नांदेड -
राज्यातील आणि देशातील बौद्ध, मुस्लिम आणि बहुजन एकत्र आले तर प्रस्थापित राजकीय पक्षांचे राजकारण संपुष्टात येऊन राज्यात व देशात राजकीय क्रांती होईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद Farooque Ahmed यांनी आज वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा आयोजित मुस्लिम संवाद व प्रवेश सोहळ्यात व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांच्या नेतृत्वात राज्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीत जुडत असून आज नांदेड येथे शेकडो मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. राज्याचे उपाध्यक्ष प्रा. गोविंद दळवी Govind Dalvi यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. वंचित बहुजन समाजांचा खरा वाली हे केवळ ॲड. बाळासाहेब आंबेडकर Adv Prakash Ambedkar हेच असून मुस्लिम समाजाच्या पाठीशी ताकदीने उभा राहणारा खरा एकमेव नेता आहेत असे प्रतिपादन दळवी यांनी आपल्या उद्घाटने भाषणात केले.
नांदेड येथील विसावा हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आज दिनांक १४ ऑगस्ट २०२१ आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नांदेड शहरासह जिल्ह्यातील पाचशे प्रमुख मुस्लीम कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. ज्यामध्ये सेना-भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय सदस्य डॉ. संघरत्न कुरे, जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, शिवाभाऊ नरंगले, महानगराध्यक्ष आयुब खान, विठ्ठल गायकवाड, जिल्हा महासचिव शाम कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दैवशाला पांचाळ, विध्वत महासभेच्या प्राचार्य संघमित्रा गोणारकर, महानगर महासचिव उत्तम धर्मेकर, ॲड शेख बिलाल, अमृत नरंगलकर, नांदेड तालुकाध्यक्ष विनायक गजभारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय समारोपात बोलताना फारुख अहमद पुढे म्हणाले की, मुस्लिम समाज हा संघर्षाचा धागा राहिला असून येथील शोषित पीडित समाजाच्या पाठीशी सातत्याने उभा आहे. राजकीय दृष्ट्या मुस्लिम समाज वंचित सोबत आला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत परिवर्तन होईल व इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांना पळता भुई कमी पडेल असे ही ते म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात मोहसिन सुनार, अफ़ज़ल मोमिन, सादिक बाचोटिकर, शोएब खान, शेख ऐजाज़ , सईद अलकसेरी, सालार खान, नूर खान, मोहम्मद शफी, मोहम्मद अमेर, शेख शहनवाज, सुलतान बेग, मोहम्मद महमूद, जहीर खान, मोहम्मद अजीम, मोहम्मद आदिल, सय्यद आरिफ. इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह पाचशे मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
शेवटी महासचिव श्याम कांबळे Shyam Kamble यांनी प्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत केले व उपस्थितांचे आणि मान्यवरांचे आभार मानले.
- वंचित बहुजन आघाडी
No comments:
Post a Comment