डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती काय दर्शविते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती काय दर्शविते - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, July 29, 2017

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती काय दर्शविते

<img src="ambedkar-statue.jpeg"=dr.babasaheb ambedkar statues ambedkar-staue">


आज आपण पाहतो कि एकेकाळी ज्या व्यक्तीला सर्वानी दुःख्ख दिली , इतकं छळलं आणि इतकाच काय

त्यांच्या मृत्यु नंतरही त्यांचे दस्तावेज नाहीसे कसे करता येईल याकडे जास्त कल असणारे आता मात्र त्या

महापुरुषाच्या चरणी आपला माथा टेकवितात आणि त्यांचा जयजयकार करतात .होय तुम्ही बरोबर ओळखलंत

ते महापुरुष म्हणजेच डॉ भीमराव रामजी आंबेडकर .आपण त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणून एकदम

चांगल्या प्रकारे ओळखतो .खरतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुन्हा जिवंत करून सर्वांच्या हृदयात 

खोलवर आंबेडकरी विचार रुजविणार्या मान्यवर कांशीरामजी यांना शत शत नमन.कांशीरामजी यांनीच

डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांची स्वप्नपूर्ती केलीआहे हे आपल्याला उत्तर प्रदेशात त्यांनी केलेली बहुजन समाज पार्टीची स्थापना आणि ह्या

पार्टीन सतत वीस वर्ष राज्य केलं.  

त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर एका निळ्या वादळाप्रमाणं देशभसहित संपूर्ण देशात पसरलं .बाबासाहेबांची

आठवण म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला किंवा मुर्तीला नमन करतो .कारण त्यांनी केलेल्या उपकाराची आपण

परत फेड कधीच करू शकणार नाही याची जाणीव आपल्या मनाच्या कोपर्यात कायम राहणार आहे .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे भारतात तर उभारलेले आहेतच पण परदेशातही उभारले जाऊ लागले

आहेत .

कारण : बाबासाहेब हे सकारात्मक विचाराचे प्रतीक आहेत .बाबासाहेब हे ज्ञान-बुद्धी चे प्रतीक आहे .बाबासाहेब

हे अन्यायाविरुद्ध लढण्याचं प्रतीक आहे .बाबासाहेब हे मानवतेचा प्रतीक आहे .बाबासाहेब हे संघर्षाचे प्रतीक

आहे .बाबासाहेब हे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे प्रतीक आहे बाबासाहेब आंबेडकर यांची नुसती मूर्ती

पाहण्याने अंगामध्ये एका विजेसारखा ऊर्जेची उत्पन्न होते.


<img src="ambedkar-statue.jpeg"=dr.babasaheb ambedkar statues ambedkar-staue">


आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण जेव्हा बाबासाबांचा पूर्णाकृती पुतळा पाहतो तेव्हा त्यांच्या डाव्या हातात

कमरेजवळ घेतलेलं "भारतीय संविधान" आहे तर त्यांचा उजवा हात हवेत सरळ ( अंदाजे पंचेचाळीस कोन)

आणि त्यांचं एक बोट सरळ असत याच काय कारण आहे .तर यामागे आहे इतिहास .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी वाटे कि मी जे हाल उपभागले आहेत ते हाल माझ्या अस्पृश्य समाजाला

मी कधीच भोगू देणार नाही .मग त्यांनी भारतीय संविधान मार्फत इथल्या सर्व दबलेल्या मागासलेल्या माणसाला

जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी दिला .त्यांनी देशाती सर्वच नागरिकांना एका समतेवर आणण्याचे प्रावधान कायद्याने

संविधानात मांडले. म्हणजेच बाबासाहेबांच्या त्या हाताचा अर्थ होतो कि उठ आणि जा सरळ मार्गाने मी

तुझ्यासाठी एक वाट करून दिलीय .

बाबासाहेब आंबेडकर यांचं बोट त्यांच्या हाताच्या सरळ रेषेत आहे आणि जर का हे बोट त्यांनी उभारलेल्या

हाताच्या काटकोनात असेल तर ते चुकीचं आहे .काही पुतळ्यांमध्ये तर ते बोट अर्धगोलाकार असत आणि तेही

चुकीचं आहे .असल्या मूर्ती बनविणाऱ्यां आणि बनविण्यास सांगणाऱ्या विरुद्ध कडक कारवाही करायला पाहिजे .


<img src="ambedkar-statue.jpeg"=dr.babasaheb ambedkar statues ambedkar-staue">


तर आपण पाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उजव्या हाताचे सरळ बोट काय दर्शविते .

जा आणि लिहून  घराच्या भिंतीवर कि तुम्हाला या देशाचं शासक व्हायचंय .

तुम्ही मंदिराकडे जाण्याऐवजी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांकडे जा.   

स्वतःला  स्वत:ची मदत करावी लागेल,दुसरा कोणी तुमच्या मदतीला येईल अशी अपेक्षा बाळगू नका . 

ब्राह्मणी कर्मकांडातून अर्थात गुलामगिरीतून तुम्ही स्वतः लाच मुक्त करून घ्या . 

योग्य दिशेने जा व नैतिकतेचा मार्ग निवडा आणि संपूर्ण मानवजातीच कल्याण होईल असं कार्य करा . 

जा आणि आपल्या मुलांना हि सांगा ते हि या देशाचे महान पुरुष बानू शकतात . 

जा आणि सन्मानाने आणि स्वकर्तृत्वच जीवन जागा . 

शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी शहराकडे जा . 

शिक्षणासाठी परदेशात जा 

जा आणि संपूर्ण जगात भाराताचा जय घोष होईल असं कार्य करा 

जा आणि सर्वाना सांगा त्यांचे मौलिक अधिकार . 

जा आणि पटवून सांगा लोकांना स्वातंत्य्र, न्याय, समता आणि बंधुत्व चे महत्व. 

जा आणि असं कार्य करा कि या देशालाही तुमच्या बद्दल अभिमान वाटला पाहिजे .

बंधुनो हे सांगायचं इतकंच कारण कि बर्याच आंबेडकरी अनुयायांना याबद्दल माहिती नाही किंवा त्यांना काही

समाजात नाही.कारण असं कुठे वाचलेलं नसत किंवा कोणी सांगितलेलं नसत .

या लेखाबद्दल तुमचं मत मांडा .