सत्यपाल महाराज हल्ला सत्यपाल महाराज हल्ला - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, May 17, 2017

सत्यपाल महाराज हल्ला

आकोट (जि. अकोला) : सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज चिंंचोळकर यांच्यावर शुक्रवारी मुंबईत

प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात सत्यपाल महाराज गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबईत

<img src="satyapal-maharaj-attack.jpeg"=phule shahu ambedkar satyapal-maharaj-halla-2017>

उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अंधश्रद्वा,

व्यसनमुक्ती आणि अनिष्ठ रुढी परंपरांविरुद्ध सत्यपाल महाराज आपल्या पुरोगामी विचारसरणीतून

प्रहार करतात. महाराष्ट्रातील एक अग्रणी प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे. बुद्ध जयंतीनिमित्त

मुंबईतील नायगाव दादर येथे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर

अनेकांनी महाराजांसोबत छायाचित्र काढले. या गर्दीत तोंडाला बांधून एक युवक महाराजांजवळ पोहोचला

आणि त्याने महाराजांच्या खांद्यावर हात ठेवण्याचे नाटक करुन चाकूने पोटावर वार केले.सत्यपाल

महाराजांनी लगेच स्वत:ला सावरुन हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला, यावेळी हल्लेखोर पळून जाण्याच्या

तयारीत असताना उपस्थित नागरिकांनी त्याला पकडले.जखमी सत्यपाल महाराजांना लगेचच केईएम

रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सत्यपाल विश्वनाथ चिंंचोळकर महाराज यांनी

भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, आरोपी किशोर जाधव याच्याविरुद्ध भादंवि ३२४

कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

हल्ल्यामागचा उद्देश काय?सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला करणारा कुणाल किशोर जाधव हा नवी

मुंबईतील खारघर येथील  रहिवासी आहे. कुणालने महाराजांवर हल्ला का केला, याची पोलीस कसून चौकशी

करत असून, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीचा असून, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या 

विचारांचा प्रचार प्रसार राज्यभर करतो. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याकरिता समाज प्रबोधन करतो. 

अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी 

माझ्यावरही हल्ला झाला, या हल्ल्याने आपण विचलीत झालो नसून, शेवटच्या श्वासापर्यंत आपण महाराष्ट्रात 

प्रबोधन करुन समाजात जनजागृती करणार.- सत्यपाल महाराज, सप्त खंजिरीवादक