आज काल आपण कोणताजी न्यु पेपर हाती घेतला जिंव्हा कोणताही न्यु चॅनेल पाहिला तर त्यात नककी या गोष्टी
प्रामुख्याने दिसतात ; दलित अत्याचार ,दलित महिलेवर बलात्कार,दलितांना मारले,दलितांची घर जाळली
इत्यादि इत्यादि. ह्या बातम्या पाहून डोकं सुन्न होतच .पण यामागचं कारणही आपल्याला माहीत असत आणि ते
म्हणजे जातीवाद .एका समाजाने ( स्वयं घोषित उच्चं जातीवाले ) दुसर्या समाजाला ( मागासलेला ) यांच्यावर
अमानुष अत्याचार तसेच ब्राह्मणी कर्मकांडात अडकविण्याचा प्रयत्न .
आता मूळ प्रश्न असा कि हा "दलित" शब्द आला कुठून .जर का आपण भारतीय संविधान ( जे एका अस्पृश्य
व्यक्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले ) पाहिले तर यात तो शब्द आढळत नाही.बाबासाहेबानी सगळ्या
मागासवर्गीयांना कायद्यामार्फत एका विशिष्ट अशी नाव देऊन डिफाइन केलं आहे .त्यांनी इथल्या शूद्र म्हणून
हिणविल्या जाणार्या समाजाला other backward claa,schedule caste ,schedule tribes, नावे देऊन संविधानात
त्यांना विशेष अधिकारही देऊ केले. मग "दलित" हा शब्द आला कुठून ?
जे एन यु चे प्रोफेसर विवेक कुमार ( विवेक कुमार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि ग्रंथ चिनी
भाषेत अनुवादित करत आहेत ) यांच्या म्हणायानुसार"दलित" हा शब्द १८३१ च्या मोल्स्वर्थ डिक्शनरी यात
आढळतो . तर काहींच्या मते १९२१ ते १९२६ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी "दलित" ह्या शब्दाचा उपयोग केला
होता आणि एक मोठा जनसमुदाय तयार करून त्यांच्या न्यायासाठ हक्कासाठी ते प्रयत्न करत होते.पुढे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित हा शब्द टाळून "Depressed Class-डिप्रेस कलास" हा शब्द वापरून
कित्येक आंदोलन केली.
बंदी घातली होती .पण सर्व क्षेत्रात बामणी पिल्लावळ असल्याने या मागासलेल्या जातींवर काही भाष्य करायचं
तर हा कॉमन शब्द योग्य वाटत असे आणि मुख्य कारण हे कि दलित नाव घेतल्याने त्या व्यक्तीची खरोखरची
जात हि सांगण्याची गरज पडत नाही.त्याचा फायदा इथल्या खुर्चीला बसल्याल्या राजकर्त्यांना होतो. मागील काही
महिन्यापूर्वी नागपूर न्यायालयाने देखील दलित शब्दावर बंदी घातली आहे .परंतु त्याकडे सर्व दुर्लक्ष करीत आहेत .
इतिहासात अजून डोकावलं तर एक सत्य दिसत ते मुंबई मध्ये १९७२ला नामदेव ढसाळ ,राजा ढाले आणि अरुण
कांबळे अश्या दिग्गजानी एक आंदोलनकारी संघटना उभी केली ती म्हणजे " दलित पॅन्थर " ने .हा हा म्हणता
दलित पॅन्थरच जाळ संपूर्ण देशात पसरलं आणि मनुवाद्यांचे ठोके उलटे वाजू लागले . याचा अर्थ या संघटनेनेच "
दलित " या शब्दाचा एक "ब्रँड " तयार केला.
पुढे जेव्हा मान्यवर कांशीरामजी उत्तर प्रदेश मध्ये आंबेडकरी चळवळ घेऊन गेले तेव्हा तिथेही त्यांनी दलित या
शब्दाचा सहारा घेऊन DS4-म्हणजेच दलित शोषित समाज संघर्ष समिति स्थापित केली आणि सर्व
बहुजनांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला .कांशीरामजी ने नारा दिला " सिर्फ ब्राह्मण बनिया छोड़ बाकी
सब DS4 है ". आणि या नार्यान संपूर्ण उत्तर प्रदेश ढवळून काढलं आणि एक बहुजन युगाची सुरुवात त्यांनी केली .
काहींच्या मते दलित हा शब्द संबोधण्यात कारण कि त्या लोकांचं जीवन जगण्याची पद्दत जी एकदम दरिद्री आहे
घाणेरडी आहे .त्यांचं राहणीमान एकदम गलिच्छ आहे .अश्या लोकांना दलित हा शब्द वापरण्यात आला आहे
यावरून असे दिसते कि दलित हा आता नुसता शब्द नसून एक ब्रँड आहे .हा ब्रँड तयार करण्याचं काम
महाराष्ट्रातील मुंबई मध्येच १९७२लाच झालं होत . आता या दलित शब्दाला रोखणं कठीण आहे पण त्यावर
उपाय म्हणजे बहुजनांची सत्ता आणून दलित या शब्दावर कायमची कायद्याने संपूर्ण देशभर बंदी घालणे .
आवडल्यास आपली प्रतीकरिता द्या