भारतीय सन्विधान निर्माता कोन | who is Father og Indiam Constitution भारतीय सन्विधान निर्माता कोन | who is Father og Indiam Constitution - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, December 26, 2016

भारतीय सन्विधान निर्माता कोन | who is Father og Indiam Constitution

<img src="father-of-indian-constitution.jpeg"=indian constitution-dr.ambedkar">



आज काल लोकांच्या मनात सम्भ्रम राजकारनी मंडळी  करित आहेत आनी त्यांच टार्गेट आहे बहुजनांचे

उद्धारक व घटनाकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर .

जे म्हणतात कि घटना काय एकट्या डाँ बाबासाहेब आंबेडकारांनी लिहली काय?

त्याच्यांसाठि हे उत्तर :-

भारताचे संविधान तयार करण्यासाठीजी मसुदा समिती नेमण्यात आली होती त्यात सात सदस्य होते घटनेचा

मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या लेखन समितीचे एक सभासद टी.टी. कृष्णाम्माचारी यांनी

घटना समितीत 5 नोव्हेँबर 1948 रोजी एकभाषण दिले त्यात ते म्हणतात ,

सभागृहाला कदाचित माहित असेल आपण घटना मसुदा समितिवर निवडलेल्या सात सदस्यापैकी एकाने

राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाहि एक सदस्य मृत्यु पावला त्याचीही जागा रिकामीच राहिली

एक सदस्य अमेरीकेस गेले त्यांचीही जागा तशीच राहिली चौथे सभासद संस्थानिकाच्या संबधित कामात

गुंतलेले राहिले.त्यामुळे ते सभासद असुनहि नसल्यासारखेच होते 

एक दोन सभासद दिल्लीपासुन खुप दुर राहत होते त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तेहि उपस्थित राहु शकत नव्हते 

शेवटी झाले असे कि घटना तयार करण्याचा सर्व भार एकट्या डाँ आंबेडकरांवर येऊन पडला अशा स्थितीत त्यांनी 

ज्या पद्धतीने ते कार्य पार पाडले त्याबद्दल ते निसंशय आदरास आणि सन्मानास पात्र आहेत अशा या अनंत 

अडचणीतुनही मार्ग काढुन त्यांनी हे महत्तम कार्य पार पाडले. त्याबद्दल आपण सदैव आपण त्यांचे ऋणी राहु म्हणुन 

घटनेच्या शिल्पकारांचा मान त्यांच्या एकट्याचाच आहे...