संविधान दिवस । २६ नोव्हेंबर १९४९ । विषमता ते समता ? संविधान दिवस । २६ नोव्हेंबर १९४९ । विषमता ते समता ? - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, November 26, 2021

संविधान दिवस । २६ नोव्हेंबर १९४९ । विषमता ते समता ?




<img src="samvidhan-divas-2021.jpg" alt="constitution day 2021 celebrating all over india"/>




या देशात आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा एकमेव आधार म्हणजे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना संविधान बहाल करून देशाला एकसंध ठेवलं. मनुस्मृती राज्य उद्धवस्त करून, विषमतावादी सत्ता गाडून मानवतेची, समानतेची, धर्मनिरपेक्षतेची संविधान विज्ञानवादी सत्ता भारतीयांना बहाल केली.

संविधानाच्या या सत्तेनी आम्हाला जगण्याची, लढण्याची, हक्क आबादित ठेवण्याची ताकद दिली. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अधिकार समान न्याय दिला.

देशातला बहुसंख्यांक समूहाला विषमतेच्या नावावर चिमूटभर लोकांनी गुलाम केलं होतं. त्यांच्या कपाळावर शिक्के मारून दिले होते ते पुसण्याचं काम एका संविधानाने केले.

आजपासून आम्ही संविधानाला वाचवण्याची लढाई तीव्र करणार आहोत. धर्मसत्तेचे सत्ताधारी पुन्हा मनुस्मृतीची सत्ता आणायला निघाले आहेत. संविधान वाचवणं हाच एकमेव लढा केंद्रस्थानी असला पाहिजे. धर्मसत्तेच्या, सांस्कृतिक दहशतवादाच्या माध्यमातून येते संविधान उद्धवस्त करण्याचा कट केला जातो.

खाजगीकरण ही आरक्षण घालवणारी प्रक्रिया आहे, हिंदुराष्ट्राची भाषा ही संविधान राष्ट्र उद्धवस्त करणारी भाषा आहे. ईव्हीएम ही लोकशाहीची हत्या करत आहे. पत्रकार, विचारवंत जेलमध्ये आहेत लढण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा अभिव्यक्ती हक्क कैद केला जात आहे. आंदोलन करत करत 2000 शेतकरी शहीद झाले, त्यांना चिरडून टाकलं, संवैधानिक आंदोलनात्मक अधिकार चिरडवला जात आहे.

मनुवादी मोठ्या ताकदीने संविधान सत्ता घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यासाठी त्यांनी काही विविध समूहाचे स्वयंघोषित अस्तित्वहीन लोक पद देऊन पुढे केले आहेत. ते म्हणायला लागले आहेत की, संविधानवादी मोदी आहेत, संविधान धोक्यात नाही. त्यांना रेशीमबागेतून स्क्रीप्ट लिहून दिली जाते ते वाचून दाखवत असतात.

त्या प्रवृत्तीला माझा प्रश्न आहे की, जर मोदी संविधानवादी आहेत, आंबेडकरवादी आहे. तर पटेलांच्या जागी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा का नाही? उभा राहत असलेल्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का दिले जात नाही? संसदेची पायाभरणी मनुस्मृतीच्या धर्तीवर का केली? तीच पायाभरणी संविधान हातात घेऊन करायची असती. संविधान जाळलं मोदीने निषेध केला का?

स्वातंत्र्याला भीक म्हणणाऱ्या नटीला पुरस्कार दिला जातोय. भिमाकोरेगाव येते बहुजनांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाठीशी घातलं जातंय. उघड उघड ही व्यवस्था संविधान संपवत आहे, त्यांचा कर्मठ मनुवादी अजेंडा राबवत आहे.

आजच्या दिवशी नुसता जल्लोष नाही तर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली मानवतावादी, संविधानवादी सत्ता जीवन्त ठेऊया. कोणत्याही परिस्तिथत ही सत्ता जाता कामा नये अन्यथा गुलामगिरी दारात उभा आहे, ती घरात आल्याशिवाय राहणार नाही!

संविधानराष्ट्र जिंदाबाद!

#SanvidhanJindabad

#SamvidhanDiwas



No comments:

Post a Comment