इंदू मिल ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षात तयार होणं अशक्य नाही - शरद पवार इंदू मिल ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षात तयार होणं अशक्य नाही - शरद पवार - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, January 22, 2020

इंदू मिल ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दोन वर्षात तयार होणं अशक्य नाही - शरद पवार

आज  दिनांक : २१.०१.२०२०राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी इंदू मिल ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतरत्न डॉ बाबासाहेब

आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकासंबंधीच्या कामाचा आढावा घेतला . 

<img src="sharad-pawar-on-ambedkar-memorial.jpg" alt="ncp president sharad pawar on ambedkar memorial in mumbai"/>
NCP 


शरद पवार म्हणाले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक एमएमआरडीए करीत आहे स्मारकाबाबत 

कोणतेही अडथळे नाही आहेत. सर्व दस्तावेज कागदपत्रे परवान्यासकट तयार आहेत पण तरीही हे स्मारक दोन 

वर्षात पूर्ण करणे अशक्य नाही .कंत्राटदानाने हे आव्हान स्वीकारलं तरच आम्हाला हे स्मारक पाहण्याची संधी 

मिळेल 

तसेच हे स्मारक महाराष्ट्र आणि मुंबई येथील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आकर्षण ठरल्याशिवाय राहणार 

नाही.

भारत आणि भारताच्या बाहेर जिथे जिथे बौद्ध समाज आहे अशा ठिकाणी, श्रीलंका, थायलंड, दक्षिण आशियाई देश ते अगदी चीनपर्यंत सगळ्या देशांसाठी हे स्मारक आकर्षणाचा बिंदू राहील. शेजारी चैत्य भूमी आणि इंदू मिल येथील हे स्मारक असा दुहेरी संगम लोकांना पाहायला मिळेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बौद्ध विचारांविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक घटकाला याठिकाणी 

येऊन निश्चित समाधान मिळेल. ज्यांनी या देशाला घटना दिली त्या महामानवाच्या स्मारकाच्या दर्शनासाठी या 

देशातला प्रत्येक नागरिक इथे भेट दिल्याशिवाय राहणार नाही, असे महत्त्वाचे काम याठिकाणी होत आहे.

आपण अनेक वर्ष बघत आहोत की ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दिवशी हजारो लोक इथे येतात. आणि हे 

स्मारक झाल्यानंतर या संख्येत अनेकपटींनी वाढ होईल. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्मारकाला भेट देण्याची 

इच्छा असेल. विशेषत: जो विचाराने आंबेडकरवादी आहे असा घटक स्मारकाच्या पदस्पर्शासाठी उत्सुक असेल.

काही कमतरता असल्यास त्या दूर करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. त्यामुळे त्यासाठी 

काटकसर करण्याची आवश्यकता असणार नाही. शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अशा 

गोष्टी एकदाच होतात. न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बौद्ध विचारांविषयी 

आस्था असणाऱ्या प्रत्येक घटकाला याठिकाणी येऊन निश्चित समाधान मिळेल. ज्यांनी या देशाला घटना दिली 

त्या महामानवाच्या स्मारकाच्या दर्शनासाठी या देशातला प्रत्येक नागरिक इथे भेट दिल्याशिवाय राहणार नाही, 

असे महत्त्वाचे काम याठिकाणी होत आहे.

आपल्याला ठाऊक आहेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
 डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा ठराव मंजूर करून घेतला . तर
नुकतेच सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला त्यात कोर्ट म्हणाले कि सरकारकडे आंबेडकर स्मारक
बांधायला पैसे आहेत पण बंद होण्याच्या वाटेवर असलेल्या वाडिया हॉस्पिटलची निधी नाही , यावर
आंबेडकरी जनतेचा संताप झाला . वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी याबाबत
म्हणाले कि जो निधी स्मारकाला मिळणार आहे तो निधी वाडिया हॉस्पिटलला द्या .त्यानंतर मात्र डॉ
बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे प्रेणते सरसेनानी आंबेडकरांनी बाजू मंडळी कि जर सरकारकडे
पैसे नसेल तर आम्ही लोकांच्या कष्टाच्या पैशातून स्मारक उभारू . तर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ 
इंडिया अध्यक्ष राजरत्न आंबेडकर म्हणाले कि जर सरकार सम्स्र्स्क बसनधास्त नसेल तर हे
स्मारक बांधण्यासाठी आमच्या संस्थेकडे किंवा कोणत्याही आंबेडकरी संस्थेकडे द्या ते स्वकष्टाने बांधतील  
यावर सविस्तर विडिओ पहा 

शरद पवार पुढे म्हणाले कि आपण अनेक वर्ष बघत आहोत की ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दिवशी हजारो 

लोक इथे येतात. आणि हे स्मारक झाल्यानंतर या संख्येत अनेकपटींनी वाढ होईल. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 

स्मारकाला भेट देण्याची इच्छा असेल. विशेषत: जो विचाराने आंबेडकरवादी आहे असा घटक स्मारकाच्या 

पदस्पर्शासाठी उत्सुक असेल.

काही कमतरता असल्यास त्या दूर करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. त्यामुळे त्यासाठी 

काटकसर करण्याची आवश्यकता असणार नाही. शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अशा 

गोष्टी एकदाच होतात. 

न्यूयॉर्कमध्ये गेल्यानंतर 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' बघायला लोक जातात, तसेच भविष्यात हे स्मारक "स्टॅच्यू ऑफ इक्विटी" पाहण्याची लोकांची इच्छा असणार आहे.