प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित समूहांचे "अकोला मॉडेल" प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित समूहांचे "अकोला मॉडेल" - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, January 12, 2020

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित समूहांचे "अकोला मॉडेल"

<img src="prakash-ambedkar-akola-pattern.jpg" alt="vanchit bahujan aghadi prakash ambedkars akola pattern in maharashtra"/>
सीएए आणि एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडी जन-आंदोलन दादर 



लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण होवून तिचा समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत लाभ मिळाला पाहिजे अशी

संकल्पना आपल्या संविधानात आहे. पण दुर्दैवाने धर्म दांडग्या, जात दांडग्या व धन दांडग्या प्रस्थापितांनी 

राजकीय सत्ता आपल्या "मोजक्या कुटुंबातच " कैद करून ठेवली आहे.मग ती सत्ता देशाची,राज्याची की 

स्थानिक स्वराज्य संस्थांची असू देत ती कायम आपल्याच हातात असावी आणि गावगाड्यातील बहुसंख्य 

अलुतेदार बलुतेदार अठरापगड जाती समूह आपला बटीक रहावा अशी प्रस्थापितांची शिरजोर मानसिकता 

आजही आपल्याला पाहायला मिळते.

याला छेद देत वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार अॅड बाळासाहेब तथा 

प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाहीचे सामाजिकरणाच्या दृष्टीने बहुसंख्य अलुतेदार बलुतेदार यांना अकोला 

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थां -जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सत्ताधारी बनवले आहे.जिल्हा परिषद, 

पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पाचव्या टर्म मध्येही वंचितांचा अकोला पँटर्न यशस्वी झाला 

आहे.

जिल्हा परिषदेच्या एकुण 53 जागांपैकी 23 जागा (व 2 बंडखोर मिळून)अशा एकुण 25 जागा अॅड बाळासाहेब 

आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी/भारिप बहुजन महासंघाने जिंकल्या आहेत.यामध्ये 

गावगाड्यातील अलुतेदार बलुतेदार समूहाच्या प्रतिनिधींना अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी निवडून आणले 

आहे.

त्याच बरोबर जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या एकुण 106 जागांपैकी तब्बल 50 जागा वंचित बहुजन आघाडी/

भारिप बहुजन महासंघाने जिंकून दुर्लक्षित वंचित समूहाला पाचव्या टर्ममध्येही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध 

करून दिली.तीन पंचायत समितींमध्ये पुर्ण बहुमत व दोन पंचायत समितींमध्ये युती करून तसेच एका ठिकाणी 

अपक्षाच्या मदतीने सहा पंचायत समितींवर वंचित समूहाचा झेंडा फडकणार आहे.सातव्या पंचायत समितीत 

पाच सदस्य निवडून आले पण तिथे खिचडी सरकार अस्तित्वात येणार आहे. तिथेही वंचित बहुजन आघाडी 

निर्णायक भूमिकेत आहे.


<img src="prakash-ambedkar-akola-pattern.jpg" alt="vanchit bahujan aghadi prakash ambedkars akola pattern in maharashtra"/>
सीएए आणि एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडी जन-आंदोलन दादर 


लोकशाहीचे सामाजिकरण करण्याच्या भूमिकेतून ज्या वंचित समूहांना मा अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी 

प्रतिनिधित्व देवून निवडून आणले ते कोणत्या समूहाचे व किती प्रतिनिधी निवडून आले त्याची माहिती पुढे देत 

आहे.(पंचायत समितीच्या एकुण जागा 106 पैकी 50जागा वंचित बहुजन आघाडी/भारिप बहुजन महासंघाच्या 

निवडून आल्या आहेत.)

◆बौद्ध - 16

◆मराठा - 02

◆कुणबी - 03

◆मुस्लिम - 07

◆बंजारा - 03

◆माळी - 02

◆धनगर - 05

◆मारवाडी - 01

◆ टाकोणकार - 01

◆भोई - 01

◆चित्रकथी - 01

◆मुस्लिमशहा - 01

◆गवळी पाटील - 01

◆ वंजारी -01

◆ कोळी -- 02

◆ आदिवासी - 01

◆ भिल्ल - 01

◆दखनी मराठा - 01

प्रस्थापितांनी आजही समाजातील 35 ते 40 % असलेल्या मायक्रो ओबीसी,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त 

समूहांना राजकीय सत्तेपासून दूर ठेवले आहे.या समूहांनी नशीबाला दोष देत लढण्याचे शस्त्रे खाली ठेवले 

होते.मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत छोट्या प्रमाणात काही होईना सत्ता 

वंचित समूहाच्या दारात पोहचवली आहे. वंचित समूहाचे अकोला पँटर्न राज्यातील इतरही जिल्ह्यात रूजले 

पाहिजे. अकोला शेजारच्या वाशीम जिल्ह्याने "अकोला मॉडेल" स्विकारले. त्यामुळे तिथेही बदल होवून 09 जागा 

वंचित बहुजन आघाडीच्या निवडून आल्या आहेत.भविष्यात खासकरून मराठवाड्यात अकोला मॉडेलला खूप 

संधी आहे.फक्त गरज आहे ती दृढ निश्चयाची.आत्मविश्वासाची आणि थोडी त्यागाची सुद्धा.नेतृत्वावर विश्वास ठेवून 

आंबेडकरी समूह यासाठी नजिकच्या काळात नक्कीच पुढाकार घेईल अशी अपेक्षा आहे.

सुरेश शिरसाट (वंचित बहुजन आघाडी), अकोला 8999558949