षडयंत्र ओळखा, सतर्क व्हा! समाजरक्षणासाठी सज्ज व्हा ! -- दिपक केदार षडयंत्र ओळखा, सतर्क व्हा! समाजरक्षणासाठी सज्ज व्हा ! -- दिपक केदार - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, December 30, 2022

षडयंत्र ओळखा, सतर्क व्हा! समाजरक्षणासाठी सज्ज व्हा ! -- दिपक केदार






<img src="shadayantra-olakha-satarka-vha-samajrakshanasathi-sajja.jpg" alt="bhima koregaon shaurya din 2023 be alert from rss"/>

 

१७ डिसेंबर २०१७ गोविंद गोपाळ महार समाधी पाडली आणि दंगलीच्या ठिणगीची दोन दिवसात आग झाली. यावर्षी तीच तारीख आणि कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेचं दंगलीला चिथावणी देणारं कृत्य. तेंव्हा हि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आजही गृहमंत्री तेच त्यामुळे संकटं ओळखा आणि सतर्क व्हा!

दंगली हीच भाजपची राजकीय सत्ता मिळवण्याची वाट आहे. संघ हि दंगलीची भुकेलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जातीय दंगली हे हत्यार संघाने मागील काही महिन्यांपासून काढलंय पण सतर्कता त्यांची डाळ शिजू देत नाही. चंद्रकांत पाटील शाई प्रकरणानंतर आक्रमक झालेले भाजप नेत्यांनी घरात घुसण्याची भाषा केली ती सुद्धा जातीय दंगलीसाठीच होती. तो कट संवैधानिक लढाईतून हाणून पाडला.  पुन्हा एकदा करणी सेना नामक एक दीड लोकांच्या संघटनेला पुढे करून भिमाकोरेगाव या अस्मितेच्या प्रतीकला टार्गेट करण्याचे षडयंत्र झालेलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान राज्यपाल कोशियारी यांनी केला. मराठा समाज आणि बौद्ध समाज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी एकत्र येऊन मोर्चे काढायला लागला आणि राज्यपाल चले जाओ चा नारा देऊ लागला. राज्यात बहुजन एकत्र आला, ज्यामुळे राष्ट्राइय स्वयंसेवक संघाची झोप उडाली. मराठा बौद्ध एकत्र आला तर जातीय तणाव कायमस्वरूपी नष्ट होईल अन हा तणाव नष्ट झाला तर सत्तेचा मलिदा खाता येणार नाही. यासाठी भिमाकोरेगाव विजयस्तंभ पडणाऱ्या मागणीचे निवेदन खुद्द आरएसएस चे भाजपचे सध्या गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूरच्या रेशीम बागेत जाऊन आल्यावर हा वाद सुरु झालाय, याचा अर्थ स्पष्ट आहे. सेंगरचा बोलवता धनी हा आरएसएस आहे. 


हे वाचा  - स्वतंत्र विदर्भाचं नामांतर "दीक्षाभूमीराष्ट्र"  पॅन्थर आंदोलन छेडणार


शेकडोच्या आसपास मोर्चे नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकले त्यात जवलंत मुद्दे होते, त्या एकही मोर्च्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नाही. मग अजय सेंगर सारख्या दंगलखोर प्रवृत्तीचे निवेदन कसे काय घेतले? त्यात भिमाकोरेगाव पाडा अशी मागणी असणारे निवेदन कसे काय घेतले? त्यांना उद्या कुणी रेशीम बाग पाडा अशी मागणी केलेले निवेदन ते घेतील का? सगळं सुनियोजित आहे गेल्यावर्षीचाच पॅटर्न आहे, स्क्रिप्ट सुद्धा २०१८ चीच आहे. आज फक्त बाहुली बदलेली आहे. 

महाविकास आघाडीचे नेते अचानक भयानक आक्रमक झालेत ते त्यांच्या काळात शेकडो दलित हत्याकांड होत होते तेंव्हा मूग गिळून गप्प बसले होते. आज मात्र पेटून उठलेत. मीडियाने हा तर राष्ट्रीय मुद्दाच केला. अडीच वर्षात दलित अत्याचारासाठी मी अनेक मोर्चे काढले मीडियाला अनेक घटना पोहोचवल्या त्या त्यांनी कधीही दाखवल्या नाहीत. आज मात्र दंगलीची पार्शवभूमी असणाऱ्या भिमाकोरेगाव ला पुन्हा पेटवण्यासाठी सेंगर आमने सामने अनेक कार्यक्रम धडाधड लावून मीडियाने सामाजिक कोरोना निर्माण केला. 

बौद्ध समाज राजकीय प्रगल्भ होतोय, सत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय, त्याला खोल घालण्यासाठी समाजाची एकजूट तोडण्यासाठी सर्वच प्रस्थापित एकवटलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने सुद्धा यात उडी घेतली. राज्यात त्यांच्या काळात दलितांवर अन्याय झाले तेंव्हा एकही नेता बोलला नाही. बौद्ध समाजावर नवा गाढव कसा लादता येईल याचा त्यांनी पुरेपूर खेळ मीडियाला हाताशी धरून सुरु केला आहे. 


हे वाचा - डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्वातंत्र्याची दृष्टी


ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांना जागरूक बौद्ध बांधवाना आवाहन आहे. एकजूट तोडू नका, भांबावून जाऊ नका, सयंम, सतर्कता बाळगा. राज्यात कुठेही कार्यकर्त्यांचे आयुष्य, समाजाचे नुकशान होईल असे कृत्य करू नका. खऱ्या युद्धात आपण कायमक विजयी झालेलो आहोत. पण फॅब्रिक युद्धात सातत्याने आपण फसत आलो आहोत. या फॅब्रिक युद्धात नवे नेते उभा करतील, आपल्या रकरंजीत युद्ध करतील, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं यात होरपळत ते आपल्या रक्तातून सत्तेचा गोळा तयार करतील. 

याद राखा, समाजाला सुरक्षित करण्याची मोठी जबाबदारी जागरूक काळजीवाहू सामाजिक संघटनांवर आली आहे. बारकाईने समाजाची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. सगळे जणू काही सगेसोयरे आहेत, जणू काही घरगुती संबंध असल्यासारखे वावरताना मधल्या काळात आपण सर्वानी बघितले आहेत. त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका, कोणत्याही नेत्यांचे लेकरं कधीच दंगलीत जखमी होत नाहीत कधी त्यांच्यावर केसेस अन ते जेलमध्ये जात नाहीत. सरकारशी हातमिळवणी करून क्रांत्या करण्याचे नपुष्क पेव सध्या फुटलेलं आहे. 

घाबरू नका.. आम्ही समाजरक्षणासाठी सतर्क - सज्ज आहोत, भिमाकोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करायला लाखोंच्या संख्येने या!

शांतता हीच आजची क्रांती आहे. दंगलीचे मनसुबे उधळून लावणे हाच आजचा विजय आहे. ते भिमाकोरेगाव स्तंभ पाडा म्हणतील आपण छत्रपती शिवाजी महाराज कि जय म्हणत राज्यपाल चले जाओ म्हणा, ते महामानवाने छेडतील आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हातात घ्या. ते पाडा फक्त म्हणतील आपण सुरक्षा मजबूत करण्याचे धोरण आकूया. 

राज्य सरकारने आरएसएस ने रचलेला दंगलीचा डाव उघड झालेला आहे. काही घडल्यास सर्वस्वी गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जबाबदार असतील हे जाहीर करतो. आताही वेळ गेलेली नाही त्यांनी तात्काळ सरकारची भूमिका जाहीर करावी त्यांची मूकसंमती आहे का असा प्रश्न निर्मण होत आहे. 

समाजरक्षणासाठी सज्ज व्हा! सतर्क व्हा!!

यावेळी येथून पुढे बहुजनांचा राजकीय बाली जाऊ देणार नाही. बहुजनांच्या रक्ताचा एक थेंबही सांडू देणार नार हिच भूमिका आणि हाच आपला अजेंडा आहे!!

- दिपक केदार 

राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना


#AllindiaPantherSena

#bhimakoregaon




No comments:

Post a Comment