महाराष्ट्रातल्या चर्मकारांनो अजून किती अन्याय-अत्याचारांची वाट पहायची ? उत्तर प्रदेशात दलितांवर म्हणजे
दुसरे तिसरे कुणी नसून आपल्या चर्मकारांवरच अन्याय-अत्याचारांची मालिकाच सुरु झाली आहे ! सनातनी
मनुवादी भाजपने आता आपली असली औकात दाखवायला सुरुवात केली आहे. मोदी मोदी म्हणून उड्या मारुन
या भगव्या भूतांना आपल्या मानगुटीवर बसवून घेण्याचे पाप आपणच केले, त्याचे प्रायश्चित आता आपणालाच
करावे लागणार आहे !
या भगव्या शैतांनांच्या विरोधात उत्तर प्रदेशात "भीम आर्मी" लढत आहे, भीम आर्मीचा "चंद्रशेखर" हा युवा
चर्मकार नेता भगव्या जातीयवादाच्या विरोधात एकाकी झुंज देत आहे. समतेची ही लढाई कोणासाठी आहे ?
जरा विचार करा ! ज्या गुरु रविदासांना तुम्ही मानता त्यांच्या स्मारकापासून ही लढाई सुरु झाली आहे, हे एकदाचे
नीट लक्षात घ्या !!
केला. ब्राह्मणवादाचे वाहक असलेल्या ठाकुरांचा हा विरोध तेथील स्वाभीमानी चर्मकारांनी हाणून पाडला. गावात
"द ग्रेट ठाकूर" असा एकच बोर्ड होता. ठाकुरांनी गुरु रविदास मुर्तीला विरोध केल्या नंतर दुखावलेल्या
चर्मकारांनी आम्हीही "ग्रेट" आहोत हे दाखऊन देण्यासाठी गावात दुसरा बोर्ड लावला...."द ग्रेट चमार्स !"
या बोर्डमुळे जातीयवादी ठाकुरांचा अहंकार दुखावला, चर्मकारांचे ग्रेट असणे त्यांना सहन झाले नाही. या
सनातनी समाज व्यवस्थेत केवळ आपणच ग्रेट आहोत, चर्मकार म्हणजे नीच, हलक्या जातीचे, आमचे जोडे
बनविणारे "ग्रेट" कसे असू शकतील ? जातीयवादी ठाकुरांना चर्मकारांचे हे अस्तित्व सहन झाले नाही, त्यांनी "द
ग्रेट चमार्स !" या बोर्डला काळे फासले. चर्मकार वस्तीवर हल्ला केला, चर्मकार स्त्री - पुरुषांना गंभीर जखमी
केले. गुरु रविदास प्रतिमेची विटम्बना केली. युवा नेते चंद्रशेखर यांना हे समजल्या बरोबर त्यांची "भीम आर्मी"
गावात सशस्त्र दाखल झाली आणि जशास तसे या न्यायाने ठाकुरांना धुवून काढले !
यात भीम आर्मीचे काय चुकले ? हल्ला झाल्यावर चर्मकारांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली परंतु भाजपच्या
सनातनी राजवटीतील जात्यंध पोलिस फिर्याद घेत नसतील तर दलित चर्मकारांनी न्याय कुणाकडे मागायचा ?
अश्या परीस्थितीत भीम आर्मीने जश्यास तसे या न्यायाने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला तर एवढी
ओरड का व्हावी ? यासाठी भीम आर्मीला देशद्रोही का ठरविण्यात येत आहे ?
मुख्यमंत्री आदित्य नाथ योगी यांनी आपल्या भाषेत उत्तर देण्याची धमकी मुसलमानांना निवडणूक काळात दिली
होती (पहा "आपकी अदालत") आता चंद्रशेखर त्याच्या भाषेत उत्तर देत आहे तर त्याला देशद्रोही ठरविण्याचा
अधिकार भाजप सरकारला कुणी दिला ? पोलिसांनी चंद्रशेखर याच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला आहे.
भीम आर्मीवर बंदी घालण्याची भाषा बोलली जात आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अभ्राविप, दुर्गा वाहिनी
आदींनी कितीही धुडगूस घातला तरी तो चालतो आणि भीम आर्मीने दलितांना जरासा दिलासा देण्याचा प्रयत्न
केला तर देशद्रोहाचे प्रमाणपत्र बहाल केले जाते.
आणण्याचा प्रयत्न केला परंतु कांही लोकांच्या डोक्यात हे अजूनही शिरत नाही त्याला काय करणार ? एकीकडे हे
ठाकूर, भटके म्हणून आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि दुसरीकडे कट्टर मनुवाद जोपासत आहेत ! दलित व
चर्मकारांचा जातीय भावनेतून छळ करीत आहेत. परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष
करीत आहेत ! याच दुष्ट भावनेतून सहारनपुर येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याची विटंबणा करण्यात आली.
चर्मकारांनी बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नासधूस व तोडफोड ठाकुरांनी केली.
दलित व चर्मकारांना लक्ष्य करून बदडून काढले जात होते आणि यूपी पोलिस बघ्याची भूमिका वठवित होती.
"सबका साथ, सबका विकास" हा नारा किती खोकला आहे याचा प्रत्यय यावेळी येत होता. "सवर्णो का साथ और
दलितो का सर्वनाश" असा हा नारा आहे. याची खात्री होत होती. सहारनपुर अजून धुमसत आहे. तेथे योगी
राजच्या आडून सवर्णांचे गुंडा राज चालू आहे. पोलीस फक्त तमाशा बघत आहे. चौकशीचे नुसते नाटक केले
जात आहे. दलित नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. सरकारने १४४ कलम लागू केले आहे. मायावती
यांना सहारनपुरच्या सीमेबाहेर रोखण्यात आले आहे.
या मुस्कटदाबीच्या विरोधात भीम आर्मीने गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व विचार
घेऊन दिल्लीच्या जंतर मंतरवर जातीयवादी ठाकुरांच्या विरोधात लढण्याची भीम गर्जना केली. या लढ्यात
देशभरातील दलित सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ऐतखाऊ आणि सनातनी चर्मकार प्रतिनिधी मात्र फक्त
निवेदन देण्याचे नाटक करीत आहेत. सेना - भाजपाचे दलाल असलेले चर्मकार नेते मात्र झोपेचे सोंग घेऊन
सहारनपूर प्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत. चर्मकार समाजाचे महाराष्ट्रात सोळा आमदार निवडून आले
आहेत परंतु सहारनपूर प्रकरणी त्यांना कोब्रा डसला कि काय ? सारे कसे एकदाच कोमात गेलेत कि काय असे
वाटत आहे.
आहेत. युपीत दलितांनी व चर्मकारांनी भिम आर्मीच्या रुपाने कात टाकून सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न
चालू केला आहे. तेंव्हा महाराष्ट्रातल्या मांग - चर्मकारांचे काय ? असे जाहिर सवाल विचारले जात आहेत.
बौध्दांनंतर संख्येत मांग - चर्मकार हेच जास्त आहेत. एस. सी. म्हणून सवलतींचा उपभोग घ्यायचा व
बाबासाहेबांचे नांव घ्यायलाही कचरायचं. हिंदु धर्मातील नाकारलेले हे अस्पृष्य आजही हिंदु मानसिकतेतच जगत
आहेत. वैदीक कर्मकांडाच्या प्रत्येक बाबी पार जन्मापासून तर मरणापर्यंत यांचे ब्राम्हणाशिवाय भागत नाही.
बाबासाहेबांचा फोटो यांच्या घरात दिसणार नाही. जयभिम तर मग दूरच राहिला असे टोमणे मारले जात आहेत.
आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील ५८ जाती सर्वात पुढे असतात मात्र व्यवस्था
बदलाच्या वेळेस गंधबुक्का लाऊन हे हिंदू मानसिकतेतले मानसिक गुलाम सर्वात मागे राहतात नव्हे तर
दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नाहित असा आरोप करण्यात येतो. त्यात तथ्य नाही असे म्हणता येत नाही ! किमान
चर्मकारांचे हे सोळा आणि मातंग समाजाचे तीन आमदार तरी पुढे असायला पाहिजे होते परंतु ते सेना -
भाजपाच्या तिकिटावर निवडून आले असल्याने तोंडाला कुलूप लावून उघड्या डोळ्यांनी सारे अन्याय - अत्त्याचार
पाहत असतात तेंव्हा पुणे करारातून आलेले हे राजकीय आरक्षण बंद होऊनच जाऊ द्या अशी भूमिका कांही
बौद्ध बांधव घेत आहेत.
बौध्दांकडे शैक्षणिक योग्यता आहे, त्या बळावर ते सारे कांही निभाऊन नेतील पण चर्मकारांचे व मातंगांचे काय ?
बुरुड, भंगी, व्हलर, खाटकाचे काय ? हे स्वतःला हिंदू समजतात. उत्तर प्रदेशात गायीच्या नावाने पहिली लढाई
मुसलमान विरुद्ध हिंदू अशी झाली. आता दुसरी लढाई दलित विरुद्ध हिंदू अशी लढली जात आहे. तिसरी लढाई
संविधान विरुद्ध सारे हिंदू अशी लढली जाईल. त्यावेळी मुसलमानांना देखील हिंदूंच्या सोबत उभे केले जाईल.
त्यासाठीच तर तीन तलाकची नौटंकी खेळली जात आहे.
संविधान संपले कि आरक्षण संपविण्यात येणार आहे. मग काय तर हिंदू राष्ट्र आणि राम राज्य. संविधान ऐवजी
मनू स्मृतीचा अंमल सुरु होईल. नंतर रस्त्यावर येऊन काय उपयोग होणार नाही ! मातंगांनी व चर्मकारांनी
स्वत:चा सामाजिक बेस काय आहे ते तरी नीट जाणून घ्यावे. उत्तर प्रदेशातल्या चर्मकारांप्रमाणे तुमची स्फुल्लींगे
पेटवा. आता तरी जागे व्हा. रस्त्यावर उतरा. भीम आर्मी आणि बहन मायावतीला सपोर्ट करा. गुरु रविदास आणि
बाबासाहेब यांचे महत्व समजून घ्या. आम्हाला गुलाम समजून तुच्छ वागणूक देणाऱ्या हिंदू मानसिकतेचा त्याग
करा. तथागताच्या सम्यक मार्गाचा अवलंब करा !
लेखक :अनिता चंद्रप्रकाश देगलूरकर,
अध्यक्षा, महिला समता परिषद,
भगीरथ नगर, नांदेड - ४३१ ६०५ .