भारतीय लोकशाही गणराज्याचे उगमस्थळ भारतीय लोकशाही गणराज्याचे उगमस्थळ - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, January 27, 2020

भारतीय लोकशाही गणराज्याचे उगमस्थळ

<img src="origin-of-indian-democracy-republic-of-india.jpg" alt="the origin of indian democrscy based on  buddhist dhamma"/>



२६ जानेवारी २०२० ला आम्ही सर्व भारतीय आपला ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. २६ जानेवारी

१९५० या दिवसापासून भारतात संविधान लागू झाले आणि भारतात लोकांचे, लोकांनी बनविलेले, लोकांसाठी 

असलेले संघराज्य स्थापन झाले. भारतीय संविधानानुसार इथे प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि 

शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. प्रत्येक भारतीयाला बरोबरीची संधी प्राप्त झाली. स्वतःचे प्रतिनिधी निवडून 

संसदेत, विधानसभेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पालिका, ग्राम पंचायत इत्यादि 

ठिकाणी पाठवण्याचा अधिकार प्राप्त झाला. या प्रकारच्या शासन व्यवस्थेला प्रजासत्ताक ( लोकशाही ) असे 

म्हणतात. स्वतंत्र भारताला रूजविण्या करिता, देशाच्या वाटचाली करिता मिळालेली लोकशाही ही डॉ. 

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली एक बहुमूल्य देणगी आहे. हुकुमशाही किंवा ईतर मार्गाचे संचालन या देशाला 

स्वातंत्र्यानंतर मिळाले असते तर आजच्या भारताचे रूप, आणी जनतेची अवस्था निश्चितच भयावह असती.

बाबासाहेबांनी जेव्हा संविधानाचे प्रारूप तयार केले तेव्हा बऱ्याच विद्वानांचा असा समज होता की सध्याची 

विधिमंडळाची जी पद्धती आहे ती आपण युरोपियन राष्ट्रांकडून विशेषतः इंग्लंडपासून घेतलेली आहे. परंतु, 

बाबासाहेबांनी या विषयी गैरसमज दूर करतानां त्रिपिटकातील #विनयपिटक या ग्रंथाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. 

बुद्धकालीन गणराज्यातील गुप्त मतदान पद्धती, संघाच्या विधीमंडळाचे नियम यांचा ते हवाला देतात. भारतीय 

संविधानाबद्दल बऱ्याच अभ्यासकांना असेही वाटत होते की, भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नाही. 

परंतु या विषयावर बाबासाहेब म्हणतात 'एक काळ असा होता की भारत गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे 

कुठे राजेशाही असेलही तर ती एकतर जनतेने निवडलेली किंवा सिमीत असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध 

नव्हत्या. भारताला यापूर्वी संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हते असे नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या 

अभ्यासातून हे स्पष्ट होते की, त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे. संघीय प्रणाली हे दुसरे काही नसून 

एकप्रकारे संसदच होती. तर आधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला 

माहीत होते आणि त्यांचे ते पालन करीत होते. ससंदेत प्रत्येकाच्या बसण्याच्या व्यवस्था, विधेयक मांडण्याचे 

नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, पक्ष प्रतोदान, आदेश काढणे, बहुमत, 

मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात, सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था, दंड इत्यादींबाबत 

त्यांच्याजवळ नियम होते. संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले 

तरी देशात त्याकाळी कार्यरत असलेल्या राजकीय विधिमंडळाच्या नियमावलीतूनच त्यांनी ते स्वीकारले असले 

पाहिजेत. ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८भाग ३ ).

भारताच्या इतिहासात लोकशाही, स्वातंत्र्य, समता या तत्वांचा पुरस्कार करणारे तथागत बुद्ध हे धर्मसंस्थापकात अग्रणी आणि एकमेव असे धर्मसंस्थापक होते.
प्राचीन भारतात सुदृढ लोकशाही होती याचे पुरावे आपणाला बौद्ध वाङ्गमयात आणी त्रिपिटकात सापडतात.

तथागतांनी वज्जीगणांच्या लोकांना सात प्रजातांत्रिक गोष्टी शिकवल्या होत्या. जेव्हा मगधचा राजा अजातशत्रूचा 

मुख्यप्रधान, अजातशत्रुच्या सांगण्यावरून भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याने अजातशत्रु हा लिच्छवीं 

गणराज्यावर आक्रमण करण्यास उत्सुक आहे असे सांगितले. तेव्हा भगवान बुद्धांनी उपदेशपर सात गोष्टींची 

प्रशंसा केली व म्हणाले जोपर्यंत वज्जी या सात गोष्टींचे पालन करतील तोपर्यंत वज्जीकुळाची अधोगती होणार 

नाही. (महापरिनिब्बाणसुत्त)

त्या सात गोष्टी पुढीलप्रमाणे -

१. नेहमी एकत्रित येऊन सामूहिक निर्णय घेणे.

२. निर्णयानुसार कर्तव्याला एकजुटीने करणे.

३. व्यवस्थेचे ( कायदे आणि नियमांचे ) पालन करणे.

४. वृद्धांचा सत्कार सन्मान करणे.

५. स्रियांवर जोर जबरदस्ती न करणे.

६. सामाजिक धम्माचे पालन करणे.

७. धम्मचाऱ्यांचा सन्मान करणे.
सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही.
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन का आणि कसा साजरा करावा
त्रिपिटकात बऱ्याच ठिकाणी आपल्याला बुद्धकाळातील काही राज्यांचा उल्लेख मिळतो त्यावर राजाची अधिसत्ता 

नव्हती. ती राज्ये म्हणजे कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे 

विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बुली, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलिवनाचे मौर्य आणि सिसुमागिरीचे भग्ग.

तथागत बुद्ध हे सिद्धार्थ असताना कपिलवस्तूचे राजपुत्र होते, ते शाक्यांच्या संघाचे सभासद होते. म्हणजेच त्यांची 

जडणघडण ही लोकशाही पध्दतीत झाली होती.कारण कपिलवस्तू चे शासन हे प्रजातंत्रीय होते.

त्रिपिटकातील जातक या ग्रंथात दसराज धम्म या जातक कथेत बुद्धांनी राजाची दहा कर्तव्ये सांगितलेली आहेत.

१. राजा उदारमतवादी, दानशूर असावा. त्याला संपत्तीची लालसा नसावी. तसेच त्याच्यात लोककल्याणासाठी ती 

संपत्ती देण्याची दानता असावी.

२. तो चारित्र्यवान असावा तो कधीही इतरांना उध्वस्त करणारा नसावा, इतरांना फसवणारा, परस्त्रीगमन 

करणारा नसावा. तो पंचशीलाचे पालन करणारा असावा.

३. जनतेच्या भल्यासाठी त्याच्यामध्ये सर्व काही त्यागण्याची वृत्ती असावी. ४. तो इमानदार असावा, कर्तव्यनिष्ठ 

असावा.

५. तो दयाळू व सभ्य असावा.

६. त्याच्या सवयींमध्ये तपस्येचे भाव असावे, त्याचे राहणीमान साधे असावे, तो जीवनातील ऐशो आरामात 

अडकलेला नसावा, तसेच तो संयमित असावा.

७. तो द्वेष, वैर, शत्रूता यापासून अलिप्त असावा. त्याचे मन कोणत्याही पूर्वग्रहाने दूषित नसावे.

८. तो अहिंसावादी असावा, याचा अर्थ असा नाही की तो कोणतीही हिंसा करत नाही, परंतु त्याने कोणत्याही 

प्रकारच्या हिंसेला, युद्धाला उत्तेजन देऊ नये.

९. तो सहनशील असावा, समजूतदार असावा. तो सर्व प्रकारचे कष्ट, अडथळे तसेच मानसिक संतुलन न हरपता 

अपमान सहन करण्याची वृत्ती बाळगणारा असावा.

१०. तो कोणासही विरोध किंवा अडथळा बनता कामा नये, म्हणजेच जनतेच्या इच्छेच्या विरुद्ध, जनतेच्या 

कल्याणाविरुद्ध अडथळा बनणारा नसावा. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्याला जनतेशी एकरूप होऊन 

राज्य करता आले पाहिजे.
बुद्धांनी सांगितलेली राजांची ही दहा कर्तव्ये आजच्या सत्तारूढ पक्षाने आणी त्यांच्या राज्यकर्त्यांनी पाळली तरच या देशात खरी लोकशाही नांदेल, यात शंका नाही.
भारत हा देश विविध पंथ, वंश, जात, पक्ष, समूह इत्यादींमध्ये विभागलेला देश आहे. या सर्वांना एकासूत्रात 

बांधण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे. बुद्ध ही आपल्या धम्माची व्याख्या याचप्रकारे करतात. 

प्रजासत्ताक दिनचर खरे मानकरी कोण
ज्याप्रमाणे अनेक नद्या वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत येऊन महासागरास मिळतात तिथे एकरूप होतात 

त्याचप्रमाणे संघात प्रवज्जीत झाल्यानंतर सर्व भिक्खू समान असतात. धम्म हा सर्वांसाठी सारखाच आहे. 

लोकशाही व स्रियांचे सुद्धा अतूट नाते आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्त्री सक्षमीकरणावर सुद्धा भर दिला 

गेल्याचे आपण पाहतो.

बुद्धपर्वाचा भारतातून लोप झाल्यानंतर स्त्रीयांची स्थिती ही मधल्या काळात अतिशय दयनीय होती. 

त्रिपिटकातील चुल्लवेदल्ल सुत्तात धम्मानुसार स्त्रीयांना पूर्णतः पुरूषांच्या बरोबरीचे स्थान आहे असे भगवान 

बुद्धांनी म्हटले आहे.

थेरिगाथा या ग्रंथात पाहिले असता कित्येक स्त्रीयांनी बुद्ध धम्मात प्रवज्जीत होऊन अर्हत्वपद प्राप्त केल्याचे 

पहावयास मिळते.

ब्रिटिश विचारवंत सर लेपेल ग्रीफिन म्हणतात, इतर कोणत्याही संप्रदायापेक्षा बौद्ध धम्माने स्त्रीयांच्या सुखाकरिता 

आणि दास्यमुक्तीकरिता अधिक कार्य केलेले आहे.

आजची भारतीय लोकशाही ही अशी शासनपध्दती आहे ज्यामध्ये स्वातंत्र, समता आणि बंधुत्व या सामाजिक 

मूल्यांना अधिक महत्व आहे. ही तत्वे संविधानात फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आहेत असा बऱ्याच जणांचा समज 

होता, परंतु बौद्ध वाङ्गमय अभ्यासले असता या तिन्ही बाबी आपल्याला यामध्येच सापडतात व बुद्धाने आपल्या 

संपुर्ण जीवनकाळात स्वातंत्र, समता आणि बंधुत्व यांची शिकवण दिल्याचे पहायला मिळते अर्थातच जगातील सर्व 

धर्मसंस्थापकामध्ये सर्वप्रथम बुद्धाने या त्रयींचा पुरस्कार केल्याचे आढळून येते. आणी आपले गुरू तथागत बुद्ध 

यांच्या शिकवणीतले #बहुजन_हिताय_बहुजन_सुखाय चे हे प्रजातन्त्र सूत्र बाबासाहेबांनी संविधानात रोवले. 

आणी स्वतंत्र भारताने अंगीकारलेल्या या संविधानातील मूलभूत तरतुदी मुळेच आज आम्ही खऱ्या अर्थांनी स्वतंत्र 

व प्रजासत्ताक आहोत.

सर्वानां ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ( गणतंत्र दिवस ) हार्दिक शुभेच्छा.

साभार : अश्विन पानतावणे (नागपूर)


No comments:

Post a Comment