मागील चार ते पाच वर्षांपासून सोशल मीडिया जसे फेसबुक ,व्हाट्सअप ,यु-ट्यूब ,इंस्टाग्राम आदी. भारतात
ऍक्टिवेट झालं सुरुवातीला एक किंवा दोन आणि मग आता बरेच आंबेडकरी युवक युवती हे सोशल मीडियाच्या
माध्यमातून एकमेकांशी जोडले जाऊ लागले .सोशल मीडिया वर एक प्रकारे आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि
प्रचार एखाद्या निळ्या वादळासारखा पसरत चालला आहे .सकाळ संध्याकाळ चोवीस तास प्रत्येक जण डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ,त्यांनी केलेलं कार्य इत्यादी सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत
बाबासाहेबांविषयी माहिती त्यांचं कार्य क्वचितच कुठल्यातरी मोठ्या न्युज-पेपर मध्ये किंवा मासिकांमध्ये
वाचायला मिळते पण या सोशल मीडियामुळे लगेचच बाबासाहेबांविषयी माहिती उपलब्ध होऊ लागली आणि हा
हा म्हणता तो आपल्या समाजाच्या जवळ येऊ लागला .या सोशल मीडियात वावरणारी बर्याच ग्रुप पैकी एक ग्रुप
एक म्हणजे FAM -फेसबुक आंबेडकर मुव्हमेंट .यांनी फेसबुक पेज तयार करून एक एक मेंबर जॉईन झाले
आणि प्रत्यक्षात त्यांनी एक सामाजिक संघटनाच तयार केली ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करू लागले
FAMला आपण चैत्यभूमी या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी सामाजिक कार्य करताना पाहू शकतो. त्यांच्या
जोडीला इतर सोशल मीडियावरून तयार झालेल्या संघटनाही काम करताना दिसतील .
आता कोकणरत्नभूमी सामाजिक संघटन म्हणून नावारूपाला येत असलेली संस्था आहे .हि संस्था मागील अडीच
वर्षांपासून विविध कार्यक्रमाच आयोजन करून कार्यरत आहे .ह्यांनी देखील फक्त व्हाट्सअपग्रुप द्वारे खास
करून कोकणी माणसाला ( रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,रायगड जिल्हा ) एकत्र आणले.आता आपल्या विविध
कार्यक्रमाद्वारे ती महराष्ट्राच्या परिचयाची होत आहे .या दोन संघटनाच नाव घेण्यामागे कारण असे कि ह्या दोन्ही
संघटना महाराष्ट्राच्या परिचयाची झाली आहे .या व्यतिरिक्त युवक पॅन्थर ,तथागत ,बुद्ध लेणी संवर्धन इ सोशल
मीडिया द्वारे सर्वांच्या परिचयाचे आहेत.
यातून असं दिसतंय कि आंबेडकरी चळवळ प्रत्यक्षात सोशल मीडिया द्वारे जास्त जोमाने पुढे सरकत आहे .
आता राहिला सोशल मेडिया वरील इतर ग्रुपचा .काय हे ग्रुप चळवळीचा भाग आहेत कि नुसती त्यांची
वळवळीचा भाग आहे ?
जर आपण सोशल मीडिया वर पाहिले खास करून फेसबुक आणि व्हाट्सअप वर काही रेगुलर पोस्ट फिरत
असतात .त्यामुळे मुख्य किंवा प्रत्यक्षात कोण काम करत हे बाजूला राहून जात .अर्थात जर यांना आपण
विभागाला प्रत्यक्ष काम करणारे आणि अप्रत्यक्ष काम करणारे( जे फक्त रिसिव्ह झालेला मेसेज पटकन फॉरवर्ड
करतात ते किंवा चळवळीचे साथीदार नसणारे ) .त्यामुळेच प्रत्यक्ष काम करणाऱयांमध्ये अप्रत्यक्ष रूपाने काम
करणार्यान विषयी एक प्रकारची चीड असते( जरी बोलून दाखवीत नसले तरीही ).आणि चिड येन स्वाभाविकच
आहे . जे प्रत्यक्ष काम करणारे एक आंबेडकरी चळवळीचा भाग समजून काम करतात तर दुसरीकडे फक्त
शेअर करणारे समजतात कि आपणही या चळवळीचा हिस्सा आहोत . अर्थात एक चळवळीवाला तर दुसरा
फक्त वळवळीवाला असे डॉ भाग होतात .त्यातूनच जेव्हा एखाद्या चळवळीतला भीम सैनिकाला बिगर
चळवळीतला माणूस भेटतो तेव्हा त्याच्या मनात एक प्रकारचा अहंकार उत्पन्न होतो (तेही स्वाभाविकच आहे )
आणि तो बिगर चळवळीवाल्याकडे काना डोळा करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो . व मनात पुटपुटतो ---
फक्त टाइम पास करतात. याचा अर्थ ती व्यक्ती त्यांना नकोशीच वाटते .
जर का आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात गेलो तर असं दिसत कि त्याकाळी लोकांपर्यंत आपले
विचार पोहचण्यासाठी एकमेव आधार होता फक्त न्यु-पेपर .आणि म्हणूनच बाबासाहेबानी पत्रकाराला
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला होता.त्याच बरोबर बाबासाहेब म्हणाले होते कि तुमची कोणतीही चळवळ (
संघर्ष ) यशस्वी होण्यासाठी तुम्हा सोबत हा चौथा खांबा हवाच .त्यासाठीच बाबासाहेबानी देखील आपले विचार
सर्व समाजापर्यंत पोहचण्यासाठीच बहिष्कृत भारत इ. पत्रकही काढली.एका अर्थाने हि पत्रक किंवा न्यु पेपर
तुमचं कार्य बयाण करतिलच आणि तुम्ही केलेल्या कार्याचा एक प्रूफ म्हणून हि ठरेल.
बाबासाहेबांचं उदाहरण देण्याचं कारण हेच कि जर तुम्ही कोणाला हि गैर चळवळीतला माणूस म्हणून लेबल
लावत असाल तर १००% चुकीचं आहे . कसे ते पहा ,
तुम्ही प्रत्यक्षात काम करता बरोबर .
तुम्ही १००-१,००,००० जण मेंबर गोळा करून प्रत्येक एरियात ,गावागावात जाऊन ,घरोघरी जाऊन ,सभा घेवून
मार्गदर्शनाचा काम करता .
आणि मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही केलेल्या कामाचा काही पोस्ट आणि फोटो सोशल मीडिया वर शेअर
करता .
आता हि शेअर केलेली पोस्ट किती लोक पाहणार अर्थात जे तुमचे मेंबर आहेत १००-१,००,००० तेवढेच किंवा
जास्तीत जास्त अजून १०-२०% लोक पाहतील वा वाचतील .
म्हणजेच ज्या लोकांनी जे काम केलं फक्त त्यांनीच या पोस्टला वाचले .
याचा अर्थ तुमचं काम फक्त तेवढ्याच लोकांपुरते मर्यादित झालं आहे ,त्याच्यापुढे नाही .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला पत्रकारितेचा विषय नीट समाजालाच नाही .
प्रस्थापित करू शकलात नाही तर तुम्ही काही कामचं केलं नाहीअसं होईल.
मग अश्या वेळी हा गैर चळवळीतला माणूस उपयोगी पडतो .तो फक्त शेअर करतो आणि ती बातमी पुढे
अजूनही शेअर होत जाते आणि तुम्ही केलेलं कार्य बर्याच लोकां पर्यंत पोहचत.
येथे एक उदाहरण द्यावासा वाटतंय ;
तुम्हाला माहीत असेलच ज्या प्रमाणे कोणत्याही बँकेत बॅक ऑफिस( Back Office ) म्हणून टीम असते जिला
कोणीही ओळखत नाही आणि त्या बँकेचा आणि त्यांचा प्रत्यक्षात काही संबंध येत नाही .आपण फक्त कॅशियर
,पैसे गोळा करणारे ,मॅनेजर इ लोकांनाच पाहतो / ओळखतो .पण हे बॅक ऑफिसर आपलं काम चोख करतात
.आणि त्यांच्यामुळेच बँकेची काम करण्याची क्षमता व कार्यकर्ण्याची पद्धत मध्ये बदल होतो .
अगदी तसाच आहे या गैर चळवळीच्या माणसाचं .तो हि एक चळवळीचा हिस्सा आहे त्याला दूर लोटू नका .तो
आज कदाचित काही कारणाने लांब आहे ,पण तो चळवळीशी दूर नाही .आज ना उद्या तो हि येऊ शकतो
तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावायला .
हि एक वाद्ग्रस्थ पोस्ट आहे. यात कोणाच्याही भावांना दुखविण्याचा हेतू नाही किंवा नव्हता , संघटनेच्या नावाचा
उल्लेख आहे पण तो फक्त उदाहरण म्हणून घेतलं आहे आणि त्यांचा वेल दिलेल्या घटनांची तिळमात्र संबंध नाही .
या पोस्ट द्वारे" समजनेवालों को इशारा काफी है " काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळाले असणारच .
जर आवडल्यास/नावडल्यास नक्की शेअर व कॉमेंट करा .