बरं झाले सावित्रीमाई फुलेने तुमच्या हाती लेखणी पाटी देऊन तुम्हास निरक्षरतेच्या खाईतून काढून
साक्षर केले. पण तुमच्या डोक्यात उजेड पडायला ७ जन्म घ्यावे लागतील कदाचित...
आज हि वडाला दोरा गुंडाळून सात जन्मी तोच पती मिळावा म्हणून यांची अर्चना सुरूच आहे. जर एखाद्या
नवविवाहितेने सुरुवातीच्या एक-दोन वर्षात वटपौर्णिमेला वडाची पूजा करून सात जन्मी हाच पती मिळावा
म्हणून अर्चना केली आणि तीन-चार वर्षानंतर जर त्याने तिला हुंड्यासाठी छळले आणि जाळले तर सात जन्मी
त्याच्या हातून असेच अकाली जाळून घेणार का ???
वडाला दोरा गुंडाळूनही जर घटस्फोट होत असतील तर सात जन्म घटस्फोट घेण्याची तयारी आहे का ??? दारू
पिऊन रोज मारहाण करणाऱ्या नवऱ्याची बायको देखील कसा काय सात जन्मी तोच नवरा मांगते ??? अनेक वर्ष
न नांद्णारी बायको माहेरी वटसावित्रीची पूजा करावयास का जाते ??? इथे एका जन्मात दोन-तीन बायका व
तीन-चार नवरे करणार्याची काही कमी नाही...
हिंदू धर्मातील स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे व सातही जन्मात हाच पती मिळावा, म्हणून वटपौर्णिमेच्या
दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळतात,पण मला आश्चर्य वाटते की मुस्लीम , ईसाई, बौद्ध धम्मातील स्त्रिया
आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून कुठल्याही प्रकारचे व्रत किंवा विधी करीत नाही मग त्या स्त्रियांचे पतीचे
आयुष्य कमी होते का, किंवा ते लवकर मरतात का ???
गरज काय ??? असेच समजायचे ना कि मागच्या जन्मात वटपौर्णिमा केली म्हणून हा आपला मागच्या जन्माचा
पती आहे असे गृहीत धरून पंचांग वा कुंडली ना बघताच विवाह का करत नाही? उगाच या भोंदू कडे जाण्याची
काय गरज ???
खेड्यापाड्यात घरा जवळ एखादे वडाचे झाड मिळते पण शहरी भागात लवकर वडाचे झाड बघायला सुद्धा
मिळत नाही, मग अश्यावेळी माझ्या शिकून अडाण्यासारखे वागणाऱ्या भगिनी कोसो दूर अनवाणी पायाने सुत
बांधायला जातात, मी असा ऐकलंय कि या स्त्रियांनी मग दिवसभर उपाशी राहून रात्री उपवास सोडायचा असतो.
अंधश्रधेचा पण कळस झाला...
सांगा ना तुमच्या नवरोबाला एक दिवस हीच बायको सात जन्म मिळण्यासाठी उपवास करायला करेल का
नवरोबा उपवास??