सकारात्मक विचारांचे सामर्थ्य सकारात्मक विचारांचे सामर्थ्य - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, January 23, 2017

सकारात्मक विचारांचे सामर्थ्य

आयुष्यभर आपण कसला ना कसला तरी विचार करीत असतो . आणि त्यामुळेच आपल्या मनात दररोज

सतराशे साठ विचार येतात. यातील सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ६० ते ७० %  विचार हे नकारात्मक

असतात. दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.

एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत

त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून

नैराश्याकडे वाटचाल सुरू होते.रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते.

म्हणून नकारात्मक विचारांना तत्काळ सकारात्मक करणे गरजेचे असते.

सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक

करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा

प्रसंग’’!

एक उदाहरण घेऊ ;

थॉमस् अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले.  हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला

ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस ९९९ प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?

थॉमस म्हणाला ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका. ९९९ वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू

शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन) 

आणखीन एक ,जेव्हा नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून

छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली.  तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा

झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब

हेरली. तो उठताना छातीत झटकत ओरडू लागेल  ‘सैनिकानो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण

जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे,

मी तुझी आहे....त्याचा परिणाम असा झाला कि सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी

खेचून आणली.  हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.

यावर समजते कि सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला

गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी

कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.

आता आपण भारतातील एक उदाहरण घेउ ते म्हणजे माजी राष्ट्रपती  डॉ अब्दुल कलाम यांचं .त्यांना नौदलात

भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक

असते.

म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

sakaratmak vichar

एक ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज. याना तरी काय गरज होती स्वराज्य स्थापन करन्याची

कारण नोघलांच्या अधिपत्याखाली त्याना काही जास्त त्रास होनार नव्हता .पन त्यानी याविरुद्ध लढून स्वराज्य

स्थापन केल .

त्यापलीकडेहि एक असं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ते सर्वाना अचंबित करणारे तर आहेच पण काहींची

त्यांच्या प्रेरणेमुळे जगण्याची नवी दिशा सापडून गेली तर ते आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर .ज्याना वर्गात बसू

देत नव्हते आणि ते या देशाचे शिल्पकार झाले जर त्यांनी नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं असत तर .... काय

करणार आपण शिकून शेवटी आपल्याला उष्टी खरकटे खायायचीच आहेत आणि जनावरांपेक्षा वाईट जीवन

जगायचं आहे  एवढे जीवाचं रान ,पण नाही त्यांनी सकारात्मक द्रिष्टीकोण ठेवला . 

वरील उदाहरणात आपण पाहिले शिवाजी महाराज ( ज्यांच्याकडे राजेशाही किंवा  कदाचित त्यामुळेच ते

स्वराज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले .दुसरं उदाहरण डॉ .अब्दुल कलाम ( ज्यांनी शिक्षणाचं महत्व हा घटनेनं

दिलेले अधिकार आहे त्यामुळेच ते उच्चं पदी पोहचु शकले .पण डॉ .बाबासाहेब आंबेडकरांकडे तर काहीच

नव्हते ना वाचनदारी ना पैसा ना त्यांच्या समाजाचा आवाज आणि बराच काही .पण यातूनही त्यांनी मार्ग काढीत

ते अश्या ठिकाणी विराजमान झाले कि त्याठिकाणी जगातील विद्वानांनांची फौज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर

हे गेल्या ५०० वर्षातील नंबर १ हुशार बुद्धिमान व्यक्ती होय 

म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा . एक छोट काव्य

कोण म्हणतं जीवनात 

प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत

अरे डोळे उघडून बघा

प्रत्येकाला उडण्यासाठी

फुलपाखरासारखे पंख आहेत...