२७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा
ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने
कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास
सुरवात केली.एका खालच्या जातीच्या व्यक्तीचे नाव एका विद्यापीठाला द्यायचे या कल्पनेनेच जातिवाद्यांना
मनोमन छळू लागले आंबेडकरी सामाज्या विरोधी भडकविण्याचं काम त्यात प्रामुख्याने शिवसेना प्रमुख बाळ
ठाकरे आणि राज ठाकरे नी केलं आणि त्यांच्या मनू विचारांच्या संकल्पनेवर त्यांच्या अनुयायांनी हातात शस्त्र
उठवून आंबेडकरी समाजाची वाईट परिस्तिथी केली .
परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांच "वार' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते
मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सुर्यास्त्र. डोक्याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी
दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती
ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लाँगमार्च.' काढला गेला.जो जगातील सर्वात मोठा तिसरा लॉग मार्च होता
या लाँगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, अरुण कांबळे,जगदीश थुल,
थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दयानंद म्हस्के,दिलीप
पाटील,रामदास आठवले, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम इ. यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते
लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला
होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे
भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला
आहे..
हे वाचा : मी डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलतोय
मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देणे यात काहीच गैर नव्हते. पण जातिवाद्यानी याचा पुरेपूर फायदा घेतला
होता.
पुढे आंबेडकरी नेते आणि समाज यांच्या अथक प्रयत्नांतून पण आंबेडकरी समाजाच्या प्रचंड नुकसानीतून तब्बल
१६ वर्षांच्या अथक लढाईतून विद्यापीठाचे नामांतर झाले.नामांतर झाले पेक्षा खर तर नामविस्तार झाला.
मराठवाडा हे नाव कायम ठेऊन त्याचे " डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ " असा
नामविस्तार करण्यात आला.
जरी या लढ्यातून नवे नेते मिळाले पण गमावलेही खूप काही होते ...
मराठवाड्यातील ३५० घरांवर हल्ले झाले. ३४०० कुटुंबाची धूळधाण झाली, २१०० घरे बेचिराख झाली, ९२५
स्त्रियांवर बलात्कार झाले, २४० आंबेडकरी लोक जीवानिशी मारले गेले.
या लढ्यामुळे आंबेडकरी समाज जागृत आहे याची प्रचिति सर्वाना कळाली होती आणि पुढे त्याचे परिणाम हि
मनुवाद्याना कळून चुकले होते .त्यामुळे हि एकजुटता काही वर्ष टिकून नंतर अनेक गटा - तटात विभागले गेली .
तरीही त्यांनी केलेल्या अभूतपूर्व अश्या कार्याला विसरता कामा नये .
नागपूरमध्ये (कामठी ) नामविस्तार दरम्यान शहीद झालेल्या आंबेडकरी समाजाच्या स्मरणार्थ स्मारक उभारलं
आहे शाहिद झालेल्यांची नावे आहेत : सुहासिनी बनसोड ,गोविंद भुरेवार ,भालचंद्र बोरकर,रोशन बोरकर
,अविनाश डोंगरे,नारायण गायकवाड ,शब्बीर अली काजल हुसैन ,चंदर कांबळे ,पोचिराम कांबळे ,डोमाजी
कुत्तरमारे ,जनार्दन मवाळे,जनार्दन मस्के,रतन मेंढे ,कैलास पंडित,रतन परदेशी,दिलीप रामटेके,ज्ञानेश्वर साखरे
,अब्दुल सत्तार ,प्रतिभा तायडे ,दिवाकर थोरात ,गौतम वाघमारे ,मनोज वाघमारे ,शीला वाघमारे.
नामविस्तार या आंदोलनात सक्रीय सहभाग घेणाऱे समस्त आंबेडकरी बांधव व शहीद झालेल्या सर्व बहाद्दर
भीमसैनिकांना मानाचा जय भीम ...
भीमसैनिकांना मानाचा जय भीम ...
हे वाचा : ब्राह्मणांझेशन म्हणजे काय ?
आज नामविस्ताराला २३ वर्ष पूर्ण होत आहेत .
" डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद " २6व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या तमाम
आंबेडकरी आणि वैचारिक सामाज्याला मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा !
आंबेडकरी आणि वैचारिक सामाज्याला मन: पूर्वक हार्दिक शुभेच्छा !