बुद्ध के साथ राम जुडे है... नरेंद्र मोदी | अगतिकतेची भाषा ...भास्कर भोजने बुद्ध के साथ राम जुडे है... नरेंद्र मोदी | अगतिकतेची भाषा ...भास्कर भोजने - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Friday, August 6, 2021

बुद्ध के साथ राम जुडे है... नरेंद्र मोदी | अगतिकतेची भाषा ...भास्कर भोजने


<img src="lord-buddha-relates-to-lord-ram-fact-check.jpg" alt="lord ram and lord buddha relation check facts with proof"/>



ब्राम्हण्यवाद्यांनी कितीही शेखी मिरविली तरी त्यांचं मतं ते देशाबाहेरील जनतेच्या गळी उतरवू शकत नाहीत...!
भारतात बहूसंख्य समाजाला ज्ञानापासुन वंचित ठेऊन आपलं कपटकारस्थान दामटवून नेण्याची अघोरी वृत्ती ते 
देशांतर्गत राबवितात,मात्र जेव्हा जेव्हा एखादा मुद्दा जागतिक स्तरावरील चर्चेचा मुद्दा बनतो तिथं ब्राम्हण्यवाद्यांची 
विषमतावादी संकल्पना सपशेल नाकारली जाते आणि भारताचं कमालीचं अज्ञानी रुप जगजाहीर होतं.म्हणून 
आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर नेहमीचं भारत सरकारने आणि एकुणचं ब्राम्हण्यवादी विचारांच्या लोकांनी बुद्धाच्या नावाचा 
वेळोवेळी वापर केला आहे...!

सतराव्या शतकात विज्ञानाने क्रांती केली आणि म्हणूनच मग जग एक ग्लोबल खेडे झाले....!

त्यामुळे प्रत्येक राष्ट्राची जगात एक आयडेंटिटी निर्माण झाली.

धर्माच्या बाबतीत वा तात्विक अधिष्ठानावर आणि वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीवरुन जगातील विविध राष्ट्राची ओळख निर्माण झाली...!
जगात येशुच्या तत्त्वांचे पाईक, पैगंबरांच्या तत्त्वांचे पालन करणारे आणि बुद्धाच्या तात्त्विक अधिष्ठानावर आधारीत राष्ट्राचा जगात बोलबाला आहे हेच वास्तव आहे...!

ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्ध या धर्माचे जगात बहूतेक राष्ट्र अनुयायी आहेत,बाकी धर्म हे आपापल्या राहुट्यात आपलं अस्तित्व टिकवून आहेत एवढंच त्यांच महत्त्व आहे.म्हणून भारतातील हिंदू धर्म वा वैदिक धर्म हा जागतिक मान्यतेचा धर्म नाही म्हणून तर ती विचारधारा जगातील इतर कुठल्याही राष्ट्राने स्विकारली नाही...!!

भारताची जगात ओळख बुद्धाची भुमी अशीच आहे...!

भारताची संस्कृती आणि तात्विक अधिष्ठान हे बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे हेचं जगाने मान्य केले आहे...!

ऐके काळी भारत हा बौद्धमय देश होता आणि सम्राट अशोक हा चक्रवर्ती सम्राट होता हा इतिहास ही जगाला ज्ञात आहे...!
काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राममंदिराचा शिलान्यास करतांना एक वाक्य म्हटले...!
बुद्ध के साथ राम जुडे है.!"


या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे, भारतीय माणसाला वाटते देशाचा प्रधानमंत्री कसा असंबद्ध बोलतं आहे...!

बुद्ध मानवतावादी तर राम हिंदुत्ववादी तथा बुद्ध शांतता आणि अहिंसेच् प्रतिक तर राम हातात शस्त्र घेऊन सदा लढाईसाठी सज्ज,हिंसेचा समर्थक...!
विचारधारा फाट्यावर मारुन ओढूनताणून संबंध जोडण्याचा प्रयत्न हा खुप मोठा विरोधाभास तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी जेव्हा हा मुद्दा चर्चेला घेतला जाईल तेव्हा संदर्भ दिला जाईल की,राम हा बुद्धाचाच अनुयायी होता...!

वाक्य निट समजून घ्या...!

"राम के साथ बुद्ध जुडे है!" असे म्हटले नाही,...!!
कारण बुद्ध अगोदर की,राम अगोदर.? असा ऐतिहासिक संदर्भ देण्याची वेळ आली तर...!!
तर प्राचिन इतिहास हा बुद्धाचाच आहे रामाचा नाही...!

आंतरराष्ट्रीय पातळीवर वादाचा मुद्दा उपस्थित झाला तर सोईसाठी बुद्धाचा वापर केला गेला आहे, आणि राम हा बुद्धाचाच अनुयायी होता हे सांगण्याची सोय करुन ठेवली, हेही लबाडी भारतीय नागरिकांनो लक्षात घ्यावी...!

बुद्धाच्या नावाचा वापर पहिल्यांदाच झाला असेही नाही, यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पोखरण येथे पहिली अनुचाचणी घेतली तेव्हाही...
"आणि बुद्ध हसला" असा सांकेतिक शब्द वापरुन बुद्धाच्या नावाचा वापर केला होता.तो काही योगायोग नव्हता किंवा खोडसाळपणा ही नव्हता तर जगाला आम्ही बुद्धाचे अनुयायी असुनही शांततेसाठी अण्वस्त्रधारी बनलो आहोत ही भुमिका विषद करायची होती...!

जसा इंदिरा गांधी यांनी बुद्धाच्या नावाचा वापर केला अगदी तसाच अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पंतप्रधान असतांना अणूचाचणी घेतली त्याहीवेळी...!

"आणि बुद्ध हसला..."

हाच सांकेतिक कोड वापरला होता..!

इंदिरा गांधी कॉग्रेशी आणि सेक्युलर विचारधारेची तथा अटलबिहारी वाजपेयी हे भाजपाचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे दोघांचीही विचारधारा परस्पर विरोधी तरीही या दोघांनीही बुद्धाच्याच नावाचा वापर का करावा..??
ऊत्तर सरळ आणि सोपे आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बुद्धा शिवाय दुसरी विचारधारा मांडण्याची किंवा प्रतिपादन करण्याची सोय नाही, आणि म्हणूनच संघाला,ब्राम्हण्यवाद्यांना बुद्धा शिवाय पर्याय नाही हेच वास्तव आहे...!

आणखी एक वैशिष्ट्य बघा...!

देशाच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या खुर्चीच्या पाठीमागे बुद्धाचीच मुर्ती का बसविली आहे..??
इतर कुठल्याही देवाची का नाही,..?
इतर कुठल्याही तत्त्ववेत्त्याची मुर्ती का नाही...??
तुमच्याकडे ३३कोटी देव आहेत.
तुमच्याकडे विष्णुचे अनेक अवतार पुरुष आहेत...!
बुद्धा सोबतचं तुम्ही इतरही विचारधारेची आग्रहाने मांडणी करीत असता...!
कारण स्पष्ट आहे की, जगातील इतर राष्ट्रांचे प्रमुख जेव्हा देशात येतात तेव्हा ते राष्ट्र प्रमुख म्हणून राष्ट्रपती यांची भेट घेतात त्यांना भारत सरकार दाखवून देते की,आम्ही बौद्ध अनुयायी आहोत...!

आणखी एक वैशिष्ट्य समजुन घ्या...!

हिंदुत्ववादी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी,बिल गेट्स यांना बुद्ध मुर्ती भेट देतोय...!
रामाची मूर्ती का नाही..??
बिल गेट्स, ख्रिश्चन धर्म मानतात त्यांना रामाची वा कृष्णाची मुर्ती का भेट दिली गेली नाही...??
जपानचे पंतप्रधान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी,बुद्ध मुर्ती भेट देतात...!
रामाची मूर्ती का नाही..??
रामराज्य निर्माण करायला निघालेल्यांनी रामाच्या मुर्तीचा वापर का करु नये...??
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडा मध्ये भाषण करतांना बुद्धाच्याच नावाचा नेहमी वापर करीत होते असे का.?
तुम्हाला रामराज्य निर्माण करायचे आहे आणि तुम्ही जगभर बुद्ध सांगतं फिरता हे कशाचे द्योतक आहे...??

देशाचा प्रधानमंत्री देशाबाहेर जेव्हा जेव्हा आपली ओळख देतो तेव्हा तेव्हा तो बुद्धाच्याच नावाचा वापर करतो हा इतिहास आहे...!

देशात हिंदुत्ववादी मात्र बाहेर बुद्ध तत्त्वज्ञानाची कास धरणारे असा विरोधाभासी विदृप चेहरा घेऊन मिरविण्यापेक्षा सरळ सरळ आपल्या मुळ विचारधारेला अर्थात बौद्ध विचारधारेला अनुसरावे अशी सर्वच सभ्य लोकांची इच्छा आहे...!!

नमो बुद्धाय....! जयभीम...! 

- भास्कर भोजने - एक्टिविस्ट ।स्तंभ लेखक । वंचित बहुजन आघाडी






Lord Krishna in Buddhism Lord rama in Buddhism shriram in buddhism ram and buddha buddha and ram lord buddha and lord ram 


No comments:

Post a Comment