डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचं अतूट असं नातं आहे .डॉ बाबासाहेब
आंबेडकरांना शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत शिष्यवृत्तीच्या माध्यमाने सयाजी गायकवाड यांनी केली
त्यांच्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात जाऊन डॉक्टरेट्स आणि इतर पदव्या मिळविल्या .परंतु
यासाठी त्यांनी बाबासाहेबांपुढे एक अट ठेवली होती कि जेव्हा शिक्षण पूर्ण होईल तेव्हा या दिवाणखान्यात नोकरी
करावी लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर १९१७ मध्ये जेव्हा लंडन हुन परतले तेव्हा त्यांनी ठरल्याप्रमाणे बडोदा
संस्थानात दाखल झाले .बाबासाहेबाना बडोदा स्थानक ते बडोदा संस्थान आणण्यासाठी महाराज्यांनी अगोदरच
आदेश काढले होते . पण एका अस्पृश्य व्यक्तीला आणण्यासाठी ब्राह्मणोत्तर मंडळींनी टाळले.पण बाबासाहेब
स्वता:च त्या संस्थानात पोहचले. महाराज्यांनी त्यांना वित्तमंत्री म्हणून ठेवायचे होते परंतु बाबासाहेबांकडे
त्याप्रकाराचा कोणताही कामाचा अनुभव नसल्याने त्यांनी त्यांना सेनेच्या सचिव पदाची नोकरी दिली.
परंतु अजून त्यांचा मूळ प्रश्न राहण्याचा मिटला नव्हता .एवढ्या मोठ्या शहरात कुठे राहता येईल याची ते तजवीज
करीत होते. पण त्यांचे सर्व प्रयत्न विफल गेले.त्यांनी हॉटेल्स लॉज स्थानिक आश्रम याठिकाणी राहण्यासाठी जागा
पाहू लागले. पण एक अस्पृश्य महार असल्यान त्यांना कोणीच साधं उभही करत नव्हतं .अश्यातच ते एका
पारशी धर्मशाळेपर्यंत पोहचले .पण इथे त्यांनी थोडी शक्कल लढविली जर इथेही मी जात सांगितली तर मला
हाकलून देतील त्यापेक्षा मी इथे जात लपवून एक ब्राह्मण आहे असं सांगेन आणि या खोट बोलण्याने त्यांना ( शंका
नजररेने) त्या धर्मशाळेत एक रुम मिळाला.
बाबासाहेब नोकरीला जाऊ लागले पण तिथे शिवाशिव बरीच होती. प्रत्येकजण बाबासाहेबांच्या आसपास हि
भटकत नव्हता .बाबासाहेब बाहेर गेल्यानंतर गोमूत्र शिंपडून लगेच ती जागा पवित्र करण्यात येई .शिपाई देखील
बाबासाहेबानी मागविलेली फाईल दुरूनच त्यांच्यापर्यंत फेकून देत होते .इतकाच काय पण त्याठिकाणी
असणार प्यायचं माठातील पाणीही पिण्यास बाबासाहेबाना मनाई होती .बाबासाहेब फार मोठ्या चिंतेत पडले होते .
काही दिवसातच वार्ऱ्याप्रमाणे बातमी हिंदू रक्षकांपर्यंत पोहचली कि मुंबई मधील एक महार
जातीतला अस्पृश्य
आंबेडकर नावाचा माणूस महाराज्यांकडे सचिव पदावर नोकरीला आहे. आणि तो एका पारशी धर्मशाळेत
राहतो .ब्राह्मण समाजातील लोकांच्या आणि हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली
आणि मग २३ सप्टेंबर १९१७च्या सायंकाळी नऊच्या दरम्यान काही तथाकथित ब्राह्मण आणि इतर हिंदूनी
हातात लाठी काठी घेऊन जनसमुदायाने पारशी धर्मशाळेवर मोर्चाच काढला .त्यांच्या म्होरक्याने बाबासाहेबाना
सरळ विचारले कि तुमची जात कोणती ? बाबासाहेब नम्रपणे म्हणाले कि मी हिंदू आहे .पण तुम्ही नक्की
कोणत्या जातीचे ? त्यावर मात्र गोंधळ झाला आणि तोपर्यंत धर्म रक्षकांनी बाबासाहेबांचं सार सामान घरातून
फेकून दिल .बाबासाहेबानी त्यांना काही तासासाठी मला येथे थारा द्यावा मग मी सकाळीच इथून निघून
जातो,अशी विनंतीही केली पण कोणीही हे ऐकण्यास तयार नव्हते.कारण एका अस्पृश्य व्यक्तीने तो परिसर
गलिच्छ झाला होता ,अपवित्र झाला होता .शेवटी बाबासाहेब डोळ्यातील आपल्या अश्रू साठवून आपले सामान
घेऊन तिथून हळू हळू निघू लागले.मनात बरीच किलबिल चालू होती .त्यांनी तेव्हा काही अन्य ठिकाणी रात्रभर
तरी कुठे आपली राहण्याची व्यवस्था होते का पाहिले.पण कोणीही हिंदू वा मुसलमान वा कोणी अन्य जातीचा
त्यांना ठेवण्यास तयार झाले नाही.
शेवटी विसाव्यासाठी एका (कामठी ) बागेत गेले (जे सयाजी उद्यान म्हणून ओळखलं जात ) एका वृक्षाखाली
बसले आणि शेवटी त्यांनी हबरठा फोडला .त्यांनी पाहिले त्याठिकाणी त्यांच्या पायाखाली जमीन आणि वर उघड
आभाळ .डोळ्यातुन न थांबणारे अश्रूनी ते एकटक आकाशाकडे पाहू लागले .आणि त्यांच मन अनेक प्रष्णानी
ग्रासलं गेलं .त्यांनी फार खोलवर विचार केला .त्यांनी विचार केला मी इतका शिकला सवरलेला ,वर डॉक्टरेट
मिळविलेला एकमेव अस्पृश्य समाजातील व्यक्ती ,विदेशात शिक्षण घेतलेला,टापटीप राहणारा ,व्यवस्तिथ
सुटाबुटात वावरणार;पण शेवटी काय उपयोग ...जर अश्याच यातना मिळणार असतील तर कश्याला एवढं
शिकलो मी.त्यांच्या मनात स्वता: विषयीच एक चीड निर्माण झाली .तर मनाच्या दुसर्या कोपर्यात लहानपणीच्या
अन्यायाची दृश्य डोळ्यासमोर घुमू लागली .आणि मग त्यांच्या लक्षात आलं कि त्यांना या मिळालेल्या यातना हे
इथल्या व्यवस्थेपैकी एक आहे .हि एका समाजाने दुसर्या समाजावर केलेली एक प्रकारची व्यवस्थाच होती.जर
का मी इतका शिकून बॅरिस्टर असून देखील माझी जात काही केल्या जात नाही .जर हे सगळं माझ्यासारख्या
शिकलेल्या माणसानांसोबत होत असेल तर बाकी आपल्या अस्पृश्य समाजा सोबत किती भयंकर अन्याय होत
असेल ? कश्या प्रकारे त्यांना वागणूक मिळत असेल,ते तर अशिक्षित ,लाचार,आणि घाणेरडे राहणारे आहेत
.त्यांना तर याहीपेक्षा वाईट परिस्तिथीला तोंड द्यावे लागत असेल.आणि त्याचवेळी आपले अश्रू रोखून त्यांनी एक
संकल्प केला कि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या जातीच्या दलदलीत विभागलेल्या माझ्या समाजाला नक्की
बाहेर काढीन . त्यांच्यी सर्व कष्टे दूर करिन .असं मनाशी ठाम ठरवून ते ताडकन उठले अन बडोदा स्टेशन
गाठले आणि थेट मुंबईला आले .
आणि आपल्याला माहीत आहेच कि त्यानंतर बाबासाहेबानी सत्याग्रह आणि आंदोलने केली .त्यात जागतिक
इतिहासात नोंद झालेले पाण्यासाठी झालेला "महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह " आणि मंदिर प्रवेशासाठी
झालेला " काळाराम मंदिर सत्याग्रह ".या आणि अश्या कितीतरी आंदोलनांनी त्यांना कळून चुकले होते कि
अस्पृश्य समाजाला हिंदू धर्मात बिलकुल स्थान नाही .आणि पुढे मग येवला येथे धर्मान्तराची घोषणा ते करतात
आणि १४ ओक्टोम्बर १९५६ ला आपल्या ५ लाख अनुयायांसहित बौद्ध धम्माची दीक्षा घेतात.त्यांनी या समाजाला
हिंदू अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या आणि त्याचबरोबर एक मूल-मंत्र दिला "शिका ,संघर्ष
करा.संघटित व्हा ".
त्यांनी धम्म दीक्षा घेऊन पूर्ण केला .आज आपण शून्यातून वर आलेलो आहोत . ६० वर्षांपूर्वी भिकारी / उपेक्षित
अवस्थेत असणारा हा अस्पृश्य समाज नव-बौद्ध म्हणून वावरत आहे आणि आज चांगल्या घरात सुखाने
राहतोय.आज त्याला त्या गोष्टी सहन कराव्या लागत नाहीत ज्या बाबासाहेबानी झेलल्या होत्या. परंतु आजही
बाबासाहेब आपल्या सोबत संविधानाच्या रूपात आहेत.
होता (जो सयाजी बागेत आहे तो) त्याठिकाणी एक शिलालेख बनविला. दरवर्षी २३ सप्टेंबरला हजारो-लाखो भीम
सैनिक ( बाबासाहेबांचे अनुयायी )तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना द्यायला येतात. मागील दोन
वर्षांपूर्वी केंद्रात आलेल्या भाजप सरकारने हा "संकल्प दिवस" राष्ट्रीय दिन पाळण्याचा जाहीर केलं आणि
बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणांनी पावन झालेल्या त्या भूमीला संकल्प भूमी असं नाव देण्यात आलं .
सप्टेंबरला देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम सैनिक बाबासाहेबाना मानवंदना देण्यासाठी संकल्प भूमीवर
येणार आहेत .तसेच देशभरातुन बाबासाहेबाना मानणारे मान्यवर आणि इतर पक्षपातील/समाजातील मान्यवर
नेते येणार आहेत.तरी यादिवशी आपणही उपस्तिथ राहून या शताब्दी वर्षाचे साक्षीदार होऊन आपणही आपल्या
जीवनात आपल्या समाजाच्या उद्धारासाठी एक संकल्प करूया !
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अभूतपूर्व कार्यास माझा सलाम व त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन .