भारत देश १५ आगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला आणि आपल्याला ब्रिटींशाकडून मुक्तता मिळाली .पण अजून
संपूर्ण मुक्तता मिळाली नव्हती कारण देश वेद आणि पुराण अश्या थोतांडावर चालत होता . अडीच वर्षातच
भारत देश हा प्रजासत्ताक म्हणून जगासमोर उभा झाला आणि तो दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० .याच
दिवसापासून भारतात दर वर्षांला दुसरा राष्ट्रीय सण ( पहिला राष्ट्रीय सण : १५ ऑगस्ट : स्वतंत्र दिवस ) म्हणून
साजरा होऊ लागला .कारण या दिवसापासून पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरेला इथे पूर्ण विराम
मिळाला आणि आपली नवी ओळख बनवायला आपण सज्ज होणार आहोत. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच राज्य
येणार गेली ती हुकूमशाही आणि कोठडी त्या वचननदारांची/ राजेशाहीची अश्या प्रकारच्या अनेक उमीद
लोकांमध्ये जागृत झाल्या .याचा हर्षो उल्हास म्हणून आपण २६ जानेवारी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करायला
लागलो . पण एक प्रश्न भेडसावतो कि या सणाचा मुख्य मानकरी कोण असायला पाहिजे ? आपण कोणाला
पुजायला पाहिजे इ .
आपण गेली ६० वर्ष किंवा आपल्या बालपणापासून टिव्हिवर वर्तमान पात्रातून पाहत आहोत आणि शाळेत
वाचतहि आहोत ती म्हणजे जेव्हा २६ जानेवारी येते तेव्हा गांधी , पं नेहरू , डॉ .राजेंद्रप्रसाद आदी . यांचे फोटो
किंवा शॉर्ट विडिओ नक्की दिसतात मग आता प्रश्न येतो कि २६ जानेवारी तथा प्रजासत्ताक दिनाचे मानकरी हेच
आहेत का ? कि दुसरा कोणीतरी ? पं .नेहरू ,गांधीजी ,डॉ.राजेंद्रप्रसाद ,वल्लभ पटेल पण विचार केला तर नाही
हेच उत्तर मिळत जरा मागे वळून इतिहासात पाहिलं तर .पं . नेहरू १५ ऑगस्ट नंतर भारत देशाचे पहिले
प्रधानमंत्री झाले आणि डॉ .राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती .आता राहिले गांधी ज्यांची हत्या देश स्वतंत्र होऊन
पाचच महिन्याने आर एस एस ( R S S ) सारख्या संघटनेने करण्यात यशस्वी झाल्या . वल्लभ पटेल हे गृह
मंत्री. मग कोण आहे ज्याला आपण वंदन करायला पाहिजे ?
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन का व कसा साजरा करावा
तर उत्तर आहे डॉ .बाबासाहेब आंबेडकर...
मुळात डॉ आंबेडकर हेच प्रजासत्ताक दिनाचे खरे मानकरी आहेत .कारण त्यांनीच भारताची राज्यघटना लिहिली
होती. थोडक्यात इतिहासावर नजर टाकू ;
घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय. नव्या राज्य घटनेचा
मसुदा तयार करण्याचे सर्वात महत्वाचे काम या मसुदा समितीकडे होते. या समिती मध्ये एकूण ७ सदस्य होते ते
पुढीलप्रमाणे...
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष, मसुदा समिती)
२) एन. गोपालस्वामी अयंगार
३) अल्लादी कृष्णमस्वामी अय्यर
४) डॉ. के. एम. मुन्शी
५) सईद महम्मद सदुल्ला
६) एन. माधव राव
७) टी. टी. कृष्णमचारी
"मसुदा समिती" या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . मसुदा
समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य
होते त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात
सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्यावर पडली.आणि त्यांनी ती पूर्ण करूनही दाखवली .
संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा
तर अश्याप्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं काम पूर्ण करून २६ नोव्हेम्बर १९४९ ला डॉ राजेंद्रप्रसाद
यांच्याकडे सुपूर्द केली व अवघ्या दोन महिन्यात हि घटना देशात लागू करण्यात आली . आणि भारत हा देश
प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखू जाऊ लागला याचे संपूर्ण श्रेयाचे मानकरी फक्त डॉ . बाबासाहेब आंबेडकर
होय .
काही वर्षापासु मनुवादी लोकांची डोकी वर यायला सुरुवात झाली आहे .त्यातच २६ जानेवारी या दिवशी सत्यनारायण पूजापाठ ठेवणे . मागील दोन ते तीन वर्षात याचे प्रमाण वाढले आहे असा म्हणायला हरकत नाही .
मागील वर्षी पहील्यांदाच २६ जानेवारीच्या परेड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं दर्शन झालं
आणि तसेच २६ नोव्हेंबर हा दिवस " संविधान दिन" पाळण्याचा सरकारने जाहीर केलं .
जरी सरकार ( भा.ज.प. ) आंबेडकरवाद विरोधी असला तरी या दोन गोष्टी आंबेडकरी समाजाला सुखावणाऱ्या
आहेत . नुकतेच सरकारने सरकारी कार्यालयात सत्यनारायण पूजा करण्यात बंदी घातली आहे आणि ती बाबा
हि स्वागत करण्यासारखी आहे .
तर प्रजासत्ताक दिनाचे खरे मानकरी म्हणण्यापेक्षा पुज्यनीय कोण असतील तेर ते आहेत विश्व वंदनीय डॉ
बाबासाहेब आंबेडकर .
त्यामुळेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणा बरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलाही सलामी देणेच योग्य
आहे व ठरेल . अश्या महापुरुषाला त्रिवार अभिवादन .
तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !