आंबेडकर म्हणजे.... आंबेडकर म्हणजे.... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 27, 2016

आंबेडकर म्हणजे....

<img src="who-is-ambedkar.jpg" alt="archirect of indian constitution dr b r ambedkar"/>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे .......


* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पददलितांना वाचा फोडणारे नीलकंठ मणी.....

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांना गुलामगिरीतून बाहेर काढणारे बुद्धिवंत योद्धे .......


* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म रूढींना मूठमाती देणारे विद्वान महामानव .....

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दीनांचे मनोधैर्य वाढविणारे प्रमुख पंडित.....

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पिढ्यानपिढ्या दलितांचे धर्म छळाचे उत्तर .......

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जाती जुलमाविरुद्ध उगारलेली वज्रमुठ .....

* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म-वर्ण वर्चस्वाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखे .......

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पंख छाटलेल्या पक्ष्यांना उड्डाणाचे बळ देणारे ....

* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीभेदावर सोडलेले अस्त्र ......

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वजनदार सत्ताधाऱ्याविरुद्ध पुकारलेले बंड....

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नव्या समाजाची रचना करणरे शिल्पकार ....

* डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महान चारित्र्याचा कळस .......

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ठिणगीला ज्वालामुखी करणारा विद्वत्तेचा फुंकर........

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे निष्ठावंत ध्येयवादी समाज सुधारक ....

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पार्लमेंटमधील कोहिनूर हिरा ......

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जन कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजणारे महापुरुष .........

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मनुस्मृती दहन करणारे हिंदू धर्माचे कर्दनकाळ .......

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हिंदू कोड बिलाला वाचा फोडणारे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते .......

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला गोड करणारे अमृत ........

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धम्माचे पुनर्जीवि दर्शन घडविणारे बोधिसत्व .......

* डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणजे चैत्यभूमी ठिकाणी महासागराला मागे हटविणारे दिव्य पुरुष ......


* जय भीम * जय भारत *  नमो बुद्धाय *