"आम्हांला कोणताच धर्म नाही!"- मुक्ता साळवे "आम्हांला कोणताच धर्म नाही!"- मुक्ता साळवे - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, January 6, 2020

"आम्हांला कोणताच धर्म नाही!"- मुक्ता साळवे


<img src="mukta-salve-jayanti.jpg" alt="india first female dalit writer"/>


"शिकले तर संघर्ष कळेल.गुलाम म्हणून किती दिवस जगायचं? बाप गुलामीत मेला,पोरांनो तुम्ही तरी जग मुक्त 

बघा."१०सप्टेंबर१८५३ 'द सोसायटी फॉर प्रोमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार-मांग इटीसी' या संस्थेची स्थापना 

करण्यात आली.त्यात लहुजींच्या कार्याची महत्वाची पावती मिळते.कारण लहुजींचे मोठे बंधू शिवजी साळवे यांची 

मुलगी 'मुक्ता' लहुजींची पुतणी या शाळेत शिकायला म्हणून पहिली विद्यार्थी होती.

मुक्ताने शिकलेल्या ज्ञानातून "मांगामहारांचे दुःखाश्रु" हा संशोधन असणारा अहवाल निबंध लिहिला.आणि ब्रिटिश 

सरकारकडे तो फुलेंनी इंग्लंडमध्ये राणीकडे पाठविला.या संशोधन अहवाल निबंधाला अनुसरून पुढील ब्रिटिश 

धोरण अस्पृतेविषयी ठरू लागले.

मुक्ता यातुन सांगू पाहते आहे, आम्हाला हा विवेक आहे की, जो धर्म आम्हाला माणूस म्हणून समजतच नाही. ही 

धर्माची पुस्तक आम्हाला हात लावायला सुद्धा मिळत नाही. पाहायला सुद्धा मिळत नाही.पाहायचं सोडा आमच्या 

कानावर त्याची शब्दही ऐकायला पडू देत नाही. तो धर्म आमचा कशावरून आहे?

असा प्रश्न ज्या वेळेस त्या निबंधातून मुक्ता साळवे आपल्या समाजाच्या समोर आणि समस्त इंग्रजांच्यासमोर 

सत्यमाहितीची ही कैफियत, धर्माची कैफियत,समाजाची कैफीयत मांडते तेव्हा ती एका समाजाची राहत 

नाही.धर्माची राहत नाही. ती समस्त होते. ती एका जातीतून येत नसते ती तर ती असते सकल मानव जातीला 

मानवतेचे प्रज्ञान देणारी. धर्माने जसं मानवाला शोषणाचे यंत्र समजले आहे ये यंत्र व त्याची बिघाड, दुरुस्ती धर्म 

समुजन घेत नसला तर त्या धर्माची उत्पादने आम्ही नाकारतो आहोत. असे मुक्ता त्या काळातील नसलेला 

मार्क्सिक्स्ट सांगते आहे.

धर्माच्या आधीन राहून माणसाने माणूसजीव शोषण केलेला आहे.माणसाला अस्तित्व बहाल करण्यास मुक्ताने 

त्या त्या धर्माच्या विरोधात केलेली ती पहिली समीक्षा आहे. 

मुक्ताची ही समीक्षा त्या काळातला तो प्रश्न आहे. "आम्हाला कोणताही धर्म नाही!" ही धर्माच्या आधीन राहून 

आम्हाला जगता येत नाही. कारण की, धर्म आम्हाला माणूस म्हणूनच घेत नाही. समाज परिवर्तन करण्यासाठी 

धर्महीन मुक्ता साळवे यांनी सांगितलं की आम्ही धर्महीन आहोत. धर्मरहित आहोत आणि आपल्या तसेच 

धर्मरहित राहणं काळाचं सत्य आहे.

कोवळ्या वयातील मुलीने अस्पृतेविषयी लिहिणे म्हणजे एक क्रांति होती.कारण हा काळ मुलींना घरात बसून 

स्वयंपाक,भांडीकुंडी, दळणभर्डन,आणि रांगोळ्या काढणेच नाही तर बाळूते धुवायला लावणारा होता.घराच्या 

उंबऱ्यावर्ती पाऊल न ठेवू देणाऱ्या व्यवस्थेचा होता.मुली ह्या चुलीपुरत्या होत्या.स्त्री ही वासना भोगण्याची बाहुली 

होती. 

लहुजींना व फुले दाम्पत्याने ते सर्व रुढीप्रिय वास्तव अमान्य होतं.ते स्त्री,शूद्राती शूद्र राजकारण त्यांनी एकजुटीने 

झुगारून दिलं.तो काळ कट्टरपंथी होता.
१८२६पासून हा इंग्रज लढा सुरू होता.पुढे इंग्रज-रामोशी यांच्या बंडात लहुजींनी बंडाचे नैतृत्व करण्यासाठी 

उमाजीला नायक केलं.उमाजी नाईक हे त्या बंडाचे खलितेदार झाले. 

१८५७ च्या उठवत कैक शिष्य लहुजींनी पाठविले.शस्त्रसाठा व खानावळीची मदत केली.बहादूर शिष्य त्यांनी 

तयार करून पाठवून दिले.
मुक्ता ही या प्रबोधनाच्या परंपरेशी प्रामाणिक होती.म्हणून तिच्या निबंधातून अश्रुंचे विखार बाहेर येतात! 

देशातील पहील्या सावित्री माईच्या विद्यार्थिनी क्रांती कन्या मुक्ता साळवे यांच्या 177व्या जयंती निमित्त कोटी 

कोटी विनम्र अभिवादन... 

साभार - विश्वनाथ साठे [9921056462]