स्वतंत्र विदर्भाचं नामांतर दीक्षाभूमीराष्ट्र करण्यासाठी पॅन्थर आंदोलन छेडणार - दीपक केदार स्वतंत्र विदर्भाचं नामांतर दीक्षाभूमीराष्ट्र करण्यासाठी पॅन्थर आंदोलन छेडणार - दीपक केदार - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, March 9, 2022

स्वतंत्र विदर्भाचं नामांतर दीक्षाभूमीराष्ट्र करण्यासाठी पॅन्थर आंदोलन छेडणार - दीपक केदार








संविधानविरोधक मनुवाद्याना "इशारा" संविधान वाचवण्यासाठी सज्ज होण्याचा "इशारा"  - दिपक केदार

चंद्रपूर येते ऑल इंडिया पँथर सेनेची इशारा परिषद संपन्न झाली. यावेळी बोलतांना संविधान धोक्यात आले आहे. मोहन भागवत हा देश हिंदु राष्ट्र असल्याचे बोलतात त्यांना आम्ही सांगतोय हा देश मानवतेचे संविधानराष्ट्र आहे. संविधान वादी समूहाने सज्ज व्हावे, 2024 ला संविधान धोक्यात येईल त्यासाठी मी इशारा परिषद घेऊन संघटित होऊन मनुवादी प्रवृत्तीला विरोध करण्याचे आव्हान करत आहे.

आम्ही लढतोय साथ द्या. इशारा नाव दिलं म्हणून यंत्रणा विचारत आहे कुणाला इशारा 

आज जागतिक महिला दिन आहे आम्ही कशा साजरा करायचा आम्ही कशा शुभेच्छा देईच्या, माझ्या या मेळाव्यात पीडित महिला बसलेल्या आहेत, भानामती करता तुमच्यामुळे आमच्या गावातील लोक मरत आहेत म्हणून बौध्द महिला कुटुंबांना गावात डांबून मारहाण करणाऱ्या महिला आहेत कोणत्या तोंडाने आम्ही शुभेच्छा देइच्या? पर्वा दुकानावर गेलेल्या दोन चिमुरड्या एकीचे वय 4 वर्ष दुसरीचे वय 6 वर्ष आहे, नराधमाने घरात कोंडून त्यांच्यावर पाशवी अत्याचार केला 10 झालं आरोपी अटक नाही कोणत्या तोंडाने आम्ही शुभेच्छा देईच्या, अनेक घटनांना मी भेटी दिल्या त्यात 2 वर्ष, 5 वर्ष, 9 वर्ष 16 वर्षांच्या दलित आदिवासी मुली आहेत आम्ही हा दिवस कशा साजरा करायचा. या सर्व पीडितांचा आवाज कुणीच नाही या जिजाऊ, सावित्री, रमाईच्या लेकी आहेत त्या महिला नाहीत का हा माझा प्रश्न आहे?



आज देश एका घटनेवर मूग गिळून गप्प आहे. पायल तडवी आदिवासी डॉक्टर तिला हिणवलं तू आरक्षणाच्या बळावर येते आलीस तिने सुसाईड केलं. आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर एमडी असलेली चित्रा रामकृष्णन ही एका भोंदू बाबा च्या सांगण्यावरून पद सांभाळत होती. कुणाला घेईच, काय निर्णय घेईचे, शेअर मार्केटची स्तीथी हे सगळ त्या अदृश्य हिमालयातील भोंदू बाबाच्या सांगण्यावरून सुरू होत. त्याचा ईमेल मिळतो पण तो मात्र अदृश्य असतो. प्रकरण दडपला जाऊ लागलंय. आमचा प्रश्न चित्रा रामकृष्णन ब्राह्मणवादी होती ती कर्मठ धार्मिक होती. असे निरक्षर अज्ञानी लोक देशाच्या उच्च पदावर बसलेले आहेत आणि तुम्ही आरक्षणवादी पायल तडविला हिनवून मारलं. ज्याला बुद्धिजीवी म्हटल जायचे ते तर भोंदुजिवी निघाले. यावरून देश बोध घेणार आहे की नाही? उच्च पदावरून हे कर्मठ लोक बाजूला करनार आहेत की नाही? आरक्षणवादि हेच बुद्धिजीवी आहेत हे सिद्ध होते.







निर्भिड म्हणजे पँथर. आम्ही या रक्तबंबाळ झालेल्या समूहाचा आवाज होत आहोत. आम्हाला जेल्मधे टाकण्याचे कटकारस्थान रोज सुरू असते. माझी भीती का वाटते? माझ्या कामाची भीती का वाटते? महान माणस महान असतात त्यांच्या दारात संधी आणि मानवता नांदत असते ते कधीही खुनशी निर्दयी नसतात. आम्ही जे काम करतोय ते सोप नाही, तुम्ही ते करू शकत नाहीत कारण त्याला धमक लागते, पँथर जिगर लागते, निर्भिडता लागते. गोंडा घोळ, कुबड्यांची चळवळ मी करत नाही. स्वाभिमान हाच माझा कायम अजेंडा आहे.

चंद्रपूरच्या भूमीतून एल्गार पुकारतोय नागपूर चंद्रपूर दोन्ही ठिकाणच्या दीक्षाभूमी या पूर्वाश्रमीच्या अशपृष समूहाला मानव मुक्तीच नव स्वतंत्र देणारं, बौध्द समूहाच्या नव्या जन्माच स्थान आहे. त्यामुळे देशातील सर्वात जास्तं बौध्द विदर्भात आहेत. विदर्भाने अस्मितेचा लढा तीव्र करावा. स्वतंत्र विदर्भ झाला तर मुख्यमंत्री बौध्द असेल, छोटे राज्य विकासासाठी चांगली असतात. विदर्भातील मागासलेपण घालवायचे असेल तर स्वतंत्र राज्य हाच पर्याय आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करून त्यास "दीक्षाभूमीराष्ट्र" असे नाव द्यावे हा अस्मितेचा संघर्ष आंदोलनातून आम्ही उभा करनार आहोत, त्यासाठी लढा देणार आहोत.

राजकीय भूमिका घेण्यासाठी मला सगळे सांगायला लागलेत, आमचं ठाम मत आहे. भिकमागो धोरण दुदैवी आहे, कुबड्यांच धोरण आता थांबवा, स्वाभिमान, निळा झेंडा हीच सुद्धा अस्तित्व आहे ते नाकारून चालणार नाही. आम्ही इतिहासातून उज्जवल ईतिहास घेतोय त्यावर काम करतोय राजकीय उज्जवल ईतिहास हा शे.का.फेडरेशन चा आहे. 1958 ला 6 खासदार आणि 16 आमदार निवडून आणणारा हा पक्ष शेडुल्ड कास्ट नावाने लढला होता तरी आम्ही लक्षवेधी मत आणि जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 1998 ला 4 खासदार रिपब्लिकन गटाने जिंकले त्यासाठी काँग्रेसची तांत्रिक ऐक्याची भूमिका होती. पुन्हा आम्ही जिंकलो नाहीत. या दोन्ही यशस्वी इतिहासावर आम्ही लक्ष केंद्रित करतोय. त्यादिशेने वाटचालीचा प्रयत्न आहे. आम्ही विदर्भात संख्येने जास्त आहेत येते बौध्द, आदिवासी, मुस्लीम एकत्र आला तर परिवर्तन होणार आहे. पण मरगळेलेली अवस्था, नकारात्मक अवस्था दुदैवी आहे. आम्हाला निराशाकडे घेऊन चालली. आज आमचा आवाज उठवणार विधानभवन असेल की संसद कुणीच नाही.

विसापूर - दुर्गापूर या दोन वस्त्या चंद्रपुरात आहेत, तिथं 7 वर्ष झालं पाणी नाही वीज नाही. आम्ही दलित आहेत म्हणून सात वर्ष झालं अंधारात आहेत का? पाणी पिण्याचा हक्क नाही का? सांगा आमचं स्वतंत्र कुठंय? ऊर्जामंत्री बौध्द आहे तरी बौध्द वस्तीत वीज नाही. विसापूर येथील सरपंच सुद्धा आपलाच आहे म्हणतात मग त्यांना पाणी का नाही? हे आमचे प्रश्न आहेत. 70 वर्ष झालं, आम्ही याच प्रश्नांसाठी झगडतोय. गायरान जमीन, घरकुल मागतोय काहीही फरक पडत नाही. लढा, संग्राम, संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे. मी वास्तव बोलतो, मी वास्तव लढतो म्हणून दीन दुबल्यांसाठी संघर्ष करा एवढंच मला समजलेल आहे.

मी कोरोना काळात येते दोन मोर्चे काढले, मैदानातली डरकाळी फोडली. समाजाने पुढे यावं हे लढाऊ संघटन टिकवाव. तरुण आज बदल मागतोय. आंबेडकरी चळवळीची चौथे पर्वा सुरू झालेले आहे. इतिहास सांगतात की फाटाफूट झाली, ऐक्य व्हावं म्हणून सतत स्टेटमेंट होतात. सगळे ऐक्य फुटण्यासाठी होत असतील तर ते टिकणार कसे आधी ऐक्य टिकण्याची फॉर्म्युला बनला पाहिजे अन्यथा फुटण्यासाठी ऐक्याची टिमकी वाजवणे हे समाजाची दिशाभूल प्रक्रिया आहे. सगळ्या फुटीमागे नेतृत्वाचा "अहंकार" हाच इतिहास सांगतो. त्यामुळे समाजाने नव परिवर्तन घडवाव, ज्येष्ठ नेत्यांनी, विचारवंतांनी बसावं, लिहावं आणि सांगावं. बघा आपण स्वाभिमानी स्वबळावर जिंकू शकतो.

आम्ही लढतोय साथ द्या. इशारा नाव दिलं म्हणून यंत्रणा विचारत आहे कुणाला इशारा आम्ही उत्तर देतोय संविधान बदलू पाहणाऱ्यांना मनुवादी प्रवृत्तींना आमचा इशारा की मानवता, समानता, बंधुत्व, एकत्मता आम्ही जीवंत ठेवण्यासाठी संविधान वाचवण्याचा संघर्ष आम्ही तीव्र करणार अशी डरकाळी यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी फोडली.

यावेळी पीडित महिला व्यथा मांडत होत्या सगळ्यांचे मुद्दे समजून घेतले. वानिखुर्ड येथील डांबून मारहाण झालेल्या पीडित महिला सुद्धा आल्या होत्या. अनेक लोकांनी अनेक प्रश्न निवेदन आणले होते. सगळ्यां प्रश्नाना वाचा फोडणार असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले, मराठवाडा नेता अशोक पाटील, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रुपेशभाई निमसरकार इत्यादी पदाधिकारी ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

दीपक केदार अध्यक्ष - ऑल इंडिया पॅन्थर सेना 

#AllindiaPantherSena

#JoinAIPS

No comments:

Post a Comment