मुंबई दि ०३ -
जेव्हा एक सामान्य व्यक्ती स्त्री किंवा पुरुष सामाजिक कार्य करण्यासाठी स्वतःचा दिवस रात्र एक करून तो समाजातील विविध क्षेत्रात काम करत असतो . अशावेळी त्याचं ध्येय एकच असतं कि आपण हातात घेतलेलं काम कसं पूर्णत्वाकडे नेता येईल. आंबेडकरी चळवळीत काम करत असताना त्या कार्यकर्त्याला नवनवीन विषयाकडे काम करण्याची एक धाडसी वृत्ती निर्माण होते. अश्या कार्यात त्याला विविध समस्यांना तोंड द्यावं लागत त्यापैकी एक आर्थिक समस्या.
सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांने आर्थिक संकटावर कशी मात करता येईल यासाठीच "आम्ही आंबेडकरवादी" (रजि.) सामाजिक संस्था अंतर्गत आज शहीद स्मारक हॉल, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई याठिकाणी "कार्यकर्ता आर्थिक सक्षमीकरण शिबिर" आयोजित करण्यात आले होते. शेकडोच्या संख्येने उपस्तिथ राहून चळवळीतील कार्यकर्तांनी या शिबिराचा लाभ घेतला.कार्यक्रमाची सुरूवात डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेच्या समोर दीप प्रज्वलित करून आणि पुष्पहार वाहून करण्यात आली.
या शिबिरात पुढील प्रकारच्या विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
➤कोणता व्यवसाय किंवा उद्योग करावा
➤आणि तो व्यवसाय कसा करावा
➤उदयोगाबद्दल माहिती
➤उद्योगाला लागणारे भांडवल किती
➤भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या काही संस्था
➤भांडवल उपलब्ध करण्यासाठी लागणारी प्रक्रिया
या शिबिरात कार्यकर्तांना विविध मान्यवरांसहित प्रमुख मान्यवर म्हणून मार्गदर्शन केले.
आयु . प्रवीण भिसे ( अधिकारी मत्स्य विभाग महाराष्ट्र )
आयु. विनोद वाघमारे (अधिकारी महात्मा फुले मा वि मंडळ )
आयु. चंदू जगतापजी (संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष, ट्रान्सग्लोबल अंट्रप्रनर चेंबर ऑफ कॉमर्स फॉर इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर TECCIA)
आयु. सुभाष गडहिरे (संस्थापक "आम्ही आंबेडकरवादी" सामाजिक संस्था (रजि.)
या शिबिराचे आयोजक :
"आम्ही आंबेडकरवादी" संस्थेचे
अध्यक्ष - आयु . बुद्धाभूषण शिंदे
उपाध्यक्ष - आयु. अविनाश भोसले
सचिव - आयु. अविरत गायकवाड
खजिनदार - आयु. आशिष जाधव.
"आम्ही आंबेडकरवादी" संस्थेमधये चालविण्यात आलेल्या उपक्रमाला सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
No comments:
Post a Comment