सावरकरांबद्दल खोटं बोलणं थांबवा सावरकरांबद्दल खोटं बोलणं थांबवा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, January 4, 2020

सावरकरांबद्दल खोटं बोलणं थांबवा

<img src="say-nothing-about-savarkar.jpg" alt="Vinayak Damodar Savarkar"/>


मुळात ( Vinayak Damodar Savarkar ) विनायक दामोदर सावरकरांवर कुणाचाही राग नाही. त्यांच्यावर

टिकाटिप्णी करण्याची अथवा त्यांची बदनामी व टिंगल करण्याची कोणालाही कोणतीच हौस व गरज नाही. तसेच 

त्यांचा ब्राह्मण म्हणून द्वेष करायलाही कोणालाच काही कारण व वेळ नाही. असे असतानाही सावरकरवादी 

(खरेतर ते सावरकरवादी मुळीच नाहीत कारण सावरकरांचा बुध्दिप्रामाण्यवाद त्यांना मान्य नसतो) आणि 

सावरकर विरोधी (खरेतर ते सावरकर विरोधी मुळीच नाहीत फक्त सत्यान्वेशी आहेत आणि सावरकरांचा 

बुध्दिप्रामाण्यवाद त्यांना मान्य असतो) या सरळ सरळ दोन गटात सावरकरांवरुन नेहमीच हाणामारी जुंपलेली 

असते.

याचे कारण आहे, अनेक माध्यमातून सर्वत्र सुरु असलेले सावरकरांचे अमाप उदात्तीकरण. सावरकर भक्तांनी 

धडधडित खोटेपणा करुन सावरकरांची बोगस उत्तुंग महानता निर्माण करण्यासाठी फेक व larger than life 

बनवलेली व बनवत असलेली प्रतिमा. सावरकर हे वीर नव्हते, महावीर नव्हते, स्वातंत्र्यवीर तर मुळीच नव्हते. 

तरीही त्यांच्या देशभक्तीच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या, त्यागाच्या, क्रांतीकारत्वाच्या, गुरुत्वाच्या, हाल-अपेष्टांच्या 

आणि अखंड भारताच्या बोगस व भ्रामक कथा बनवून आपल्याला मुर्ख समजून ख-याखु-या कर्तृत्ववान 

स्वातंत्र्यवीरांना बेदखल करुन एक सुमार वकूबाची व कर्तृत्वाची व्यक्ति आपल्या बोकांडी लादण्यात येत आहे, हे 

सहन होत नसल्याने आमच्यासारखे एरवी सावरकरांना एक उत्तम कवी, लेखक व बुध्दिप्रामाण्यवादी म्हणून 

मानणारे लोकही व्यक्तिगत पातळीवर उतरुन एखाद्या कट्टर शत्रूप्रमाणे सावरकरांवर तुटून पडतात.

यावर अगदीच सोपे सोल्युशन आहे. तुम्ही आमच्या विरुध्द एकतर सावरकरांच्या तथाकथित बदनामी विरुध्द 

पोलीसात रितसर गुन्हे नोंदवावेत व न्यायालयात खटले दाखल करावेत. किंवा सावरकरांचे धडधडित खोटे 

उदात्तीकरण बंद करावे. कारण प्रत्येक क्रियेला तितकीच जोरदार कदाचित अधिक जोरदार विरोधी प्रतिक्रिया 

मिळणारच. सावरकरांचा हिंदुत्ववाद ही अन्य विचारसरण्यांसारखीच एक विचारसरणी आहे हे सर्वानाच मान्य 

आहे. 

पण तुम्ही सावरकरांबाबत खोटे सांगणे बंद करा, मग आम्ही सावरकरांबाबत खरे सांगणे बंद करतो. 

तुम्ही सावरकरांचे फुगे फुगवणे थांबवा, मग आम्ही त्यांना टाचण्या टोचण्याचे थांबवतो!


साभार : मोहन पाटील सामाजिक कार्यकर्ता