अयोध्या राम मंदिर प्रकरण : हिंदू विरुद्ध बौद्ध नवा वाद अयोध्या राम मंदिर प्रकरण : हिंदू विरुद्ध बौद्ध नवा वाद - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, May 23, 2020

अयोध्या राम मंदिर प्रकरण : हिंदू विरुद्ध बौद्ध नवा वाद








<img src="ayodhya-ram-mandir.jpg" alt="ayodhya ram mandir new issue generates buddhist against hindu"/>


सध्या देशात लोकडाऊन सुरु असतानाच अयोध्या येथे उत्खलन सुरु आहे आणि त्यात बौद्ध धम्मसंबंधी काही 

अवशेष सापडले आहेत . त्यामुळे बौद्ध समाजाने ( विशेष करून नवबौध्द किंवा त्यांना आपण आंबेडकरी 

समाज म्हणतो तो ) या प्रकरणात उडी घेतली आहे . काही मोजक्या लोकांकडून बौद्ध समाजाने ती जागा 

मिळविण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्याठिकाणी बुद्ध विहार बांधावे व राम मंदिर दुसर्या ठिकाणी बांधावे , असं 

सुचवत आहेत . 

या पार्शवभूमीवर काही लागोपाठ घडलेल्या ( घडविण्यात आलेल्या ) घटनाक्रम बघूया ;
१ अयोध्या मध्ये राम मंदिर बनवावे - सुप्रीम कोर्ट
२ करोनामुळे देश लोकडाऊन पण राम मंदिर निर्माण काम चालू
३ करोनामुळे देवावरील विश्वास उठला - मोहन भागवत
४ अयोध्येत खोदकामात बुद्ध धम्माचे अवशेष सापडणे
५ गोदी मीडियाद्वारे हे अवशेष श्रीरामाच्या संबंधित असल्याचा प्रचार
६ आंबेडकरी समाजा( बौद्ध नवं बौद्ध )तर्फे त्याठिकाणी बौद्ध विहारासाठी जोरदार मागणी

आता लक्षात येईल कि अचानक बौद्ध विहाराची मागणी का ? या अगोदर हि उत्खलन करताना बुद्ध मूर्तीचे 

अवशेष सापडले होते . पण त्यावेळी अशी मागणी झाली नाही .

खरंतर करोनाने केंद्र सरकार अर्थात भाजप ला उघड नागडं करून टाकलं आहे . चारही बाजूने भाजपवर टीका 

होतेय .एकीकडे भाजप हिंदू मुसलमान दंगे करण्यात फेल गेलीय तर दुसरीकडे करोनाने त्यांची देश 

चालवण्याची लायकी नाही हे दाखवून दिलय . तसेच सत्तेत असलेले राज्यसरकारही सफल आहे असं नाही 

कारण हे सर्व पार्ट्या वेगवेगळ्या नावाच्या पण विचार एकच आपली सत्ता कशी टिकवायची .

येणारा काळ हा आंबेडकरी जनतेला बौद्धिक क्षमता दाखविण्याचा काळ आहे . एकतर आंबेडकरी विचारांचं 

कोणत्याही राज्यात सरकार नाही . कोणी मोठा नेता ( काही सोडून ) पुढे येण्यास घाबरत आहे . अश्यावेळेस 

राम मंदिर प्रकरण समजून घेण्यास आंबेडकरी समाजान खोलवर विचार केला तर लक्षात येईल कि प्रत्येक 

विषयावर फक्त एकाच समाज सरकारच्या धोरणावर आपली प्रतिक्रिया देतो आणि तो म्हणजे आंबेडकरी समाज 

जो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे . आपलं मागील ६ वर्षाचं अपयश 

झाकण्यासाठी पहिलं याच समाजाला कुठल्यातरी प्रकरणात गुंतवायच आणि यांचा काटा काढायचा असा बेत 

ब्राह्मणी मानसिकतेचा आहे . आणि त्यासाठीच राम मंदिर पुढे आलं आहे . आधीच आंबेडकरी समाज हिंदू देवी 

देवतांवर नेहमीच टीका करीत असतात त्याचा फायदा ब्राह्मणवाद्यानी घेऊन हा विषय हिंदू विरुद्ध बौद्ध असा 

उभा करण्याचा यशस्वी प्रयत्न ते करत आहेत  . 

आपल्या सर्वांना माहीत आहेच कि हिंदूंची जेवढी प्राचीन मंदिर आहेत ती बौद्ध विहार किंवा स्तूप आहेत . 

चक्रवर्ती सम्राट अशोकाने बांधलेल्या ८४००० स्तूपायाचे ब्राह्मणि मानसिकतेने त्याला मंदिरात बदलले काही 

विहार परकीय आक्रमणात तोडली गेली होती .हा सर्व इतिहास आपल्याला माहित आहेच . 

राम मंदिर का भाजपच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे इतकी वर्षांची मेहनत ते इतक्या सहजा गमावणार नाही त्यासाठी हे 

हिंदुत्त्वादी समजणारे कोणत्या नीच थराला जातील हे सांगता येत नाही .

त्यामुळे आंबेडकरी जनतेनं सावधान राहून या गोष्टीकडे बौद्धिक दृष्टीने अभ्यास करून निर्णय घ्यावा . जर 

आपल्याला बुद्ध विहार हवच असेल तर प्रथम जे बुद्ध विहार आहे बौद्ध गयेतील त्याला पहिलं ब्राह्मणी जाळ्यातून 

सोडवण्यासाठी प्रयत्न करावे कारण देश विदेशात ते बुद्ध विहार म्हणून प्रचलित आहे . जर त्या विहाराला आपण 

ब्राह्मणवाद्यांकडून सोडविण्यात यश मिळालं तर आपण इतर प्राचीन मंदिर जी पूर्वी बौद्ध विहार किंवा स्तूप होती 

त्यासाठी आपण लढू शकतो .

पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिर प्रकरणापासून आंबेडकरी समाजानं सावध रहावं आणि तथागत बुद्धांचा 

आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कसा लोकांपर्यंत पोहचविता येईल यावर लक्ष केंदित करावे .

अधिक माहीतीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ साहित्यासोबत पुढील ग्रंथ जरूर वाचावे

डॉ भाऊ लोखंडे लिखित - अयोध्या कुणाची ? रामाची ? बाबराची ? कि बुद्धाची

मा म देशमुख यांची विविध पुस्तके



No comments:

Post a Comment