गेल्या पंधरा वीस दिवसापासून महाराष्ट्रात तसेच खासकरून मुंबई च्या प्रत्येक रस्त्यावर दिसणार्या भीम आर्मी
च्या पोस्टर वर सर्वांची नजर होती .आता उत्तर प्रदेशातील सहारांपूर मधून मोठा रस्ता पार करत भीम आर्मी
महाराष्ट्रात येणार म्हणून सर्वांची उत्सुकता वाढली होती .तरुणाई मध्ये एक नवा जोश भरला होता .दिवस आणि
तारीख ठरली होती १८ जुन २०१७ रोजी दुपारी दोन वाजता .याचा धसका पण सर्वानी घेतला यात सध्याचे हाजी
राजकारणी आणि माजी राजकारणी .कारण भीम आर्मी च रूप सर्वानी २१ मे ला जं
तर मंतर वर जमलेल्या लाखो युवक भीम सैनिकांना पाहिले होत .
शेवटी ती उत्कंठा आज सत्यात होत होती चैत्यभूमीवर.
आज दिनांक १८ जुने २०१७ रोजी दुपारी तीन वाजता चैत्यभूमी (दादर,मुंबई) भीम आर्मीची स्थापना करण्यात
आली.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून नव-युवक आणि काही प्रमाणात महिलाही उपस्तिथ झाले होते.
महाराष्ट्रातुन यवतमाळ ,नागपूर,नाशिक,लातूर,परभणी,वाशीम,रायगड,मुंबई,इ .ठिकाणाहून तरुण भीम सैनिक
तसेच काही महिलांनीही सहभाग दर्शविला .सभेला सुरुवात दुपारी ठरल्या वेळेनुसार दोन वाजता झाली .आणि
सर्वांच्या अनुमताने महाराष्ट्राचे भीम आर्मीचे अध्यक्ष पद आयु .सुभाष कांबळे , तर मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणून
वकिली पेशातील रत्नाकरजीना देण्यात आले . त्याआगोदर सर्व उपस्तिथ भीम सैनिकानी डॉ बाबासाहेब
आंबेडकर ,छ शिवाजी महाराज,छ शाहू महाराज ,मा. कांशीरामजी , संत रोहिदास ,सम्राट अशोक ,गौतम बुद्ध
आणि इतर बहुजन नायाकांच्या घोशषणा देण्यात आल्या .सर्व भीम सैनिकानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
चैत्यभूमीवर बुद्ध वंदना घेतली.आणि मग अशोक स्तंभाच्या येथे सभेला पुन्हा सुरुवात झाली .या सभेत मध्य
प्रदेश मधून आयु दत्त मेढे आणि भीमआर्मी चे प्रचारक आयु राकेश यादव हि उपस्तिथ होते.
आयु सुभाष कांबळे कांबळे यांनी अध्यक्षयी भाषणात म्हणाले कि काही कारणामुळे याठिकाणी आजच्या सभेला
स्टेज बांधण्यास मनाई करण्यात आली असल्यामुळे आज आपण इथे अशोकस्तंभाजवळ उन्हात सभा घेत
आहोत .तसेच त्यांनी भीम आर्मीच्या प्रसिद्धीसाठी काही वृत्तपत्रात जाहिराती दिलेल्या होत्या आणि आता इथल्या
व्यवस्थेने त्या वृत्तपत्रकांवर भीम आर्मी ची बातमी छापल्यामुळे कारवाई होणार आहे.तर आम्ही अश्या जातीवादी
सरकारचा निषेध करतो असं ठणकावून सांगितलं .तसेच मुंबई विभागाचे भीम आर्मी चे अध्यक्ष रत्नाकराजी
म्हणाले कि भीम आर्मी आता अन्याय अत्याचार याचा प्रतिकार करेल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा वकिलांची
फौज आपण उभी करू शकतो अशी ग्वाहि ही त्यांनी दिली . याप्रसंगी बर्याच मान्यवरांनी आणि इतर युवकांनी
आपले मत मांडले .
पुढील कार्यक्रम चैत्यभूमीच्या जवळ असलेल्या गार्डेन मध्ये पार पाडला
भीम आर्मी सभासद नोंदणीही करण्यात आली .प्रत्येक जिल्ह्यातून सहायक म्हणून निवडण्यात आले आणि
प्रतत्येकाला नेमणुकीची पत्रके देण्यात आली .
संध्याकाळी साडे सहा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली .
भीम आर्मी कडून सर्वांच्या लाखो करोडो अपेक्षा आहेत आणि भीम आर्मी त्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच
यशस्वी होईल यात काही शंका नाही .
भीम आर्मीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !