देनारा नसेल ,जो आधुनिक आणि तर्क शुद्ध असेल,जो
वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा असेल,जो धर्म समानतेला मानणारा असेल ,ज्या धर्मात अशी कोणतीही बंधने
नसतील ,ज्या धर्मात स्त्री पुरुष भेदभाव नसेल ,ज्या धर्मामुले आपला हा अडाणी समाज नरकातून बाहे पडेल,ज्या
धर्मामुळे या समाजाला आपणही या देशाचे नागरिक आहोत असे वाटेल ,ज्या धर्मामुळे या अस्पृश्य समाजातील
लोकांचे कल्याण होईल.अश्या एक ना अनेक विषयांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातलं होत .परंतु शेवटी त्यांना
बालपणीच्या केळुस्कर गुरुजीं दिलेलं गौतम बुद्धांचा पुस्तक डोळ्यासमोर येऊ लागलं आणि मग सुरुवात झाली
एका नवीन युगाची .बाबासाहेबाना जश्या धर्माची गरज भासत होती त्यांची संपूर्ण उद्दिष्ठ यात समाविष्ट होती
.यावर त्यांनी " बुद्ध आणि त्यांचा धम्म " हा ग्रंथ लिहिला
१४ ओक्टोम्बर १९५६ मध्ये नागपूर येथे आपल्या ५ लाख अनुयायांसोबत महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी
बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि जगाच्या इतिहासात एकही रक्ताचा थेंब न सांडणारी अशी महाक्रान्ति झाली
.इतिहासात याची नोंद सुवर्ण अक्षरात झाली .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा क्रान्तिकारी भाषणही केलं .डॉ
बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा हिंदू धर्माकडे न वळण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या .बाबासाहेबानी नुसताच
बौद्धधम्म दिक्षा घेतली नाही तर या भारत देशाचा नष्ट झालेला मूळ बौद्ध धम्म पुन्हा भारतात आणला व सम्राट
अशोकानंतरची सर्वात मोठी धम्मकराअंती ठरली . यानंतर बाबासाहेबानी भारत बौद्धमय करण्याचा निर्धार
केरन ते बौद्ध धम्माचा प्रचार करू लागले.
परंतु पुढील दोन महिन्यातच ६ डिसेंबर १९५६ साली दीर्घ आजाराने त्यांचं अकस्मित निर्वाण झालं.मुंबई मध्ये
बाबासाहेबांच्या शय्येजावळ डोळ्यातुन वाहणाऱ्या अश्रुसहित १० लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.आणि
हि देखील एक अजरामर ऐतिहासिक घटना ठरली. जगाच्या इतिहासात फक्त हि एकच घटना जिथे मृत्यूशय्येला
साक्षी ठेवून लाखो लोकांनी धर्म परिवर्तन केले.
आपण पाहत आहोत जो समाज एकावेळेस कचर्यात फेकलेल्यासारखा होता,ज्याच्याकडे कपडे पैसे घर असं
काहीही नव्हते , आज तो समाज शिकून सवरून या आधुनिक युगात आकाशात उंच उंच भरारी घेत आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं ऋण कधीही न फिटणार आहे .
ज्यान आपल्याला या नरकातून बाहेर काढलं अश्या
महामानव क्रान्तिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन व विनम्र अभिवादन !