ब्राह्मणायझेशन् म्हणजे काय ? | what is brahminism ? ब्राह्मणायझेशन् म्हणजे काय ? | what is brahminism ? - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 27, 2016

ब्राह्मणायझेशन् म्हणजे काय ? | what is brahminism ?


ब्राह्मणायझेशन्' म्हणजे काय ? हे समजणे खुप गरजेचे व अतिआवश्यक बनलेले आहे.

जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपण "डीब्राह्मणायझेशन " करू शकत नाही.

ब्राह्मणायझेशन म्हणजे नेमके काय हे थोडे विस्ताराने सांगणे गरजेचे आहे.
<img src="brahmanism-means-what.jpg" alt="what is meaning of brahmanism"/>


ब्राह्मणायझेशन म्हणजे ब्राह्मण अनुकूल विचार करणे.


ज्या वेळी आपल्या महापुरूषांनी प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेशी संघर्ष केला तो संघर्ष आपणाला कळू नये

म्हणून त्यांच्या संघर्षगाथेला त्यांच्या क्रांतीकारी विचारांना ब्राह्मण अनुकूल बनविणे म्हणजे ब्राह्मणायझेशन.

महापुरूषांचे क्रांतीकारी विचार लपवून त्यामध्ये मिलावट करून ते विचार विकृत स्वरुपात तुमच्याच समोर

सादर करणे म्हणजे ब्राह्मणायझेशन.आता काही उदाहरणच घेवू.

१.लिंगायत धर्म संस्थापक : महात्मा बसवण्णा

हे नागवंशी आहेत. पण बसवण्णा ब्राह्मण होते हे सांगण हे ब्राह्मणायझेशन आहे.त्यांच्या शिल्पाशेजारी ब्राह्मण

गुरू उभा करणे हे ब्राह्मणायझेशन आहे. त्यांच्या वचनात ते स्वत म्हणतात मातंग मादार चेन्नयाचा पुत्र आहे

मी.

 आपली लोक जास्त खोल तर्कशील वाचन करीत नाहीत. कारण आम्हाला तर्कपूर्ण अभ्यास पद्धती

अभ्यासक्रमामध्ये शिकविलीच नाही. कारण अभ्यासक्रम नियंत्रण मंडळावर ब्राह्मणांचा कब्जा.आणि

कुठलाही कब्जा हा बेकायदेशीरच असतो.

संत शिरोमणी : गुरू रविदास 

हे उत्तर भारतातील क्रांतीकारी संत. त्यांच्याबद्दल सुद्धा असच.त्यांचे गुरू रामानंद नावाचे ब्राह्मण होते असा

प्रचार करणे म्हणजे ब्राह्मणायझेशन होय.त्यांच्या नावावर चमत्कारीत कथा प्रसारीत करणे म्हणजे

ब्राह्मणायझेशन.या देशामध्ये फार पूर्वीपासून ब्राह्मण विरूद्ध अब्राह्मण असा दोन विरुद्ध विचारधारेचा संघर्ष

आहे.यालाच आर्य-अनार्य, सुर-असुर, वैदिक-अवैदिक अशीसुद्धा नावे आहेत.

सध्या ब्राह्मण हिंदूच्या बुरख्याआड लपल्याने आपल्या लोकांना प्रत्यक्ष दिसत नाही.

आता हे बघा रविदासांचे समकालीन ब्राह्मण कवी तुलसीदास रामचरीतमानसमध्ये म्हणतात

पुजिए विप्र (विप्र म्हणजे ब्राह्मण) गुणग्यान शिलविहीणा,ना पुजिए शुद्र गुणग्यान शिलप्रविणा.

म्हणजेच ब्राह्मण कितीही गुणहीन असला तरी त्याचीच पुजा करावी पण शुद्र कितीही गुणवाण व शिलप्रवीण

असला तरी त्याची पुजा करायची नाही.

आता आपले महापुरूष संत रविदास तुलसीदासाला उत्तर देताना काय म्हणतात पहा,

"ब्राह्मण मत पुजिए जो होए गुणहीन,पुजही चरण चंडालके जो होए गुणप्रविण."

म्हणजे जो गुणवान आहे जरी तो चांडाळ असेल तरी त्याची पुजा करा. गुणहीन ब्राह्मणांची पुजा करू नका.

म्हणजे सांगण्याचा तात्पर्य हा की हा दोन विरूद्ध विचारधारांचा संघर्ष आहे.

वारकरी आंदोलन हे प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेवर वार करण्याचे आंदोलन होते.त्याला भक्ती आंदोलन म्हणणे

हे ब्राह्मणायझेशन आहे.

३.संत नामदेव 

हे खरे वारकरी आंदोलनाचे संस्थापक. त्यांनी प्रबोधनाकरीता किर्तनाचा आधार घेवून पंजाबमध्ये दौरे काढले.

नाचु किर्तनाचे रंगी,द्नानदिप लावू जगी  असा संदेश देणाऱ्या नामदेवांना पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी

अल्लाउद्दीन खिलजी या मुस्लीम शासकाने जागा दिली.

संत नामदेव, संत कबीर,संत रविदास यांच्या प्रबोधनामुळे पंजाबमध्ये गुरूनानक यांनी शीख धर्माची स्थापना

केली.शीखांचा धर्मग्रंथ"गुरू ग्रंथसाहेब " मध्ये वरील तिन्ही संताचे अभंग आहेत.अशा नामदेवांचे नावही न

घेता फक्त माऊली माऊली करणे हे *ब्राह्मणायझेशन*आहे.

४. "संत तुकाराम "

ज्यांनी वैकुंठ नाकारला त्यांचा खुन करून त्यांचे गुरू रामेश्वर भट व मंबाजी भट यांना दाखवणे व संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले असा प्रचार करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.

५.कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज

यांची गोब्राह्मण प्रतिपालक अशी प्रतिमा करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.

शिवाजी महाराज यांना भवानी मातेने तलवार दिल्याने महाराज पराक्रम करू शकले असे लिहीणे सांगणे हे

ब्राह्मणायझेशन तर आहेच पण त्यांचा पराक्रम झाकण्याचा प्रकार आहे.

कारण महाराजांनी तलवार बनवून घेतली होती याचे पुरावे समोर आलेत.

शिवचरित्र लिहीताना नकली शिवशाहीर जाणुनबुजून दादू कोंडदेव यांना महाराज व जिजाऊं सोबत दाखवणं हे
ब्राह्मणायझेशन आहे

६.छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व प्रथम समाधी शोधून सर्व प्रथम पुस्तक पोवाडा लिहीणारे व शिवजयंती

सुरू करणारे : राष्ट्रपिता जोतीराव फुले

यांना शिवशाहीर न म्हणता ब.मो.पुरंदरेला म्हणणे हे ब्राह्मणायझेशन आहे

७.इंग्रजांविरूद्ध पहिले बंड करून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करनारे आद्य क्रांतीकारक नरवीर उमाजी 

नाईक (खोमणे) यांचे शौर्य झाकून ठेऊन नाना फडणीस सारख्या बुळचट भटाला आद्य क्रांतिकारक संबोधने

म्हणजे ब्राह्मणायझेशन आहे.

८. आधुनिक भारतामध्ये सर्वात प्रथम महिलांच्या शिक्षणाकरीता संघर्ष करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

यांच्या पुजनाऐवजी अन्य ( अस्तित्वात नसणाऱ्या  ) कुणाचे पुजन करणे हे ब्राह्मणायझेशन आहे.

९. "तेली,तंबोळी,कुणबटांनी काय संसदेमध्ये जावून नांगर हाकायचा आहे काय ?", असे म्हणणाऱ्या बाळ 

केशव गंगाधर टिळकाला 'लोकमान्य' म्हणणे म्हणजे ब्राह्मणायझेशन आहे

१०. खरे स्वातंत्रवीर "क्रांतीसिंह नाना पाटील" यांचा ईतिहास झाकून ईंग्रजांना माफीनामे पाठवून तुरूंगातून

सुटून ईंग्रजांच्या पेंशनवर जगणाऱ्या 'माफीवीर' विनायक सावरकरला स्वातंत्रवीर म्हणणे हे

ब्राह्मणायझेशन आहे.त्यामुळे ब्राह्मणायझेशन ओळखा ब्राह्मणीकरण ओळखाम्हणजे *डीब्राह्मणायझेशन*करणे

सोपे जाईल.आणि 'डीब्राह्मणायझेशन' झाल्याशिवाय "व्यवस्था परिवर्तन" होणार नाही....
फक्त वाचू नका.....विचारही करा......

* जय भीम *  नमो बुध्दाय * जय भारत *